Geetanjali Buty - member of mscpcr महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोग'

  • Home
  • India
  • Nagpur
  • Geetanjali Buty - member of mscpcr महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोग'

Geetanjali Buty - member of mscpcr महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोग' Member of MSCPCR (महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोग)

https://www.facebook.com/share/1CKEfHxgxU/?mibextid=wwXIfr
14/08/2026

https://www.facebook.com/share/1CKEfHxgxU/?mibextid=wwXIfr

महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून बाल हक्क, बाल संरक्षण आणि बालकांशी संबंधित कायदे व यंत्रणांबाबत व्यापक जनजागृती करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने गणेशोत्सव मंडळांना केले आहे.

बालकांना शिक्षण, सुरक्षितता, सन्मानाने जगणे आणि शोषणापासून संरक्षणाचा हक्क आहे. बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम, बालविवाह प्रतिबंध, बालमजुरी, बाल तस्करी तसेच बालकांवरील अत्याचार व शोषण याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घ्यावा, असे आयोगाने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

या अभियानाद्वारे बाल कल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, विशेष बाल पोलीस पथक, बाल हेल्पलाईन, बाल संरक्षण सेवा तसेच महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या ‘चिराग’ ॲप आणि तक्रार निवारण व्यवस्थेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गणेशोत्सव काळात बालकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी निबंध लेखन, चित्रकला, पोस्टर मेकिंग, घोषवाक्य लेखन, वक्तृत्व आणि बाल हक्क विषयक जनजागृतीपर उपक्रम आयोजित करण्यासही गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन देण्यात येत आहे.
#बालहक्क #बालविवाहप्रतिबंध #बालसंरक्षण #महागणेशोत्सव #राज्यउत्सव

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बालभारतीची जी नवीन पुस्तके आली आहेत त्यामध्ये सर्व इयत्तांच्या पुस्तकांमध्ये असे एक पान दि...
12/08/2026

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बालभारतीची जी नवीन पुस्तके आली आहेत त्यामध्ये सर्व इयत्तांच्या पुस्तकांमध्ये असे एक पान दिले आहे

*पोलिसांनी बालकांप्रती संवेदनशील व बालक-केंद्रित दृष्टिकोन ठेवावा – विश्वास नांगरे पाटील* नागपूर | दि. १२ ऑगस्ट २०२६ : ब...
12/08/2026

*पोलिसांनी बालकांप्रती संवेदनशील व बालक-केंद्रित दृष्टिकोन ठेवावा – विश्वास नांगरे पाटील*

नागपूर | दि. १२ ऑगस्ट २०२६ : बालकांशी संबंधित प्रकरणांमध्ये कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करताना पोलिसांनी बालकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन संवेदनशील व बालक-केंद्रित दृष्टिकोन ठेवावा, असे आवाहन नागपूर शहराचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केले.

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, होप फॉर चिल्ड्रेन फाउंडेशन, पुणे आणि जिल्हा बाल संरक्षण कक्ष, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस आयुक्तालय, नागपूर येथे बाल न्याय अधिनियम व POCSO कायद्याबाबत जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

कार्यशाळेत बालकांचे हक्क, बालकांवरील लैंगिक अत्याचारास प्रतिबंध, POCSO कायद्याच्या तरतुदी आणि बालकांशी संबंधित प्रकरणांमध्ये विविध यंत्रणांची भूमिका व जबाबदाऱ्या याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
आयोगाच्या सदस्या गीतांजली बुटी, सदस्य प्रवीण भुजाडे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे, न्यायाधीश भाग्यश्री कोठावळे यांच्यासह पोलीस, महिला व बाल विकास विभाग तसेच बाल संरक्षण यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

बालकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस, महिला व बाल विकास विभाग, बाल न्याय मंडळ, बाल कल्याण समिती आणि चाईल्ड हेल्पलाईन यांनी समन्वयाने व संवेदनशीलतेने काम करणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यशाळेदरम्यान बालकांच्या हक्कांचे संरक्षण व सुरक्षिततेबाबत जनजागृती करणाऱ्या पोस्टरचे विमोचन करण्यात आले.

गडचिरोली आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या सर्पदंशाच्या घटनेबाबत राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची आढावा बैठकनागपूर/गडचिरोली, ...
12/08/2026

गडचिरोली आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या सर्पदंशाच्या घटनेबाबत राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची आढावा बैठक

नागपूर/गडचिरोली, दि. ११ ऑगस्ट २०२६ : गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळेत प्रवेशित विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने घटनेचा सविस्तर आढावा घेण्यासाठी नागपूर येथे अपर आदिवासी आयुक्तांसोबत आढावा बैठक घेण्यात आली.

या बैठकीत आश्रमशाळेतील विद्यार्थिनींची सुरक्षा, आरोग्यविषयक सुविधा, सर्पदंशाची घटना नेमक्या कोणत्या परिस्थितीत घडली, विद्यार्थिनींना देण्यात आलेली तातडीची वैद्यकीय मदत, उपचारांची व्यवस्था तसेच आश्रमशाळेतील प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आश्रमशाळेच्या परिसराची नियमित पाहणी करणे, परिसरातील स्वच्छता राखणे, झुडपे व वाढलेले गवत वेळोवेळी साफ करणे, आवश्यक ठिकाणी पुरेशी प्रकाशव्यवस्था उपलब्ध करणे, सर्पदंशासह इतर संभाव्य धोक्यांपासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध होईल, याची दक्षता घेण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

आश्रमशाळांमध्ये प्रवेशित बालकांची सुरक्षा व संरक्षण ही सर्वोच्च प्राथमिकता असून, अशा घटना भविष्यात घडू नयेत यासाठी संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने ठोस व प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश आयोगाच्या वतीने देण्यात आले.

तसेच घटनेनंतर विद्यार्थिनींना देण्यात आलेली वैद्यकीय मदत, त्यांच्या आरोग्याची सद्यस्थिती, करण्यात आलेली प्रशासकीय कार्यवाही आणि आश्रमशाळेतील सुरक्षा व्यवस्थेबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. या प्रकरणातील कार्यवाहीचा तसेच भविष्यातील प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा पुढील काळातही आयोगाच्या वतीने आढावा घेण्यात येणार आहे.

या आढावा बैठकीस महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या श्रीमती गीतांजली बुटी, अपर आदिवासी आयुक्त श्रीमती आयुषी सिंग, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. सुनील मेसरे तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्री. मुस्ताक पठाण यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

— महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई

09/08/2026
*जालना येथे महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने प्रकरणांची सुनावणी व बाल हक्कांशी संबंधित विविध विभागांची ...
09/08/2026

*जालना येथे महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने प्रकरणांची सुनावणी व बाल हक्कांशी संबंधित विविध विभागांची आढावा बैठक यशस्वीरित्या पार पडली.*

*महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या मार्गदर्शनाखाली बीड येथे बाल न्याय अधिनियम व पोक्सो अधिनियम विषयक विशेष कार...
09/08/2026

*महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या मार्गदर्शनाखाली बीड येथे बाल न्याय अधिनियम व पोक्सो अधिनियम विषयक विशेष कार्यशाळा संपन्न*

बीड, दि. ६ ऑगस्ट २०२६ : महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या आदेशानुसार, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, बीड, जिल्हा महिला व बाल विकास विभाग आणि होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बीड येथे "बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१५" तसेच "लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (POCSO) अधिनियम, २०१२" या विषयांवरील विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

Address

Shradhanand Peth
Nagpur
440022

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Geetanjali Buty - member of mscpcr महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोग' posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category