PK Gaikwad

PK Gaikwad this is social networking

Permanently closed.
30/03/2022

भाजप सेनेची गेली २५ वर्षांची युती खऱ्या अर्थाने आज तुटली. गेले काही दिवस मी शिवसेनेला शिव्या घालत होतो, दोष देत होतो. परंतु माझ्या मुंबईतील काही मित्रांनी पाठवलेल्या अनेक पोस्ट वरून भाजपच या गोष्टीला जवाबदार आहे असे वाटते. त्यांनी जे मुद्दे मांडले ते पुढिल प्रमाणे.

१) मागची १५-२० वर्षे सोडल्यास भाजपला जे यश मिळाले त्यात शिवसेनेचा फार मोठा वाटा आहे. शिवसेना जेव्हा महाराष्ट्रात खूप जोमात होती तेव्हा एक हिंदुत्ववादी पक्ष म्हणून भाजपला देखील पुढे आणण्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले. भाजप सशक्त झाल्यावर पुढे हळूहळू शिवसेनेला संपवायचा प्रयत्न करेल हि शंका सुध्दा शिवसेनेला तेव्हां आली नाही.

२)युती तुटून हिंदुत्ववादी मतांची विभागणी होऊन नये म्हणून शिवसेनेने अनेक वेळा दोन पावलं माघार घेऊन भाजपला जे हवं ते मान्य केले.

३) १९९९ साली शिवसेनेला ६९ व भाजपला ५६ जागा मिळून १२५ जागा + ६ अपक्षांचा पाठिंबा म्हणजे आवश्यक बहुमतापेक्षा जास्त जागा मिळूनही कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकार स्थापन झाले. याचे कारण भाजपला शिवसेनेच्या हाती मुख्यमंत्रीपद द्यायचे नव्हते. गोपीनाथ मुंडेंनाच मुख्यमंत्रीपद मिळाले पाहिजे असा हट्ट करत त्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीला सरकार स्थापन करण्यात मदत केली. शिवसेनेला तेव्हां पहिल्यांदा लक्षात आले कि युतीचे सरकार स्थापन करण्यापेक्षा शिवसेनेला संपवून तिचे स्थान पटकावणे हे भाजपचे पहिले उद्दिष्ट आहे. भाजपने हा विश्वासघात करून सुध्दा दोन्ही पक्षांची मते फुटून त्याचा फायदा कॉंग्रेस-राष्ट्रवादीला मिळू नये यासाठी बाळासाहेब ठाकरे हे प्रमोद महाजनांच्या सांगण्यावरून युती करत राहिले.

४) आज एन डि ए मधे भाजप सारखा दुसरा हिंदुत्ववादी पक्ष फक्त शिवसेनाच आहे. अन्य पक्षांचे बहुसंख्य मतदार हिंदुत्ववादी नाही. त्यामुळे त्या पक्षांचा पाठिंबा मिळवणे शक्य असले तरी त्या पक्षाला मिळणाऱ्या जागा भाजपला मिळणे कठिण जाणार याची कल्पना भाजपला आहे. शिवसेनेच्या बाबतीत असे नाही. शिवसेना संपली कि त्याचे मतदार भाजपलाच मिळणार असल्यामुळे शिवसेनेला संपवणे हा भाजपचा पहिला प्रयत्न आहे.

५) भाजपचा इतिहास पाहता एखाद्या राज्यात शिरकाव करण्यासाठी तिथल्या एका मजबूत प्रादेशिक पक्षाशी युती करायची व हळूहळू त्या पक्षाला काही कळायच्या आधीच संपवून तिथे आपले स्थान भक्कम करायचे. गोव्यातील मगो पक्षाचे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. नितिशकुमार, नविन पटनायक, चंद्राबाबू नायडू हे वेळीच सावध झाल्यामुळे त्यांचे पक्ष जिवंत राहू शकले.

