15/10/2026
🌸 **घाटकोपर पूर्वमध्ये १० वर्षांनंतर ‘रासरंग नवरात्री उत्सवा’चे भव्य आयोजन!** 🌸
🙏 **मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांची विशेष उपस्थिती!** 🙏
घाटकोपर पूर्व येथील पोलीस हॉकी ग्राउंडवर सेवाभावी आमदार मा. पराग शाह जी आणि श्री. जितेंद्र मेहता यांच्या सौजन्याने तब्बल १० वर्षांनंतर *‘रासरंग नवरात्री उत्सवा’चे* भव्य आयोजन करण्यात आले आहे.
या उत्सवाला आज महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी सेवाभावी आमदार मा. पराग शाह जी यांनी त्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री महोदयांनी उपस्थितांना नवरात्रीच्या शुभेच्छा देत उत्सवाच्या आयोजनाचे कौतुक केले.
🌾 **दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात; सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण!** 🌾
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, या उदात्त हेतूने घाटकोपरमधील विविध सामाजिक संस्था, धार्मिक संघटना आणि दानशूर व्यक्तींनी **मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एकूण ₹61,95,000 आर्थिक योगदान** दिल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करताना मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांनी दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. समाजातील विविध घटकांनी एकत्र येऊन गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घेणे ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे.
💐 **आर्थिक योगदान देणाऱ्या संस्था व दानशूर व्यक्ती:**
१. सेवाभावी आमदार पराग शाह – पी.एस. १००८ घाटकोपर वेल्फेअर ट्रस्ट – ₹२१,००,०००
२. भाजपा जैन सेल, मुंबई – ₹११,००,०००
३. श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, हिंगवाला लेन – ₹३,३३,०००
४. जेव्हीएम चॅरिटेबल फाउंडेशन – ₹३,३३,०००
५. श्री गणेश मंदिर संस्थान, पंतनगर – ₹३,००,०००
६. श्री. अमित महेंद्र ठक्कर – ₹२,५१,०००
७. सौ. वर्षा नरेश लालवाणी, एम्पायर ग्रुप ऑफ कंपनीजच्या वतीने – ₹२,५०,०००
८. ओराम ग्रुप – श्री. मनीष भाववानी व सौ. मीशा भाववानी (पुत्र: ऋषी व देव) – ₹२,२१,०००
९. सौ. रितूताई तावडे, मुंबईच्या महापौर – ₹२,११,०००
१०. सौ. राखीताई जाधव, नगरसेविका – ₹२,११,०००
११. श्री. धर्मेश गिरी, नगरसेवक – ₹२,११,०००
१२. जस्ट इन टाइम, घाटकोपर – ₹२,११,०००
१३. श्री. गौरव ठक्कर – ₹२,११,०००
१४. श्री स्वामी समर्थ मठ, पंतनगर (श्री. बाबू दरेकर) – ₹१,०१,०००
१५. श्री. मुकुंद काकड – ₹१,५१,०००
या सर्व संस्था, संघटना आणि दानशूर व्यक्तींच्या सामाजिक योगदानाबद्दल मनःपूर्वक आभार!
या प्रसंगी मुंबईच्या महापौर मा. रितूताई तावडे, नगरसेविका मा. राखीताई जा