24/06/2026
“Integrated Urban Waste and Wastewater Management” या विषयावर अमरावती येथे प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न
♻️♻️ ♻️
दि. 23 जून 2026 रोजी अमरावती येथे “Integrated Urban Waste and Wastewater Management” या विषयावरील एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली. सदर कार्यशाळा RCUES, AIILSG, नगर विकास विभाग जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती आणि अमरावती महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.
कार्यशाळेस सेवानिवृत्त IAS अधिकारी श्री. जयराज पाठक सर, महानगरपालिका आयुक्त श्रीमती वर्षा लढ्ढा मॅडम, जिल्हा सह आयुक्त डॉ. विकास खंडारे सर, मनपा अतिरिक्त आयुक्त श्रीमती शिल्पा नाईक मॅडम तसेच AIILSG चे संचालक श्री. अजित साळवी सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली असुन त्यांनी उपस्थितांना मौलिक मार्गदर्शन केले.
कार्यशाळेमध्ये स्वच्छ भारत अभियान (नागरी) 2.0, घनकचरा व्यवस्थापन नियम 2026, सांडपाणी व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत शहरी विकास या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. शहरांमध्ये स्वच्छता व कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी तसेच पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना देण्यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरले. सदर कार्यशाळेमध्ये नगरपालिका व महानगरपालिकेचे पाणीपुरवठा व मलनिस्सारण अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, शहर समन्वयक तसेच स्थापत्य अभियंता यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सर्व सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागामुळे कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न झाली.
🌱 "स्वच्छतेकडून शाश्वततेकडे...!" 🌱
#अमरावती #नगरविकासविभाग