६) केंद्रात सुध्दा शिवसेनेला कसलेच काम करायची संधी न देता खच्चीकरण करून संपवण्याचे कारस्थान भाजप सत्तेवर आल्यापासुन करत आलेला आहे. २०१४ च्या लोकसभेत शिवसेनेला मिळालेल्या जागा १८. मंत्रीपद १. ते सुध्दा अवजड उद्योग मंत्रीपद. ज्या खात्याला फारसे काहीच काम नाही.

अपना दल पक्ष- खासदार २. मंत्रीपद १.
जनता दल युनायटेड- खासदार १६. मंत्रीपद २.
लोक जनशक्ती पक्ष- खासदार ५. मंत्रीपद २.
अकाली दल- खासदार ४. मंत्रीपद २.
अन्य एक पुर्वोतरचा पक्ष ज्याचे नाव विसरलो- खासदार १. मंत्रीपद १.
२०१९च्या लोकसभेतही शिवसेनेचे खासदार १८. मंत्रीपद १. आणि ते सुद्धा मागच्या वेळचेच अवजड उद्योग मंत्रीपद. महत्त्वाचे म्हणजे हे मंत्रीपद सोडून दुसरे चांगले मंत्रीपद देण्यात यावे अशी लिखीत विनंती शिवसेनेने करून सुध्दा तेच खाते देण्यात आले.
हिच बाब महाराष्ट्रात कटाक्षाने पाळण्यात आली. बहुतेक महत्त्वाची मंत्रीपदं भाजपने आपल्याकडे घेत शिवसेनेला मतदारांवर फारसा प्रभाव पाडायची संधी मिळू नये याचीच खबरदारी घेतली.

७) त्यामुळे भाजप सोबत युतीत राहिलो तर हळूहळू भाजप आपल्याला संपवणार याची जाणीव झाल्यावर शिवसेना फक्त संधीची वाट बघत होती. निवडणुकीच्या निकालांनी ती दिल्यावर शिवसेनेने ती संधी सोडली नाही.

८) उध्दव ठाकरेने अमित शहांनी समान जागा वाटप व समान मंत्रीपदं व अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मान्य केले होते हे सांगितल्यावर शहांनी मौन बाळगणे, उध्दव ठाकरेला भेटायचे टाळण्यासाठी महाराष्ट्रात पाऊल न ठेवणे यावरून कोण खोटं बोलत आहे याची कल्पना येते. आणि समजा अमित शहांनी तसा शब्द दिलाच नव्हता असे गृहीत धरले तरी आपल्याच मित्रपक्षाला अर्धवेळ मुख्यमंत्रीपद देण्याचे मान्य करून युतीचे सरकार स्थापन करायला काय हरकत होती? म्हणजेच काहीही झाले तरी शिवसेना संपवायची हा एक कलमी कार्यक्रम भाजपचा होता.

९) केंद्रात भाजपचे सरकार असल्यामुळे भाजपला दुखवता कामा नये हे न समजण्या इतकी मुर्ख शिवसेना नक्कीच नाही. पण शेवटी शिवसेनेने जर ठरवले असेल कि भाजप सोबत राहून संपण्यापेक्षा कॉंग्रेस सोबत राहून जगण्यासाठी धडपड करुया तर ते अयोग्य नक्कीच नाही.
हे सगळे वरील मुद्दे वाचल्यावर त्यात बरेच तत्थ असल्याचे मला सुध्दा जाणवले. *महाराष्ट्रातील भयानक परिस्थिती*
*आतातरी डोळे उघडा*....!!!!

