Nagpur Forest Department - T

Nagpur Forest Department - T Official account of Deputy Conservator of Forest Nagpur (Territorial)

Dr. Vinita Vyas, IFS, Deputy Conservator of Forests, Nagpur Forest Division (T), briefed Hon’ble CM Shri Devendra Fadnav...
21/08/2026

Dr. Vinita Vyas, IFS, Deputy Conservator of Forests, Nagpur Forest Division (T), briefed Hon’ble CM Shri Devendra Fadnavis on the restoration of Ambazari Lake, focusing on improving water quality, restoring the lake ecosystem, enhancing biodiversity, and systematically reviving native flora.

Restoring Ambazari Lake, Reviving an Urban EcosystemOn 20 August 2026, Hon’ble Chief Minister Shri Devendra Fadnavis ins...
20/08/2026

Restoring Ambazari Lake, Reviving an Urban Ecosystem

On 20 August 2026, Hon’ble Chief Minister Shri Devendra Fadnavis inspected the historic Ambazari Lake and reviewed the ongoing restoration, development and cleanliness works aimed at improving water quality and restoring the health and ecological balance of this important urban freshwater ecosystem.

The restoration initiative focuses on improving water quality, restoring the lake ecosystem, enhancing biodiversity and systematically reviving the native flora associated with the Ambazari landscape. The objective is to restore the lake to a healthy, sustainable freshwater ecosystem while strengthening its ecological and recreational value.

The visit was attended by Hon’ble Mayor Smt. Neeta Thakre; Hon’ble Deputy Mayor Smt. Leela Hathibed; Hon’ble Chairperson of the Standing Committee Smt. Shivani Dani-Wakhare; Hon’ble Ruling Party Leader Shri Narendra (Balya) Borkar; Hon’ble Commissioner of Nagpur Municipal Corporation Dr. Vipin Itankar; Hon’ble Deputy Conservator of Forests, Nagpur Forest Division (Territorial), Dr. Vinita Vyas, IFS; along with senior officers and staff.
----

दिनांक २० ऑगस्ट २०२६ रोजी मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर शहरातील ऐतिहासिक अंबाझरी तलावाची पाहणी करून तलावाच्या सुरू असलेल्या पुनरुज्जीवन, विकास व स्वच्छता कामांचा आढावा घेतला. या कामांचा मुख्य उद्देश जलगुणवत्ता सुधारणे तसेच या महत्त्वपूर्ण नागरी गोड्या पाण्याच्या परिसंस्थेचे आरोग्य व पर्यावरणीय संतुलन पुनर्स्थापित करणे हा आहे.

अंबाझरी तलावाच्या पुनरुज्जीवनाच्या या उपक्रमामध्ये जलप्रदूषण कमी करून जलगुणवत्ता सुधारणे, तलाव परिसंस्थेचे पुनर्स्थापन, जैवविविधतेचे संवर्धन तसेच अंबाझरी परिसरातील स्थानिक वनस्पतींचे शास्त्रशुद्ध व पद्धतशीर पुनरुज्जीवन यावर भर देण्यात येत आहे. या माध्यमातून तलावाचे निरोगी व शाश्वत गोड्या पाण्याचे परिसंस्थेत पुनरुज्जीवन करण्यासोबतच त्याचे पर्यावरणीय व नैसर्गिक महत्त्व अधिक बळकट करण्याचे उद्दिष्ट आहे.

यावेळी मा. महापौर सौ. नीता ठाकरे; मा. उपमहापौर सौ. लीला हातीबेड; मा. स्थायी समिती सभापती सौ. शिवानी दाणी-वाखरे; मा. सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर; मा. नागपूर महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर; मा. उपवनसंरक्षक, नागपूर वन विभाग (प्रादेशिक), डॉ. विनीता व्यास, भा.व.से. तसेच वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Visit to Khekranala Site, Khapa Range Hon'ble MLA Dr. Ashish Deshmukh (Saoner) and Hon'ble MLC Dr. Rajeev Potdar, along ...
07/08/2026

Visit to Khekranala Site, Khapa Range

Hon'ble MLA Dr. Ashish Deshmukh (Saoner) and Hon'ble MLC Dr. Rajeev Potdar, along with Dr. Vinita Vyas, IFS, Deputy Conservator of Forests, Nagpur Forest Division (Territorial), visited the Khekranala site at Badegaon, Saoner Khapa Range, to review the project concept, development plans, and the area's eco-tourism potential.

The proposed eco-tourism project aims to develop Khekranala as a prominent sustainable nature-based eco-tourism site, create large-scale employment opportunities for local communities, and contribute to the overall development of the region while conserving its rich natural heritage.

