13/09/2016
मुंबई येथे आयोजित टाईम्स नेटवर्कच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सोशल इनोव्हेशन फोरम 2016 ला आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. आज भारत अतिशय वेगाने प्रगती करतो आहे आणि या परिवर्तनाच्या प्रक्रियेत ज्या काही अडचणी येतील, त्यावर नवनवे संशोधन हाच एकमेव उपाय आहे. आज डिजिटल इंडिया अभियानामुळे संपूर्ण देश आणि देशातील नागरिक एकमेकांशी जोडले गेले आहेत. जगातील सर्वोत्तम ज्ञान गावांपर्यंत पोहोचविण्यात आपण यशस्वी होत आहोत. यामुळे आरोग्य आणि शैक्षणिक बाबतीत सुद्धा उत्तमोत्तम सुविधा देण्यात आपण यशस्वी होत आहोत, असे मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले. राज्य सरकारतर्फे हाती घेण्यात आलेले सर्व ग्रामपंचायती डिजिटल करण्याचे अभियान, विविध सेवा ऑनलाईन करणे, मेट्रो, एमटीएचएल आणि मुंबई वायफाय करण्यासारख्या उपक्रमांची माहिती सुद्धा यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.
CM Devendra Fadnavis attends Hitachi Social Innovation Forum 2016 organised by Times Network at Mumbai. He spoke on how India is changing rapidly&innovation is only solution to overcome hurdles in transformation process. Connectivity with people from various parts of the world is possible because of Digital India & best global practices can reach villages.We have been able to provide best health care & educational facilities to poor due to these digital interventions, said CM. He also spoke on initiatives like digitally connecting all Gram Panchayats of State,services on digital platform,Metro,MTHL & free Wi-Fi in Mumbai.