Nanded Police

Nanded Police नांदेड पोलीसांचे अधिकृत खाते आपत्कालीन संपर्क: ११२/१००
महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क:
८९७६००४१११
८८५०२००६००
०२२-४५१६१६३५

नायलॉन/चायनीज मांजा जीवघेणा आहे!तो नागरिक, दुचाकीस्वार, पक्ष्यांसाठी अत्यंत धोकादायक असून पर्यावरणालाही घातक आहे.नायलॉन/...
11/01/2026

नायलॉन/चायनीज मांजा जीवघेणा आहे!
तो नागरिक, दुचाकीस्वार, पक्ष्यांसाठी अत्यंत धोकादायक असून पर्यावरणालाही घातक आहे.
नायलॉन/चायनीज मांजाचा वापर व विक्री कायद्याने प्रतिबंधित आहे.
माहिती द्या: 112 | कायदा पाळा – सुरक्षित रहा.

संक्रांत साजरी करा, पण ऑनलाइन फसवणुकीपासून सावध रहा!मोफत गिफ्ट, बंपर ऑफर, लकी ड्रॉच्या आमिषाला बळी पडू नका.अनोळखी लिंक, ...
10/01/2026

संक्रांत साजरी करा, पण ऑनलाइन फसवणुकीपासून सावध रहा!
मोफत गिफ्ट, बंपर ऑफर, लकी ड्रॉच्या आमिषाला बळी पडू नका.
अनोळखी लिंक, OTP किंवा बँक माहिती कोणालाही देऊ नका.
संशयास्पद प्रकार आढळल्यास त्वरित 1945 किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.
तुमच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर – नांदेड पोलीस.


सिटी स्ट्रिट सेफ्टी पथकाच्या धडक कारवाईत सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणाऱ्यांवर कडक पावले! नांदेड शहरातील विव...
09/01/2026

सिटी स्ट्रिट सेफ्टी पथकाच्या धडक कारवाईत सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणाऱ्यांवर कडक पावले!
नांदेड शहरातील विविध भागात कारवाई करत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा ठाम निर्धार.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नांदेड पोलीस सदैव तत्पर!




#नांदेडपोलीस #महाराष्ट्रपोलीस

ऑपरेशन ‘फ्लश आउट’ यशस्वी गोदावरी नदी पात्रात अवैध रेती उत्खनन करणाऱ्या रेती माफियांवर नांदेड ग्रामीण पोलीस व महसूल विभाग...
09/01/2026

ऑपरेशन ‘फ्लश आउट’ यशस्वी
गोदावरी नदी पात्रात अवैध रेती उत्खनन करणाऱ्या रेती माफियांवर नांदेड ग्रामीण पोलीस व महसूल विभागाची संयुक्त धडक कारवाई!
सुमारे ₹27.50 लाखांचा मुद्देमाल जप्त करून पर्यावरण संरक्षणाचा ठाम संदेश दिला आहे.
निसर्ग संरक्षणासाठी अशीच कठोर कारवाई सुरू राहणार!



मोठी कारवाई! स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांच्या प्रभावी तपासातून तब्बल 19 गुन्ह्यांत फरार असलेला आरोपी अटक करण्यात आला ...
09/01/2026

मोठी कारवाई!
स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांच्या प्रभावी तपासातून तब्बल 19 गुन्ह्यांत फरार असलेला आरोपी अटक करण्यात आला असून 07 मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
एकूण जप्त मुद्देमाल किंमत ₹2,24,000/-
नांदेडसह यवतमाळ, चंद्रपूर व तेलंगणातील चोरीचे गुन्हे उघड झाले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
नांदेड पोलीस – सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर!

#मोठीकारवाई
#गुन्हेउघडकीस

नायलॉन मांजाला पूर्णतः बंदी!मानवी जीव, पक्षी व प्राणी यांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण करणाऱ्या नायलॉन मांजाची निर्मिती,...
09/01/2026

नायलॉन मांजाला पूर्णतः बंदी!
मानवी जीव, पक्षी व प्राणी यांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण करणाऱ्या नायलॉन मांजाची निर्मिती, विक्री व वापर हा गुन्हा आहे.
पर्यावरण संरक्षण अधिनियमांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल.
कायद्याचे पालन करा, जीव वाचवा.

जबरदस्त कारवाई, गुन्हेगारांवर धडक!जबरी चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांची तात्काळ व प्रभावी कारवाई.चोरी प्रक...
02/01/2026

जबरदस्त कारवाई, गुन्हेगारांवर धडक!
जबरी चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांची तात्काळ व प्रभावी कारवाई.
चोरी प्रकरणातील आरोपी अटक करून ₹35,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त.
नांदेड पोलीस – कायदा व सुव्यवस्थेसाठी सदैव सज्ज!

#नांदेडपोलीस

२ जानेवारी – महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन सेवेतिल धैर्य, निष्ठा आणि समर्पणाला सलाम.जनतेच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र झटणा...
02/01/2026

२ जानेवारी – महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन
सेवेतिल धैर्य, निष्ठा आणि समर्पणाला सलाम.
जनतेच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र झटणाऱ्या सर्व पोलिस बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा!

01/01/2026

#नववर्ष२०२६ #नववर्षाच्याशुभेच्छा

नववर्ष २०२६ च्या हार्दिक शुभेच्छा! हे नवीन वर्ष सर्वांसाठी आनंद, आरोग्य, शांतता आणि सुरक्षिततेने भरलेले जावो, हीच सदिच्छ...
01/01/2026

नववर्ष २०२६ च्या हार्दिक शुभेच्छा!
हे नवीन वर्ष सर्वांसाठी आनंद, आरोग्य, शांतता आणि सुरक्षिततेने भरलेले जावो, हीच सदिच्छा.
नांदेड पोलीस सदैव आपल्या सेवेस तत्पर

#नववर्ष२०२६ #नववर्षाच्याशुभेच्छा

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! २०२६ हे वर्ष तुमच्यासाठी उत्तम आरोग्य, यश, आनंद आणि नवनवीन संधी घेऊन येवो.तुमचे सर्व स्...
31/12/2025

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
२०२६ हे वर्ष तुमच्यासाठी उत्तम आरोग्य, यश, आनंद आणि नवनवीन संधी घेऊन येवो.
तुमचे सर्व स्वप्न पूर्ण होवोत आणि आयुष्य सुख-समाधानाने फुलो हीच सदिच्छा.

CelebrateSafely

31/12/2025

आपण 2025 ला निरोप देत 2026 मध्ये पदार्पण करत आहोत.
नव्या वर्षाच्या स्वागतादरम्यान कोणतेही गैरवर्तन होऊ देऊ नका.

वाहतुकीच्या नियमांचे पालन करा,
मद्यप्राशन करून वाहन चालवू नका,
समाजाला हानी पोहोचेल अशी कोणतीही कृती टाळा.

जबाबदार नागरिक बना — सुरक्षित नववर्ष साजरे करा.

CelebrateSafely

Address

Supdt. Of Police Vazirabad Nanded
Nanded
431601

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nanded Police posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share