भगवं वादळ
(घेता मराठ्यांनी ध्यास बदलला इतिहास !!!)
मरहट्टा म्हणतात या सह्याद्रीच्या वाघांना , सह्याद्रीच्या कडेकपारी उतरलात तरच कळेल मराठ्याची छाती , असेल हा महाराष्ट्र दुर्गम पण भेकडांनो लक्षात ठेवा महाराष्ट्रातल्या याच दुर्गम भागाने सह्याद्रीच्या कडेकपार्यांनी प्रत्येक गनिमाला अक्षरशः रडवलयं मी मी म्हणणारे कित्येक अफजल औरंग्ये मातीमोल झाले इथे कधी मराठ्याच्या डोळ्यात पाहा जाणवेल कुठल्या मातीच
े
बनलोय आम्ही आणि मनगटाची ताकद पहायची असेल तर पार हजारो कोस उत्तरेस त्या अटकेस जा तिथल्या तटबंदीस विचारा कोण आहे मराठा ? इतिहासाला विचारा आणि जमलच तर दिल्लीतल्या गर्वाने फुगलेल्या तटांच्या भिंतिंना विचारा या दख्खनच्या वाघांच्या डरकाळीने कशा गळुन पडल्या होत्या ? त्या प्रत्येक वळणाला विचार ज्यावरुन गेलेल्या मराठ्यांच्या घोड्यांच्या टापा कशा दिल्लीच्या कळजाच्या ठिकर्या पाडायच्या । त्या सागर किनार्याला विचार रामा नंतर पहिला सागरसेतू बांधणारे आमचे शंभुराजेच होते कि नाही । या महाराष्ट्रा बद्दल बोलणार्यांनो हे ध्यानात ठेवा जस मास्याला पोहायला शिकवाव लागत नाही तसच या सह्याद्रीत कस वावराव हे मराठ्याला शिकवाव लागत नाही माझ्या महाराष्ट्रासारखा दुसरा प्रदेश होण नाही आणि या महाराष्ट्राचा मनबिंदु म्हणजे आमचे शिव-शंभु त्यांसारखे राजे उभ्या जगात होणे नाही
जय भवानी...
जय जिजाऊ...
जय शिव-शंभु...
जय पेशवे बाजीराव...
जय महाराष्ट्र...