During the visit, Shri Yash Kale, IFS, Assistant Conservator of Forests; Shri Vijay Gangawane, Range Forest Officer, Khapa; along with officers and staff of the irrigation department, Round Officers, Forest Guards, and other Forest Department staff were present.
----

मा. आमदार डॉ. आशिष देशमुख (सावनेर) आणि मा. विधान परिषद सदस्य डॉ. राजीव पोतदार यांनी डॉ. विनीता व्यास, भा.व.से., उपवनसंरक्षक, नागपूर वन विभाग (प्रादेशिक) यांच्या समवेत सावनेर तालुक्यातील खापा वनपरिक्षेत्रांतर्गत बडेगाव येथील खेखरानाला परिसराची पाहणी केली. यावेळी प्रस्तावित प्रकल्पाची संकल्पना, विकास आराखडा तसेच परिसरातील इको-टुरिझमच्या दृष्टीने असलेली क्षमता यांचा आढावा घेण्यात आला.

प्रस्तावित इको-टुरिझम प्रकल्पाच्या माध्यमातून खेखरानाला परिसराचा शाश्वत व निसर्गाधारित पर्यटनस्थळ म्हणून विकास करणे, स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच परिसराच्या नैसर्गिक वारशाचे संवर्धन करत सर्वांगीण विकासाला चालना देणे हा उद्देश आहे.

यावेळी श्री. यश काळे, भा.व.से., सहाय्यक वनसंरक्षक; श्री. विजय गंगावणे, वनपरिक्षेत्र अधिकारी, खापा तसेच सिंचन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, क्षेत्रीय अधिकारी, वनरक्षक आणि वनविभागाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Highlights from Today's Meeting with Hon'ble MLA Shri Vikas ThakreA discussion was held with Hon'ble MLA Shri Vikas Thak...
03/08/2026

Highlights from Today's Meeting with Hon'ble MLA Shri Vikas Thakre

A discussion was held with Hon'ble MLA Shri Vikas Thakre regarding local issues and possible measures to ensure better management of forest land and enhance public convenience.

The Nagpur Forest Division remains committed to address local issues through appropriate and sustainable measures.
---

मा. आमदार श्री. विकास ठाकरे यांच्यासोबत स्थानिक प्रश्न तसेच वनजमिनीचे अधिक प्रभावी व्यवस्थापन आणि नागरिकांच्या सोयीसुविधा वाढविण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली.

स्थानिक प्रश्नांवर योग्य आणि शाश्वत उपाययोजनांच्या माध्यमातून कार्यवाही करण्यासाठी नागपूर वन विभाग सदैव कटिबद्ध आहे.


Vinita Vyas Maha Forest

01/08/2026

Tree Plantation Campaign Launched in Nagpur

Tree Plantation Campaign Launched in NagpurOn 01 August 2026, the Tree Plantation Campaign was inaugurated at Lok Bhavan...
01/08/2026

Tree Plantation Campaign Launched in Nagpur

On 01 August 2026, the Tree Plantation Campaign was inaugurated at Lok Bhavan, Nagpur, by Hon'ble Governor of Maharashtra, Shri Jishnu Dev Varma, in the presence of Hon'ble Union Minister Shri Nitin Gadkari; Hon'ble Minister of State Dr. Pankaj Bhoyar; Hon'ble Mayor Smt. Nita Thakre; Hon'ble Member of Rajya Sabha Smt. Maya Ivnate; Hon'ble MLA Shri Mohan Mate; Hon'ble MLA Shri Pravin Datke; Hon'ble Deputy Mayor Smt. Leela Hathibed; Hon'ble Chairperson of the Standing Committee Smt. Shivani Dani Wakhare; Hon'ble Ruling Party Leader Shri Narendra (Balya) Borkar; Chairman, Nagpur Improvement Trust, Shri Sanjay Meena; Shri Dr. Vipin Itankar, IAS, Municipal Commissioner, Nagpur; Shri M. Srinivasa Rao, IFS, Principal Chief Conservator of Forests (HoFF), Maharashtra; Shri Vinayak Mahamuni, IAS, Chief Executive Officer, Zilla Parishad, Nagpur; Shri Dayashankar Tiwari, Former Mayor; Shri Vishwanath Suresh, CMD, MOIL; Shri Hemant Pandey, CMD, WCL; and Dr. Satish Wate, President, Green Foundation, along with other dignitaries.

The campaign is being jointly implemented by the Nagpur Municipal Corporation, Nagpur Improvement Trust, District Administration, Zilla Parishad, Nagpur Forest Division, and Green Foundation with the aim of planting 10 lakh saplings across Nagpur city and district during the month of August.

