Nitin Sardesai

Nitin Sardesai Official page of Nitin Sardesai, Former MLA and Leader - Maharashtra Navnirman Sena.

काल नारळी पौर्णिमेचा सण माहिम कोळीवाड्यामध्ये पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा केला.
28/08/2026

काल नारळी पौर्णिमेचा सण माहिम कोळीवाड्यामध्ये पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा केला.

https://www.facebook.com/share/p/1DH8fFGu4D/?mibextid=wwXIfr
05/08/2026

https://www.facebook.com/share/p/1DH8fFGu4D/?mibextid=wwXIfr

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचं निधन झालं. शिक्षणक्षेत्रात संस्थाउभारणीचं मोठं काम करणाऱ्या या दूरदृष्टीच्या नेतृत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली.

डी. वाय. पाटील ज्या काळात राजकारण आणि समाजकारणात आले, तो काळ वेगळा होता. तो केवळ सत्तेचा नव्हता, तर संस्थात्मक उभारणीचा होता. ग्रामीण महाराष्ट्रात सहकारी संस्थांचं जाळं वेगाने विस्तारत होतं आणि त्यातून राज्यातील मोठ्या भागात आर्थिक परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली होती.

मात्र त्याच काळात देशाच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत उच्च शिक्षणाच्या संस्था, विशेषतः अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या अपुरी होती. आज पुणे, मुंबईसारख्या शहरांतील अनेक नामांकित महाविद्यालयांचा इतिहास ब्रिटिशकालापर्यंत पोहोचतो. स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आयआयटींसारख्या संस्थांची स्थापना करून उच्च शिक्षणाचा भक्कम पाया घातला; पण इतक्या विशाल देशात व्यावसायिक शिक्षणाची मागणी प्रचंड वेगाने वाढत होती. ती गरज केवळ सरकारच्या बळावर पूर्ण होणं शक्य नव्हतं. आणि त्याही पेक्षा शिक्षणावरचा सरकारचा खर्च हा प्रत्येक दशकांत कमीच होत चालला आहे. त्यामुळे शिक्षणाचं खाजगीकरण हे अपरिहार्य होतं.

अशा वेळी डी. वाय. पाटील यांनी शिक्षणातील संस्थात्मक उभारणीचं मोठं काम हाती घेतलं. आदर्श परिस्थितीत प्रत्येकाला दर्जेदार शिक्षण सरकारमार्फत उपलब्ध व्हायला हवं, यात दुमत असण्याचं कारण नाही. पण वास्तव हे आहे की भारतात शिक्षणावरील सार्वजनिक खर्च दीर्घकाळ अपेक्षेपेक्षा कमीच राहिला. अशा परिस्थितीत खाजगी क्षेत्राने शिक्षणात पुढाकार घेऊन संस्था उभारण्याची गरज निर्माण झाली. याच पार्श्वभूमीवर डी. वाय. पाटील, पतंगराव कदम, बाळासाहेब विखे पाटील आणि दत्ता मेघे यांच्यासारख्या नेत्यांनी शिक्षणक्षेत्रात उभारलेल्या संस्थांचं महत्त्व अधिक प्रकर्षाने जाणवतं.

गेल्या तीन-चार दशकांत डॉक्टर, अभियंते, संशोधक, उद्योजक आणि विविध क्षेत्रांत काम करणारे लाखो विद्यार्थी या संस्थांतून घडले. हे योगदान मोठं आहे.

एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाहीत; त्याभोवती वसतिगृहं, रुग्णालयं, लहान उद्योग, वाहतूक व्यवस्था आणि रोजगाराचं संपूर्ण अर्थकारण उभं राहतं. एका संस्थेमुळे संपूर्ण परिसराचा चेहरामोहरा बदलू शकतो, हे जुन्या पिढीतील अनेक नेत्यांच्या मनात पक्कं रुजलेलं होतं.

शिक्षण क्षेत्रात उभारलेल्या संस्था असोत किंवा नवी मुंबईतील स्टेडियम—दोन्हीकडे त्यांच्या विचारातील भव्यता आणि दीर्घकालीन दृष्टी स्पष्टपणे दिसून येते.

