Maharashtra DGIPR

Maharashtra DGIPR DGIPR is a two way channel between Government and the Public.
(504)

From one end it keeps the public informed of Governments policies and achievements in different spheres of governance and from the other keeps Government advised on reactions of public to these.

06/09/2026

‘आज तक’ या वृत्तवाहिनीवरील ‘MAHA सरकार डायरी’ कार्यक्रम…
#साप्ताहिकमहाराष्ट्र

महाराष्ट्रातील विद्यमान भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठित करण...
05/09/2026

महाराष्ट्रातील विद्यमान भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठित करण्याबाबतचा सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे.

सविस्तर शासन निर्णय पाहण्यासाठी लिंक 👉🏾
https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202609051354473307.pdf

#शासननिर्णय #महाराष्ट्रशासन #भरतीप्रक्रिया #परीक्षापद्धती
#उच्चस्तरीयसमिती

05/09/2026

‘इंडिया न्यूज’ या वृत्तवाहिनीवरील ‘NXT महाराष्ट्र’ कार्यक्रम…
#साप्ताहिकमहाराष्ट्र

📍पुणेउपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, सोमेश्वरनगर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यास मार्ग...
05/09/2026

📍पुणे
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, सोमेश्वरनगर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यास मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, उत्पादन खर्चात बचत आणि शेतीचे अर्थकारण मजबूत करण्यावर भर देणे आवश्यक आहे. बदलती हवामान परिस्थिती आणि वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर कृषी व साखर क्षेत्राने आधुनिक तंत्रज्ञान, मूल्यवर्धित उत्पादन आणि अचूक नियोजनाचा स्वीकार करून शेतकरीहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले.

साखर उद्योग हा महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा कणा आहे. अतिवृष्टी, दुष्काळ, हवामानातील अनिश्चितता, वाढता उत्पादन खर्च आणि साखरेच्या बाजारपेठेतील चढ-उतार अशा आव्हानांचा सामना करण्यासाठी साखर कारखान्यांनी केवळ साखर उत्पादनावर अवलंबून न राहता इथेनॉल, बायोगॅस, सीएनजी, सेंद्रिय खत आणि इतर मूल्यवर्धित उत्पादनांकडे लक्ष द्यावे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने आर्थिक शिस्त, कार्यक्षम व्यवस्थापन आणि शेतकरीहिताला प्राधान्य देत सहकार क्षेत्रात विश्वासार्हता निर्माण केली आहे. कारखान्याच्या प्रगतीमध्ये सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, अधिकारी आणि व्यवस्थापनाचे योगदान महत्त्वाचे आहे. शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाची परंपरा कायम ठेवत परिसराच्या सर्वांगीण विकासासाठीही सहकारी संस्थांनी योगदान द्यावे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना शेतकऱ्यांच्या अडचणी आणि गरजांची जवळून जाण होती. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, यासाठी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

कार्यक्रमास मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, आमदार सचिन पाटील, माजी आमदार संभाजी कुंजीर, पीडीसीसी बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप आदी उपस्थित होते.

#शेतकरीमेळावा
#सहकार
#साखरकारखाना

डॉ. नितीन सोनवणे लिखित ‘प्रकाशचित्रांतून लोककलावंतांचे स्मृतीवंदन’ या पुस्तकाचे प्रकाशन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयो...
05/09/2026

डॉ. नितीन सोनवणे लिखित ‘प्रकाशचित्रांतून लोककलावंतांचे स्मृतीवंदन’ या पुस्तकाचे प्रकाशन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांनी केले आहे.
बुधवार, ९ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता प्रभादेवी, मुंबई येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या करिष्मा सभागृह, ५ वा मजला येथे हा कार्यक्रम होईल. प्रकाशन सोहळ्यानंतर शेखर निरंजन भाकरे आणि सहकलाकारांचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून कलारसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

📍 विज्ञान भवन, नवी दिल्लीराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक...
05/09/2026

📍 विज्ञान भवन, नवी दिल्ली
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम, गुणवत्तापूर्ण अध्यापन, संशोधन आणि कौशल्याधारित शिक्षणाच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील ९ शिक्षकांसह देशातील एकूण ८२ शिक्षकांचा ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ देऊन गौरव करण्यात आला. ४८ शालेय शिक्षक, २१ उच्च शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापक आणि १३ कौशल्य विकास क्षेत्रातील शिक्षकांचा यात समावेश आहे. पुरस्कारार्थींना प्रमाणपत्र, पदक आणि ५० हजार रुपये रोख प्रदान करण्यात आले. पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करताना राष्ट्रपतींनी शिक्षकांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतीस अभिवादन करुन राष्ट्रपतींनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, रवींद्रनाथ टागोर आणि गोपाळबंधू दास यांच्या शैक्षणिक योगदानाचा विशेष उल्लेख केला.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभाग आणि उच्च शिक्षण विभाग तसेच कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या समारंभास केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी, शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुकांत मजूमदार, कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) जयंत चौधरी, शिक्षण मंत्रालयाचे सचिव अनिल कुमार, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या सचिव देबाश्री मुखर्जी आदी उपस्थित होते.

