05/08/2026
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मा. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या समवेत महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांनी आज कोल्हापूर येथील कसबा बावडा येथे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यपाल, शिक्षणमहर्षी व पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील साहेब यांचे अंत्यदर्शन घेत त्यांना पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
डॉ. डी. वाय पाटील यांचे शिक्षण, समाजसेवा, आरोग्य, क्रीडा आणि सहकार क्षेत्रातील अतुलनीय योगदान महाराष्ट्र व महाराष्ट्रजनांच्या सदैव स्मरणात राहील.