राजकारणातून संस्था उभारून समाजावर दीर्घकालीन ठसा उमटवणाऱ्या पिढीतील ते अखेरच्या महत्त्वाच्या प्रतिनिधींपैकी एक होते.

डॉ. डी. वाय. पाटील यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली.

राज ठाकरे |

हिरण्यकश्यपू राजाने ब्रम्हदेवाकडून वर मिळवला होता की त्याला माणूस, प्राणी, शस्त्र, अस्त्र, घरात, बाहेर, दिवसा किंवा रात्...
26/07/2026

हिरण्यकश्यपू राजाने ब्रम्हदेवाकडून वर मिळवला होता की त्याला माणूस, प्राणी, शस्त्र, अस्त्र, घरात, बाहेर, दिवसा किंवा रात्री कुणीही मारू शकणार नाही. या वरामुळे त्याला वाटू लागले की तो आता अमर झाला आहे.

तो अहंकारी तर होताच. त्याने स्वतःला देव घोषित केले व तो सर्वांचा छळ करू लागला. स्वतःचा मुलगा विष्णूभक्त प्रल्हाद यानेसुद्धा देवाचे नाव घेऊ नये म्हणून त्याला खूप यातना दिल्या व मारण्याचे खूप प्रयत्न केले.

सरतेशेवटी त्याचा अहंकार मोडायला विष्णूदेवाने नृसिंहाचा (अर्धा माणूस व अर्धा सिंह ) अवतार घेऊन ते संध्याकाळी ( ना दिवस ना रात्र ) उंबरठ्यावरील एका खांबातून ( ना घरात , ना बाहेर ) प्रकट झाले व आपल्या तीक्ष्ण नखांनी ( ना अस्त्र, ना शस्त्र) त्याचा वध केला.

त्याच्यासकट त्याच्या अहंकारालाही देवाने संपवला.

*पुराणातील या कथेचे आजच्या आंदोलनाशी कोणतेही साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा*

25/07/2026
https://www.facebook.com/share/p/1Zs6mLypdC/?mibextid=wwXIfr
25/07/2026

https://www.facebook.com/share/p/1Zs6mLypdC/?mibextid=wwXIfr

माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना आणि शिवसैनिकांना
सस्नेह जय महाराष्ट्र,

येत्या २६ जुलैला NEET परीक्षेतील गोंधळ, त्याबद्दल विद्यार्थ्यांचं सुरु असलेलं आंदोलन आणि ते आंदोलन चिरडण्याचा सरकारचा सुरु असलेला प्रयत्न याविरोधात आपण 'तिरंगा मार्च' काढत आहोत. त्याबद्दल तुम्हाला आपल्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून, मध्यवर्ती कार्यालयांकडून सूचित करण्यात आलं असेलच.

हा 'तिरंगा मार्च' हा दिल्लीतलं सरकार आणि त्यांच्या आदेशानुसार दिल्लीतील पोलीस जी मुजोरी दाखवत आहेत याचा निषेध करण्यासाठी आहे. तसंच हा मोर्चा जे विद्यार्थी सरकारला अजिबात न जुमानता ठामपणे उभे आहेत त्यांच्यासाठी, त्यांच्या घरच्यांसाठी आणि जे दिल्लीला जाऊ शकत नाहीत किंवा मुंबईला येऊन निषेध व्यक्त करू शकत नाहीत त्यांना तुमच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे हे दाखवण्यासाठी आहे.

हा 'तिरंगा मार्च' आहे. हा पूर्णपणे अराजकीय आहे, इथे कुठल्याही पक्षाचा झेंडा नसेल, दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या समर्थनाच्या घोषणा नसतील. सरकारचा निषेध असेल, आणि देशभरातील विद्यार्थ्यांना आणि तरुण तरुणींना आपण जो पाठिंबा दर्शवत आहोत त्यासाठीच्या घोषणा असतील. मोर्च्याचे निमंत्रक मी आणि उद्धव असलो तरी आमच्याही नावाने कुणी घोषणा द्यायच्या नाहीत. हा विद्यार्थ्यांचा मोर्चा आहे याचं भान आपण बाळगायचं आहे आणि ते तुम्ही बाळगालच याबद्दल तिळमात्र शंका नाही.