*गुजराती* नेत्यांचे आजच्या घडीला सर्वाधिक *शुभचिंतक आणि समर्थक* हे मराठी तरुण आहेत ही *सर्वाधिक शरमेची* बाब आहे.... गुजराती मूळ असलेले नरेंद्र मोदी, अमित शहा, पियुष गोयल हे जणू आमचा भविष्यकाळच बदलणार आहेत याच अविर्भावात *मराठी तरुण समाज माध्यमांवर फुलटाईम ऑनलाईन* असतात.
परंतु हेच *गुजराती नेते महाराष्ट्र, मुंबई आणि मराठी तरुणाच्या पोटापाण्याचा प्रश्न कायमचा हिरावून घेण्याची योजना सध्या गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये आखत आहेत*. याची या अंध मोदी भक्ताना कल्पनाही नाही.. बाजूची इतर राज्य म्हणजे कर्नाटक आणि आंध्रप्रदेश देखील विकसित होत आहेत... परंतु त्यामुळं महाराष्ट्राचे कोणतंही *अहित* होत नाही... झालं नाही..पण.., गुजरातचा होऊ घातलेला विकास हा *महाराष्ट्र द्वेष आणि*कुटील कारस्थानावर* आधारलेलाआहे हे आम्हाला कधी समजणार..... ? *आठवा महाराष्ट्र निर्मितीच्यावेळी मोरारजी देसाईंने घेतलेले १०५ मराठी माणसांचे बळी*....!!

गुजरातमध्ये सध्या जे सुरु आहे, ते महाराष्ट्राचे *भयंकर नुकसान* करणारे आहे... मराठी तरुणांचं वाचनच संपल्याने ते *संभ्रम* निर्माण करणाऱ्या पेड माध्यमांच्या हेडलाईन्समधून *फसवले* जात आहेत.

मात्र हेच मराठी तरुणांना समजवून सांगणारे राज ठाकरे त्यांच्यासाठी *टिंगल टवाळीचा* विषय बनले आहेत हे *धक्कादायक* आहे. *चिंताजनक*आणि उद्वेगजनक* आहे...

कारण त्यांच्या समाज माध्यमांच्या *विकृतीतून इतका ब्रेनवॉश* केला जात आहे की कुणीही समजून किंवा ऐकून घेण्याच्या *मनस्थितीत* दिसत नाही, हे त्यांच्याशी *संवाद* साधल्यावर स्पष्ट होत आहे..
दुर्दैवाने त्यात *"सुशिक्षित मूर्खांचा* अधिक भरणा आहे हे *धक्कादायक आणि खूप धोकादायक* आहे हे मुद्दाम याठिकाणी म्हणावं लागेल.

देशाची नवी आर्थिक राजधानी उभारणीचं अर्थात *फायनान्शियल कॅपिटल सिटीची* योजना गुजरातमध्ये आखली गेली आहे. मागील वर्षी म्हणजे २०१८ पासून त्यावर प्रत्यक्ष *जोरदारपणे* काम सुरु आहे.
स्वतः नरेंद्र मोदी त्यावर विशेष लक्ष ठेवून आहेत. सिंगापूर आणि हॉंगकॉंगच्या धर्तीवर अहमदाबाद-गांधीनगरच्या दरम्यान निर्माण करण्यात येत असलेलं हे नवं शहर " *गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी"* अर्थात ‘गिफ्ट’ या नावाने उभारण्यात येत आहे.

दरम्यान, या योजनेचा आणि महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यास केल्यास, सदर योजना *मुंबईचं आर्थिक अस्तित्व संपुष्टात आणण्यासाठीच आखली जात आहे* याचा प्रत्यय येईल . जागतिक आर्थिक संघटनेने म्हणजे ‘डब्लू.इ.एफ’ने त्याच्या अहवालात म्हटलं आहे की, सिंगापूर, हॉंगकॉंग ही शहर जगातील मोठी आर्थिक केंद्र आहेत. त्यामुळे तिथेच सर्वाधिक गुंतवणुकीला पसंती दिली जाते. त्यामुळे *मुंबईच भौगोलिक महत्व लक्षात घेऊन त्यावरच घाव घालून मुंबईच आर्थिक अस्तित्व प्रथम संपुष्टात आणून मुंबईतील महत्वाची केंद्र सरकारची कार्यालयं, मोठं मोठे उद्योग समूह आणि निर्यातीसाठी वापरल्या जाणाऱ्या बंदरांचे महत्व कमी करून तिथल दळणवळण गुजरातमधील अदानी बंदराकडे वर्ग करण्याची योजना अमलात आणली जात आहे*.

