04/06/2026
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा!
कोटोल, कळमेश्वर आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्पांना राज्य शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. 🍊
या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर प्रक्रिया, पॅकिंग आणि विपणनाची सुविधा उपलब्ध होणार असून त्यांच्या उत्पादनाला अधिक चांगला बाजारभाव मिळण्यास मदत होईल. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देत विदर्भातील संत्रा उद्योगाला नवी गती देणारा हा ऐतिहासिक टप्पा आहे.