The programme was also attended by Dr. Vinita Vyas, IFS, Deputy Conservator of Forests, Nagpur Forest Division (Territorial) and Dr. Bharat Singh Hada, Member Secretary, Maharashtra State Biodiversity Board, along with senior officers and officials from various departments.

The Nagpur Forest Division is proud to contribute 5 lakh saplings to this mega plantation drive, reaffirming its commitment to increasing green cover and promoting environmental conservation.
----

दि. ०१ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर येथील लोकभवन परिसरात महाराष्ट्राचे मा. राज्यपाल श्री. जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते वृक्षारोपण महाअभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मा. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी; मा. राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर; मा. महापौर श्रीमती नीता ठाकरे; मा. राज्यसभा सदस्य श्रीमती माया इवनाते; मा. आमदार श्री. मोहन मते; मा. आमदार श्री. प्रवीण दटके; मा. उपमहापौर श्रीमती लीला हाथीबेड; स्थायी समितीच्या मा. सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे; सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर; नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती श्री. संजय मीना; नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपीन इटणकर, भा.प्र.से.; महाराष्ट्राचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) श्री. एम. श्रीनिवास राव, भा.व.से.; नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनायक महामुनी, भा.प्र.से.; माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी; मॉईलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विश्वनाथ सुरेश; डब्ल्यूसीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. हेमंत पांडे; तसेच ग्रीन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश वटे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, नागपूर वन विभाग आणि ग्रीन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ऑगस्ट महिन्यात नागपूर शहर व जिल्ह्यात एकूण १० लाख रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

या कार्यक्रमास डॉ. विनीता व्यास, भा.व.से., उपवनसंरक्षक, नागपूर वन विभाग (प्रादेशिक) आणि डॉ. भारत सिंह हाडा, सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या महाअभियानासाठी नागपूर वन विभागाकडून ५ लाख रोपे उपलब्ध करून देण्यात येणार असून, या माध्यमातून नागपूरच्या हरित आच्छादनात वाढ करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाला चालना देण्याच्या वन विभागाच्या बांधिलकीला बळ मिळणार आहे.

30/07/2026

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन २०२६ निमित्त नागपूर येथे एआय आधारित मानव-वन्यजीव निरीक्षण प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले.


CMOMaharashtra Devendra Fadnavis Ganesh Naik Maha Forest Vinita Vyas

30/07/2026

Glimpses of the International Tiger Day Celebration at IIM Nagpur.


CMOMaharashtra Devendra Fadnavis Ganesh Naik Maha Forest Vinita Vyas Pankaj Rajesh Bhoyar

30/07/2026

International Tiger Day Celebration at IIM Nagpur.

Devendra Fadnavis Ganesh Naik CMOMaharashtra Vinita Vyas

Salaimendha Forest Park is Opening Soon!Nagpur Forest Division is delighted to welcome visitors to the newly developed S...
26/07/2026

Salaimendha Forest Park is Opening Soon!

Nagpur Forest Division is delighted to welcome visitors to the newly developed Salaimendha Forest Park! Nestled amidst lush forests and overlooking the scenic Salaimendha Dam, this new nature destination offers a peaceful retreat just a short drive from Nagpur.

The park features nature trails, a viewing deck, landscaped gardens, wildlife-themed sculptures, selfie points, seating areas, and essential visitor amenities, making it an ideal destination for families, nature enthusiasts, birdwatchers, and eco-tourists.

Stay connected for the official opening date. We look forward to welcoming you to experience nature like never before!

Reconnect with Nature. Explore Responsibly.
----

सलाईमेंढा वन उद्यान लवकरच पर्यटकांच्या सेवेत!

नागपूर वन विभागाकडून विकसित करण्यात आलेले सलाईमेंढा वन उद्यान लवकरच पर्यटकांसाठी खुले होत आहे. हिरव्यागार वनराईने नटलेले आणि नयनरम्य सलाईमेंढा धरणाच्या परिसरात वसलेले हे नवीन निसर्ग पर्यटनस्थळ नागपूरपासून अल्प अंतरावर एक शांत आणि रमणीय अनुभव देणार आहे.

या वन उद्यानात निसर्ग पायवाटा, व्ह्यूइंग डेक, सुशोभित उद्याने, वन्यजीवांवर आधारित शिल्पे, सेल्फी पॉइंट्स, बैठक व्यवस्था आणि आवश्यक पर्यटक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे ठिकाण कुटुंबांसाठी, निसर्गप्रेमींसाठी, पक्षीनिरीक्षकांसाठी आणि पर्यावरण पर्यटनाचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.

अधिकृत उद्घाटनाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.

Address

Zero Miles
Nagpur
440001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nagpur Forest Department - T posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share