शिक्षक केवळ विद्यार्थ्यांना ज्ञान देत नाहीत, तर त्यांचे व्यक्तिमत्त्व, चारित्र्याला आणि विचारांना आकार देऊन सशक्त राष्ट्राची पायाभरणी करतात. अंदमान-निकोबारपासून लडाखपर्यंत दुर्गम आणि ग्रामीण भागात प्रतिकूल परिस्थितीत कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या समर्पण कौतुकास्पद आहे. भारताला जगाची ज्ञान आणि कौशल्याची राजधानी बनविण्यासाठी प्राथमिक स्तरापासूनच तंत्रज्ञान, नैतिक मूल्ये आणि कौशल्याधारित शिक्षणाला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

महाराष्ट्रातील सन्मानप्राप्त शिक्षक
🏆 डॉ. कविता नृसिंहराव गिट्टे - साने गुरुजी निवासी माध्यमिक विद्यालय, बीड,
🏆 कुंदा जयवंत बच्छाव - महापालिका शाळा, नाशिक,
🏆 वैभव वसंतराव कुलकर्णी - जवाहर नवोदय विद्यालय, लातूर,
🏆 शिवप्रसाद अरविंद टिंगरे - सैनिक स्कूल, सातारा,
🏆 डॉ. विक्रम विशाल - भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई,
🏆 डॉ. अमर मोहनराव ताकसांडे - जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय, दत्ता मेघे संस्था, वर्धा,
🏆 डॉ. संदीपान प्रल्हाद नरोटे - शासकीय तंत्रनिकेतन, सोलापूर,
🏆 किरण प्रकाश झरकर - शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धाराशिव,
🏆अर्चना राकेश जाधव - शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, त्र्यंबकेश्वर, नाशिक

#राष्ट्रपतीद्रौपदीमुर्मू
#राष्ट्रीयशिक्षकपुरस्कार२०२६
#शिक्षकदिन

05/09/2026

‘रिपब्लिक भारत’ या वृत्तवाहिनीवरील ‘महाराष्ट्र की विकासगाथा’ हा कार्यक्रम…
#साप्ताहिकमहाराष्ट्र

📍मुंबईमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरळी, दादर, घाटकोपर येथे आयोजित विविध दहीहंडी उत्सवांना भेट दिली. युवकांनी व्यसन...
05/09/2026

📍मुंबई
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरळी, दादर, घाटकोपर येथे आयोजित विविध दहीहंडी उत्सवांना भेट दिली. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी, सक्षम आणि व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी योगदान द्यावे. यामाध्यमातून 'नशामुक्त महाराष्ट्र' या संकल्पनेला बळकटी देण्याचे काम व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. या उत्सवभेटीदरम्यान त्यांनी मुंबईतील विविध ठिकाणी युवकांना मार्गदर्शन केले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजयोग प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दहीहंडी' उत्सवात प्रतिकात्मक दहीहंडी फोडून शुभारंभ करण्यात आला. 'नशामुक्त महाराष्ट्र' मोहिमेचा संदेश देणारे बॅनर यावेळी प्रदर्शित करण्यात आले. वरळी येथे जांबोरी मैदानावरील परिवर्तन फाउंडेशन आयोजित ‘दहीहंडी' उत्सव प्रसंगी उपस्थित राहून त्यांनी गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या. घाटकोपर येथील श्रेयस सिनेमा चौकातील मानाच्या दहीहंडी उत्सवातही मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केले. गोविंदा पथकांतील तरुणांचा उत्साह, जिद्द आणि शिस्तीचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.

दहीहंडी हा केवळ उत्सव नसून महाराष्ट्राची परंपरा, तरुणाईचे साहस, आणि संघभावनेचा जागर आहे. दहीहंडीतील मानवी मनोरे हे संघटित प्रयत्नांचे उत्तम उदाहरण आहेत. प्रत्येक गोविंदाची भूमिका महत्त्वाची असते. दहीहंडी उत्सवातून युवकांना संघभावना, नेतृत्व, परिश्रम आणि ध्येयपूर्तीची प्रेरणा मिळते. दहीहंडीच्या थरारात सहभागी होणाऱ्या गोविंदा पथकांचे योगदान महत्त्वाचे असून, त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार प्रवीण दरेकर, आमदार राम कदम, आमदार अमित साटम, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
#दहीहंडी #जन्माष्टमी #गोविंदा #मुंबई

05/09/2026

‘पुढारी न्यूज’ या वृत्तवाहिनीवरील ‘महाराष्ट्र नेक्स्ट’ हा कार्यक्रम…
#साप्ताहिकमहाराष्ट्र

Address

Ground Floor, Main Building, Mantralaya, Madam Cama Road
Mumbai
400032

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maharashtra DGIPR posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Maharashtra DGIPR:

Shortcuts

Share