14/04/2026
१३५ वी जयंती: बाबासाहेबांना 'राजकीय नैतिकतेची' खरी मानवंदना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर: एक विचार, एक क्रांती "राजकारण जेव्हा सत्तेसाठी तत्त्वे सोडून भरकटू लागते, तेव्हा नुकसान फक्त जनतेचे आणि संविधानाचे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 'लोकशाही' दिली, पण ती टिकवण्यासाठी 'राजकीय नैतिकता' सर्वात महत्त्वाची असते.
आजच्या फोडाफोडीच्या आणि स्वार्थाच्या राजकारणात बाबासाहेबांचे विचार अधिक प्रकर्षाने आठवतात. त्यांनी म्हटले होते
"संविधान कितीही चांगले असले तरी, ते राबवणारे लोक जर वाईट असतील, तर ते वाईटच ठरेल."
सत्ता येईल आणि जाईल, पण नीतिमत्ता जपली पाहिजे. हीच त्यांना खरी मानवंदना ठरेल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम..!