बाकी मोर्च्याला गालबोट लावण्याची हिंमत कोणी करणार नाही, कारण आपण काय करू शकतो याचा अंदाज सगळ्यांनाच आहे. पण तरीही काही उत्साही असतात. ते आले आणि काही वेडंवाकडं करायचा प्रयत्न केला, काही चुकीच्या घोषणा देऊन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न जरी केला किंवा तिथे आलेल्या पालकांना
( खासकरून महिलांना आणि मुलींना ) जर त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांना, जवळ जे कोण पोलीस असतील त्यांच्या ताब्यात ‘समारंभपूर्वक’ द्या. ते कसं हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. पण पोलीस जिथे नसतील, तिथे अशांचा 'पाहुणचार' कसा करायचा याचा अनुभव आणि मनगटातील शक्ती दोन्ही आपल्याकडे आहेच.

बाकी महाराष्ट्र सैनिकांनी आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या हे सांगायची गरजच नाही. ते तुम्ही येणारच. पण जास्तीत जास्त विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना पण घेऊन या, त्यांची मोर्च्यात काळजी घ्या आणि ते पुन्हा सुखरूप घरी जातील हे पहा. बाकी सरकारचं माहित नाही पण महाराष्ट्रातील पोलीस हे आपल्यासोबत आहेत कारण त्यांच्यासमोर पण मुलाबाळांच्या आयुष्याचा पण प्रश्न आ वासून उभा आहे.

बाकी कुठे भेटायचं किती वाजता भेटायचं याचा तपशील तुमच्याकडे आहेच. तेंव्हा २६ जुलैला 'तिरंगा मार्च' ला भेटूया. सर्वांनी सकाळी १० वाजता शिवाजी पार्क येथील शिवछत्रपतींच्या पुतळ्या जवळ जमायचं आहे ! आम्ही आपली , विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची वाट बघतोय ! जनतेच्या मनातील संताप काय आहे हे या शांततापूर्ण मोर्चाने दिल्लीश्वरांना दाखवून देऊया !

आपला नम्र

राज ठाकरे ।

विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल
25/07/2026

विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल

22/07/2026

एका चिमुकल्याचा जीव गेल्यानंतर सुद्धा यांना काहीच वाटत नाही ?

यंदाचा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबईत असंख्य ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने लोकांच प्रचंड नुकसान झालं.
चेंबूरमध्ये तर एका चिमुकल्याचा जीवही गेला.

याबाबत लोकांनी जाब विचारल्यावर याची सखोल चौकशी करून जबाबदारी घेण्याऐवजी थातुरमातुर उत्तर देऊन टाळाटाळ केली जात आहे.

याविरोधात महानगरपालिकेला जाब विचारण्यासाठी आज मनसेने आझाद मैदानावर आंदोलन पुकारले आहे.

कोकणवासीयांना गणेशोत्सवासाठी आपल्या गावी जायची प्रचंड ओढ असते. रेल्वेचा प्रवास जलद व आरामदायी म्हणून आपण रेल्वेस प्राधान...
17/07/2026

कोकणवासीयांना गणेशोत्सवासाठी आपल्या गावी जायची प्रचंड ओढ असते. रेल्वेचा प्रवास जलद व आरामदायी म्हणून आपण रेल्वेस प्राधान्य देत असतो.
पण दरवर्षीचा अनुभव असा येतो की, यासाठी प्रयत्न करुनही काही केल्या रेल्वे तिकीटांचे आरक्षण मिळतच नाही. तिकीटांचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होतो. हा काळाबाजार थांबला पाहीजे
यासाठी आज रेल्वे प्रशासनास निवेदन दिले आहे.

Address

04, Pinto Mansion, Sitaladevi Mandir Marg, Mahim West
Mumbai
400016

Telephone

+912224378181

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nitin Sardesai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Nitin Sardesai:

Shortcuts

Share