Adinath Kapale

Adinath Kapale Secretory to Former Minister MLC Sadabhau Khot

13/12/2025

संत्रा नगरी

22/03/2025
आपल्या कार्यकर्त्यांवर कुटुंबाएवढाच जीव लावणारा लोकनेता - Sadabhau Khot काल विदर्भामध्ये बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्याचा दौ...
02/10/2024

आपल्या कार्यकर्त्यांवर कुटुंबाएवढाच जीव लावणारा लोकनेता - Sadabhau Khot

काल विदर्भामध्ये बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्याचा दौरा झाला. दोन जिल्हे एकाच दिवशी असल्यामुळे सकाळी सात वाजल्यापासून प्रचंड मोठी लगबग होते. आदरणीय भाऊंनी सकाळी व्यायाम करून ०९.०० वाजता जो गाडी पाय ठेवला तो रात्री नऊ पर्यंत कुठेच थांबला नाही. प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ताच्या गाठीभेटी, ग्रामस्थांशी संवाद, तिथल्या अडीअडचणी त्यानंतर प्रशासनाशी संपर्क, लोकप्रतिनिधींशी संवाद, महायुतीमधील नेत्यांच्या गाठीभेटी, त्याचप्रमाणे विधानसभेतील आढावा घेत नियोजित कार्यक्रम चालू होता. संध्याकाळी ०७.०० वाजता नंधाना तालुका रिसोड जिल्हा वाशिम येथे भव्य असा शेतकरी मेळावा होता. मुसळधार पावसात देखील आदरणीय भाऊंच्या सभेला तोबा गर्दी पाहायला मिळाली. कारण जेव्हा जेव्हा आदरणीय सदाभाऊ खोत यांची सभा असते त्यावेळी गावागावात कुठेही दवंडी पिठायची गरज लागत नाही. भाऊंची सभा म्हटलं की लोकांची पावलं आपोआप सभेकडे वळतात. अगदी सर्व पक्ष लोक भाऊंच भाषण टक लावून ऐकत असतात. हे आम्ही अनेकदा पाहिला आहे.

कार्यक्रम संपल्यानंतर आम्हाला ०९.०० वाजता अकोल्यावरून ट्रेन होती. परंतु कार्यक्रम उशिरा संपल्याकारणाने ट्रेन सापडेल याची अजिबात अपेक्षा नव्हती. ०८.०० वाजता आम्ही आमच्या संग्रामपूरचे गणेशभाऊ पाटील यांच्या गाडीमध्ये बसलो. ७० किलोमीटर अंतर कापायचं होतं. दुसऱ्या दिवशी मंत्रालयात अनेक काम असल्या कारणाने आमचं पोहोचणे देखील तितकच गरजेचं होत, हे गणेश भाऊंनी ऐकलं होतं. त्यामुळे गणेशरावांनी गाडीचा वेग वाढवला होता परंतु भाऊ गाडीत असल्यामुळे ते सुरक्षित गाडी चालवत होते. दिवसभर गाडी चालवून हैराण झालेले गणेशराव गाडी सापडेल की नाही या द्विधा मनस्थितीत होते. अस असतानाच ट्रेन निघायच्या अगोदरच दहा मिनिट आम्हाला अकोला रेल्वे स्टेशनला सोडले. त्यावर भाऊंनी गणेशरावांचं तोंड भरून कौतुक देखील केलं. आम्हाला सोडायला दोन-चार कार्यकर्त्यांच्या गाडी देखील मागे होत्या.

ट्रेन निघायची वेळ झाली तेव्हा कार्यकर्ते ट्रेनच्या खिडकीमधून हात दाखवत होते. त्यावेळी भाऊ भावनिक होऊन म्हटले, थांबा मीच त्यांना बाहेर पुन्हा भेटून येतो म्हणून ते ट्रेन मधून उतरून बाहेर गेले पुन्हा त्यांची भेट घेतली, सर्वांनी व्यवस्थित आपापल्या घरी जावा आणि मला फोन करा असं बोलले आणि आपल्या सीटवर आले.

खरंतर आपल्या कार्यकर्त्यांवर आपल्या कुटुंबावरच प्रेम करणारे नेते आजकाल खूप कमी आहे. त्यातीलच एक म्हणजे महाराष्ट्राची मुलुख मैदान तोफ आदरणीय सदाभाऊ खोत. भाऊ कायम म्हणतात आजकाल संघटनेमध्ये काम करणारे कार्यकर्ते मिळत नाहीत कारण त्यांना घरची चटणी भाकर खाऊन संघटना चालवायची असते, आंदोलन करायचे असतात. इतर पक्षांसारखं नसतं ज्यामधून कार्यकर्त्याला आर्थिक पाठबळ मिळेल आणि तो सक्षम होईल.

त्यामुळे आदरणीय भाऊ कधीच कुठल्या कार्यकर्त्याला डावलत नाहीत. मग तो किती गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येकाला न्याय द्यायचा ते प्रामाणिक प्रयत्न करत असतात. कोणत्याही शेतकरी संघटनेतील कार्यकर्त्यांनी सांगितलेलं काम हे पहिलं करायचं, असा कानमंत्रच भाऊंनी मला दिला आहे. कारण हे गोरगरीब कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत म्हणूनच आपण येथे आहोत हे आपण कधीच विसरायचं नाही, असे ते कायम सांगतात.

त्यामुळे मी हा टाकलेला फोटो अत्यंत भावूक करणारा आहे. म्हणून सलाम त्या कार्यकर्त्यांना ज्यांनी आपल्या बापासमान जपलं आपल्या नेत्याला आणि सलाम त्या नेत्याला ज्यांनी आपल्या लेकरासमान जपलं कार्यकर्त्यांना...!!!

आपला नम्र
आदिनाथ कपाळे
(स्वीय सहाय्यक - आमदार सदाभाऊ खोत)
दि. १ ऑक्टोबर २०२४

Happy birthday 🎂
04/03/2024

Happy birthday 🎂

27/12/2023

सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणारा आदरणीय उदय सामंत साहेबांसारखा मोठ्या मनाचा नेता हवाच.....❤️

आमच्या गावात उपकेंद्राच्या उद्घाटन प्रसंगी मी गावात केलेल्या विकास कामाबद्दल माझे कौतुक करताना राज्याचे उद्योगमंत्री आदरणीय Uday Ravindra Samant जी 🚨✌️🚨
(वाढदिवसाचे औचित्य)

Happy birthday 🎂 Bharat ji
25/12/2023

Happy birthday 🎂 Bharat ji

21/11/2023

राज्यातील दूध दर प्रश्नासंदर्भात रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत आक्रमक ✌️🚩✊
Sadabhau Khot

Horrifying Pictures From GAZA 🥲
21/10/2023

Horrifying Pictures From GAZA 🥲

15/10/2023

Devendra Fadnavis यांना घेरण्यासाठी विरोधकांकडून आरक्षणाच हत्यार वापरलं जातंय - Sadabhau Khot ✌️✌️✌️

राजकारणातील बाप माणूस Devendra Fadnavis  : Sadabhau Khot
06/10/2023

राजकारणातील बाप माणूस Devendra Fadnavis : Sadabhau Khot

Address

Mumbai

Telephone

+918108844161

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adinath Kapale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Adinath Kapale:

Share