07/09/2026
गंगाखेड महामोर्चातून ५९ जातींची अभेद्य एकजूट; उपवर्गीकरणाविरोधात बुलंद एल्गार!
अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात गंगाखेड येथे आयोजित महामोर्चा रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. या मोर्चाला युथ आयकॉन ॲड. अमन आनंदराज आंबेडकर हे देखील उपस्थित होते.
या महामोर्चातून ५९ जातींची अभेद्य एकजूट आणि संवैधानिक हक्कांच्या संरक्षणाचा बुलंद आवाज महाराष्ट्रासमोर आला.
शिक्षण, रोजगार, प्रतिनिधित्व आणि आरक्षणाच्या भवितव्याच्या प्रश्नावर युवा व विद्यार्थी शक्तीचा उत्स्फूर्त सहभाग हे या महामोर्चाचे विशेष वैशिष्ट्य ठरले.
“आम्हाला विभागून आमची एकजूट तोडण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही आणि आमच्या संवैधानिक हक्कांशी तडजोड आम्ही स्वीकारणार नाही,” असा ठाम संदेश महामोर्चातून देण्यात आला.
या लढ्यात सहभागी झालेल्या ५९ जातींमधील समाजबांधव, माता-भगिनी, युवा, विद्यार्थी तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आयोजकांचे मनःपूर्वक आभार व अभिनंदन.
जय भीम! जय संविधान!
#आरक्षण #उपवर्गीकरणविरोध