त्याची उदाहरणंच द्यायची झाल्यास मुंबई पोर्ट ट्रस्ट ला *विकासाच्या* नावावर *बंद* करून तीथले सर्व व्यवहार हे *गुजरातमधील विविध बंदराकडे वळविण्यात आले आहेत* त्यामुळे मुंबईची रयाच गेली आहे. *दक्षिण मुंबईतील पंचरत्न बिल्डिंगमधील डायमंड मार्केट, भिवंडीचे कपडा मार्केट, यार्न आणि साडी मार्केट गुजराती व्यापाऱ्यांना हाताशी धरून सुरतला घेऊन गेले*. *बेलापूरचे रासायनिक कारखाने गुजरातमधील भरूच नजिकच्या दहेजमध्ये घेऊन गेले. तर मुंबईतील अनेक आयटी हब्स अहमदाबादमध्ये वळवले आहेत, तर टाइल्सचा उद्योग वापीला पळवला आहे*.

तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या *भूगोलाचा* अभ्यास केल्यास पालघर आणि आसपासचा भूभाग गुजरात सीमेला लागून असल्याने सध्या गुजराती समाज इथले *शेकडो एकरचे प्लॉट स्वतःच्या समाजाकडे पैसे फेकून विकत घेत आहे*. बुलेट ट्रेन सत्यात उतरल्यास हा पट्टा नावाला महाराष्ट्राचा भूभाग असेल, पण इथली *भाषा आणि संस्कृती* केवळ *गुजराती* असेल यात काहीच शंका नाही. याच पट्यात मोठ्या प्रमाणावर *आदिवासी आणि आगरी* समाज असल्याने त्यांच्या अज्ञानाचा फायदा जमिनी हडप करताना गुजराती व्यापारी दिसत आहेत. आजही या सीमेवरील परिसराचा फेरफटका मारल्यास इथे नावांच्या पाट्या देखील मोठ्या प्रमाणावर *गुजराती* भाषेत दिसतात.

स्वतः नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्याने स्वतःच्या कार्यकाळात ते देशाला स्मार्ट सिटीची स्वप्न दाखवत वास्तविक *गुजरातमधील ‘गिफ्ट सिटी’वर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे* देशातील इतर नियोजित स्मार्ट सिटी या केवळ कागदावर असतील आणि इंटरनेट दिलं म्हणजे शहर स्मार्ट झालं हा *बिनडोक* विचार तरुणांच्या माथी थोपवला जात आहे. दरम्यान, राज ठाकरे याच विषयावर महाराष्ट्रातील तरुणांना संधी मिळेल तिथे समजावत आहेत आणि याची पूर्ण जाणीव गुजरातच्या नेत्यांना असल्याने ते राज ठाकरेंच्या वक्तव्यावर व्यक्त होण्याच्या रणनीतीचा अवलंब करताना दिसत आहेत. कारण राज ठाकरेंच्या प्रश्नांना उत्तर दिली तर विषय मोठ्याप्रमाणावर *प्रकाशझोतात येईल आणि गुजराती उद्योग नीती कचाट्यात अडकेल हे त्यांना ठाऊक आहे.* त्यामुळेच सध्या उत्तर भारतीयांपेक्षा गुजराती समाज हा राज ठाकरेंचा सर्वाधिक *द्वेष* करणारा झाल्याचे सहज निदर्शनास येते. त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांनी हा विषय *गांभीर्याने आणि अभ्यासूपणे* समजून घेतला पाहिजे*. *अन्यथा केवळ मुंबईच नव्हे... तर अख्खा महाराष्ट्रच गुजरातने गिळंकृत केलेला असेल*....

16/03/2022

बर हिजाब बंद तर बंद ,मग बाकीचे पण नखरे बंद करा ,रक्षाबंधन, पाडवा,लक्ष्मीबाई पुजा,हे सगळे फालतु चे नखरे पण बंद झाले पाहिजेत, त्या साठी बाकीच्यां लोकांनी पण कोर्टात गेल पाहीजे.

09/03/2022

Follow me

Address

Nagpur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when PK Gaikwad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category