19/08/2015
यज्ञ , हवन, अभिषेक यासाठी अशी अन्नाची नासाडी हे पापच आहे.
देशात लाखो लोक उपासमारीने मरत असताना दूध, तुप अशा प्रकारे सांडून टाकणे म्हणजे वेडेपणाच आहे.
यातून काय साध्य होणार असते?
हे कशासाठी करायचे?
भूक असताना खाणे विकृती
भूक असताना आपल्या घासातला घास काढून दुस -याला देणे संस्कृति
भूक असताना आपले दूस-याला खावू घालणे ही माणूसकी
आज ही माणूसकी कितीजण जपतात .
एखादे गरीब लहान मुल समोर आले तर त्यालापण चांगला खावू देवून बघा . ब -याच जणांना वाटते की अशानी गरीब सोकावतील. पण मंदीरात जावूनही आपण पूजा -पाठ, दक्षणा यासाठी खर्च करतोच ना? तो जातो का देवाकडे? त्याची देवाला काय गरज? ईथे मात्र अगदी सोन्या चांदीपासून ते हजारों रूपयांत दान अगदी मनाेभावे केले जाते . कशासाठी ? तीथे कसलाही विचार केला जात नाही .
संत तुकडोजी महाराज म्हणतात,
मंदीर क्षेत्रे दुकाने झाली,पुजा कमाई करू लागली।
दक्षणा पात्रे पुढे आली पोटासाठी, कसली पुजा धुप दीप ही
स्त्रीया बापड्या मंदीरी जाती, अंधानुकरणे एेकती ||
देवाच्या अस्तीत्वाबद्दल प्रश्न केला तर त्याचे आस्तित्व सगळीकडे आहे म्हणतात मग मंदीरात जाण्याची काय आवश्यकता ? मंदिर , मुर्तीचे निर्माण माणसाने केले मग पैसा , वेळ घालवून काय सिद्ध होणार असते. हाच पैसा समाज उपयोगी कामासाठी लावला तर , अशा मंदीरात दान देणा-यांनी सध्याची दुष्काळी परिस्थितिने पीडलेल्या शेतक-यांना मदत करावी. मंदीरात जमा होणारे धन पाहता शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाहीसंत गाडगेबाबा म्हणतात ,
शेंदूर माखोनीया धोंडा । पाया पडती पोरे रांडा ।
देव दगडाचा केला । गवंडी त्याचा बाप झाला ।
सोडोनीया ख-या देवा। करी म्हसोबाची सेवा ।|
सरकारची तुटपुंजी मदत हातात येईपर्यंत शेतक-यांनी काय करायचे?फुल नाही फुलाची पाकळी म्हणून समाधान मानावे लागते .पण ही मदतही वेळेवर हातात पडत नाही . ही मदत पण शेतक-यांच्या काहीच कामाची नाही . यात त्यांचे नुकसान भरपाई तर होतच नाही , बीयानांवर केलेला खर्चही निघत नाही . कोणत्या निष्कर्षावर ही मदत मिळते तेच समजत नाही.
ज्यांची पोट आधीच भरलेली आहेत त्यांनाच खावु घालण्यापेक्षा मग भुकेल्याच्या पोटाला अन्नाची गरज आहे त्यालाच खावू घातले तर काय बिघडले? दान करायचेच आहे तर योग्य ठिकाणी करा ज्याच्यामुळे एखाद्या गरजवंताला जीवनात पुन्हा उभ रहाण्यासाठी मदत होईल .
खरच देवळात साोन्याचा मुकुट , हार , हीरे, सोन्याचे छत, भींती वगैर करणा-या भक्तांजवळ जर दान करण्यासाठी एवढ धन आहे तर मग या धनीकांनी हजारों रूपयांच्या कर्जापायी कुटुंबाला उघड्यावर टाकून आत्महत्या करण्यास भाग
पडणा-या बळीराजाला मदत करावी. हे पुण्य कर्मc तुमच्या हातून घडू द्या. गरीब होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितिमुळे शिक्षण सोडावे लागते.त्यांना मदत करा.
गाडगेबाबा म्हणतात,
खर्चु नका देशासाठी पैसा
शिक्षणाला तोच पैसा द्या हो
नको मंदीराची करावयास भर
छात्र जो हुशार त्यास द्यावा