B P E Society's High School Bandra - west

B P E Society's High School Bandra - west This page is created for those students as well as teachers who are related with this school. So come and join us......

सोमवार दिनांक १० फेब्रुवारी २०२५ रोजी डी डी सह्याद्री वााहिनीवरून परीक्षा पे चर्चा -विशेष संवाद या कार्यक्रमात बी पी ई स...
11/02/2025

सोमवार दिनांक १० फेब्रुवारी २०२५ रोजी डी डी सह्याद्री वााहिनीवरून परीक्षा पे चर्चा -विशेष संवाद या कार्यक्रमात बी पी ई सोसायटी हायस्कूलचे शिक्षक आणि समुपदेशक श्री श्रीकांत शिनगारे यांची मुलाखत प्रसारीत झाली.
व्हिडीओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा

https://www.youtube.com/live/85fbEz1lKDY?si=sa3KFohqAY7Hl_Me

13/01/2024
विनम्र अभिवादन
03/01/2024

विनम्र अभिवादन

शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 9 ते 1 या वेळेत शाळेच्या प्रांगणात आनंद मेळा आयोजित करण्यात येत आहे. विद्यार...
03/11/2023

शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 9 ते 1 या वेळेत शाळेच्या प्रांगणात आनंद मेळा आयोजित करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री चा हा आनंद मेळा. सर्व आजी माजी विद्यार्थी आणि पालकांनी शाळेत जरूर भेट द्यावी.

प्रति,१) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)२) प्राचार्य,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)३) शिक्षणाधिकारी (प्राथ) जिल्...
13/10/2023

प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक
(सर्व)
२) प्राचार्य,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
३) शिक्षणाधिकारी (प्राथ) जिल्हा परिषद (सर्व)
४) शिक्षणाधिकारी ( माध्य) जिल्हा परिषद (सर्व)
५) प्रशासन अधिकारी मनपा (सर्व)

राज्यातील इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे अंतर्गत विद्यार्थ्याना करिअर संदर्भात मार्गदर्शनासाठी वेबिनार सत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यातील विसावे सत्र दि १३. १०.२०२३ रोजी आयोजित करण्यात आले आहे.
सदर वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन करण्यात येणार आहे.

*समुपदेशक*
मा श्री श्रीकांत चंद्रकांत शिनगारे,
शिक्षक - समुपदेशक ,
बी पी ई सोसायटीचे म्यूनि. हायस्कूल, बांद्रा ( प.), मुंबई -५०

*विषय : विज्ञान क्षेत्रातील करिअरच्या संधी*

*दि १३ ऑक्टोंबर २०२३*
*वेळ दुपारी ३.०० ते ४.००*

*युट्युब लिंक*

https://youtube.com/live/IvetDoTg2yE?feature=share

राज्यातील सर्व विदयार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक / प्राचार्य व अधिकारी यांनी सदर वेबिनारला वेळेत उपस्थित रहावे.

(अमोल येडगे भा.प्र.से.)
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे.

बी.पी.ई. सोसायटीच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सन्मा. श्री राजेश म्हात्रे सर यांचे मनःपूर्वक अभिनंदन
06/09/2023

बी.पी.ई. सोसायटीच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सन्मा. श्री राजेश म्हात्रे सर यांचे मनःपूर्वक अभिनंदन

15 ऑगस्ट 2023 रोजी भारताचा 76 वा स्वातंत्र्यदिन सोहळा शाळेच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाला. वांद्रे पश्चिम विधानसभा म...
15/08/2023

15 ऑगस्ट 2023 रोजी भारताचा 76 वा स्वातंत्र्यदिन सोहळा शाळेच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाला. वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघाचे आमदार व शाळेचे हितचिंतक सन्माननीय श्री आशीष शेलार साहेब यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे हितचिंतक सी ए सन्माननीय श्री. राजेश संघवी साहेब , अतिथी ॲड. सन्माननीय श्री सुयोग नाईक साहेब, बी पी ई सोसायटी संस्थेचे अध्यक्ष श्री हरीश सुर्वे साहेब, सचिव श्री विजय पांगम साहेब, संचालक श्रीमुख्याध्यापक श्री अशोक तावडे साहेब, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री भानुदास केसरे सर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री राजेश म्हात्रे सर, रात्रशाळा विभागाचे मुख्याध्यापक श्री सर्जेराव पाटील सर, पालक, शिक्षकवृंद त
शिक्षकेतर कर्मचारी, पालक व
विद्यार्थी उपस्थित होते. सन्माननीय पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले.
उपस्थित सर्व मान्यवरांचे संस्था ,शाळा यांच्या वतीने मनःपूर्वक आभार.

आज गुरूवार दिनांक 15 जून 2023 रोजी नवीन शैक्षणिक वर्ष 2023-24 ची सुरुवात झाली. आपल्या  बी. पी ई सोसायटी शाळेत प्रवेशोत्स...
15/06/2023

आज गुरूवार दिनांक 15 जून 2023 रोजी नवीन शैक्षणिक वर्ष 2023-24 ची सुरुवात झाली. आपल्या बी. पी ई सोसायटी शाळेत प्रवेशोत्सव‌ कार्यक्रम साजरा करण्यात आला. शाळेत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्प व नवीन पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. तसेच इयत्ता 5 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून मिळालेली मोफत पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री हरीश सुर्वे साहेब, मुख्याध्यापक व शिक्षकवृंद उपस्थित होते.

BMC NotificationAdvertisement for General Nursing and Midwifery course
22/06/2022

BMC Notification
Advertisement for General Nursing and Midwifery course

आपल्या शाळेचा निकाल १००%यशस्वी विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक अभिनंदन
18/06/2022

आपल्या शाळेचा निकाल १००%
यशस्वी विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक अभिनंदन

Wanted teacher in Primary Section
01/04/2022

Wanted teacher in Primary Section

Address

Narayandas Dayabhai Road
Mumbai
400050

Telephone

+91 22 2642 1723

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when B P E Society's High School Bandra - west posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share