07/09/2026
वनहक्कधारकांना आता स्वतंत्र सातबारा!
महसूल विभागाचा ऐतिहासिक निर्णय!
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वनहक्कधारकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वनहक्कधारकांसाठी स्वतंत्र ‘गाव नमुना ७-ई’ (अधिकार अभिलेख) आणि ‘गाव नमुना १२-ई’ (पीक पाहणी) या दुय्यम नोंदवह्या सुरू करण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे वनहक्कधारकांना इतर शेतकऱ्यांप्रमाणेच बँकांचे पीक कर्ज, पीक विमा, नैसर्गिक आपत्ती भरपाई आणि शासकीय अनुदानांचा थेट लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ज्या ७/१२ वर आधीच नोंदी आहेत, तिथे ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत नवीन नमुने तयार केले जातील; तर उर्वरित क्षेत्रांसाठी ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत संयुक्त सर्व्हे पूर्ण केला जाईल. हे अभिलेख दुय्यम असल्याने याद्वारे नवीन मालकी हक्क निर्माण होणार नाही. हा हक्क वारसा हक्काने मिळेल, मात्र �