Nagpur Police Commissionerate

Nagpur Police Commissionerate This is the new channel of communication between the police and the members of society.
(3)

पोलीस आयुक्तालय, नागपूर शहर येथील पाचपावली पोलीस ठाणे, मानकापूर पोलीस ठाणे, हुडकेश्वर पोलीस ठाणे, गुन्हे शाखा युनिट-५, प...
21/07/2026

पोलीस आयुक्तालय, नागपूर शहर येथील पाचपावली पोलीस ठाणे, मानकापूर पोलीस ठाणे, हुडकेश्वर पोलीस ठाणे, गुन्हे शाखा युनिट-५, परिमंडळ क्र. २ सायबर तसेच पोलीस मुख्यालय येथील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांचा मा. पोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

⚠️ नागरिकांना महत्त्वाचे आवाहनसमृद्धी महामार्गावरील पुलगाव येथे झालेल्या अपघातामुळे वाहतूक प्रभावित झाली आहे.नागपूरहून प...
20/07/2026

⚠️ नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

समृद्धी महामार्गावरील पुलगाव येथे झालेल्या अपघातामुळे वाहतूक प्रभावित झाली आहे.

नागपूरहून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी कृपया धामणगाव येथून समृद्धी महामार्गावर प्रवेश करावा.

अनावश्यक प्रवास टाळा. सुरक्षित प्रवास करा.

तुमचा OTP म्हणजे तुमच्या खात्याची चावी. ती कोणालाही देऊ नका. 🔑🔒
18/07/2026

तुमचा OTP म्हणजे तुमच्या खात्याची चावी. ती कोणालाही देऊ नका. 🔑🔒

😊 इमोजींच्या सोप्या भाषेत, सुरक्षिततेचा महत्त्वाचा संदेश! 🚔जागतिक इमोजी दिनानिमित्त, नागपूर पोलिसांकडून सायबर सुरक्षा, व...
17/07/2026

😊 इमोजींच्या सोप्या भाषेत, सुरक्षिततेचा महत्त्वाचा संदेश! 🚔

जागतिक इमोजी दिनानिमित्त, नागपूर पोलिसांकडून सायबर सुरक्षा, वाहतूक नियम, महिला सुरक्षा आणि व्यसनमुक्तीबाबत जनजागृती.

अपर मुख्य सचिव श्रीमती मनीषा पाटणकर म्हैसकर  यांनी नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या कामकाजाचा तसेच प्रशासकीय अडचणींचा सवि...
16/07/2026

अपर मुख्य सचिव श्रीमती मनीषा पाटणकर म्हैसकर यांनी नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या कामकाजाचा तसेच प्रशासकीय अडचणींचा सविस्तर आढावा घेतला.

यावेळी शासन स्तरावर प्रलंबित प्रस्तावांचा आढावा घेऊन त्यांचा विहित वेळेत प्रभावी पाठपुरावा करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पोलीस आयुक्त तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शहरातील पोलिसिंगमधील नाविन्यपूर्ण उपक्रम आणि गुन्हे प्रतिबंधासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचे सादरीकरण केले.

महिला, बालके आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत मा. पंतप्रधानांनी अपेक्षित केलेले स्मार्ट पोलिसिंग नागपुरात प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्वंकष पावले उचलण्याचे आवाहन श्रीमती म्हैसकर यांनी केले.

याप्रसंगी उत्कृष्ट तपास करून दोषसिद्धी मिळविणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा तसेच विशेष कामगिरी बजावणाऱ्या पोलीस अंमलदारांचा प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला.

माननीय श्री वसंत परदेशी अप्पर पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभाग यांनी विभागातील नवीन पदोन्नती झालेल्या सहाय्यक पोलीस उ...
14/07/2026

माननीय श्री वसंत परदेशी अप्पर पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभाग यांनी विभागातील नवीन पदोन्नती झालेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांना कुटुंबासमवेत ऑफिसला बोलावून मिठाई तसेच पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन अभिनंदन केले.

मा. पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचा प्रशंसापत्र देऊन गौरव करण...
13/07/2026

मा. पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचा प्रशंसापत्र देऊन गौरव करण्यात आला.

कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हे उघडकीस आणणे व नागरिकांना तत्पर सेवा देणे या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संबंधितांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी पोलीस आयुक्तांनी सर्वांना पुढेही याच समर्पणाने व प्रामाणिकपणे सेवा बजावण्याचे आवाहन केले. या गौरवामुळे अधिकारी व अंमलदारांना अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाली.

राइड स्टायलिश असो, पण हेल्मेट नेहमी असो.
12/07/2026

राइड स्टायलिश असो, पण हेल्मेट नेहमी असो.

आवाज ओळखीचा असला तरी विश्वास ठेवण्यापूर्वी खात्री करा. सावध राहा, सुरक्षित राहा.
09/07/2026

आवाज ओळखीचा असला तरी विश्वास ठेवण्यापूर्वी खात्री करा. सावध राहा, सुरक्षित राहा.

Address

Police Headquarters
Nagpur
440013

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nagpur Police Commissionerate posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Nagpur Police Commissionerate:

Shortcuts

Share