02/09/2026
नागरिकांना दर्जेदार, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मिळावी यासाठी नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत शहरातील सर्व ६६२ नोंदणीकृत रुग्णालयांची तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत २११ रुग्णालयांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे.या मोहिमेत रुग्णालयातील,खाटांची उपलब्धता, , अग्निसुरक्षा व्यवस्था, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन यांची तपासणी करण्यात येत आहे.
आज मा. वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीच्या सभापती श्रीमती मनिषा अतकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दळवी स्मारक रुग्णालय व अनुसंधान केंद्र (धर्मादाय रुग्णालय), श्रेयस हॉस्पिटल आणि तारांगण हॉस्पिटल येथे भेट देऊन नागरिकांसाठी उपलब्ध सोयी-सुविधांची पाहणी करण्यात आली.
यावेळी मा. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अन्न निरीक्षक श्री. मुकुंद खुजे व धर्मदाय रुग्णालयाचे डॉ. सोनल भट्टी, डॉ. आभा कुंभारे तसेच मनपाचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.