MH माझा

MH माझा महाराष्ट्राच्या हक्काचं पेज

मराठ्यांनो, मुंबई पुन्हा पाहायला नक्की या, ही मुंबई आपलीचं, मराठी माणसाची आहे!पण एक गोष्ट विसरू नका: मागच्या वेळी आपल्या...
31/08/2026

मराठ्यांनो, मुंबई पुन्हा पाहायला नक्की या, ही मुंबई आपलीचं, मराठी माणसाची आहे!

पण एक गोष्ट विसरू नका: मागच्या वेळी आपल्याला पाहताच ज्यांनी पंगती बंद केल्या, त्यांच्या मंडपात पुन्हा जाऊन आपल्या स्वाभिमानाशी तडजोड करू नका.

मंडपात जाऊन स्वाभिमान दुखावून घेण्यापेक्षा. लालबागच्या राजाला आपल्या हृदयात ठेवा..आदर देणाऱ्यांचा आदर करा; अपमान करणाऱ्यांना स्वाभिमानाने उत्तर द्या. मुंबईत या—मानाने या, एकजुटीने या आणि स्वाभिमान जपत या!

- विनोद लक्ष्मण पोखरकर
शेती, माती आणि संस्कृतीशी नाळ जुळलेला एक मराठा

Manoj Jarange: मनोज जरांगे यांचे मराठा बांधवांना मुंबईला जाण्याचे आवाहन
31/08/2026

Manoj Jarange: मनोज जरांगे यांचे मराठा बांधवांना मुंबईला जाण्याचे आवाहन

मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांच्या मागण्यासाठी पुन्हा सुरु केलेल्या आंदोलनावर बोलताना वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज...
29/08/2026

मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांच्या मागण्यासाठी पुन्हा सुरु केलेल्या आंदोलनावर बोलताना वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की ''जरांगे तुला सांगतो म्हातारा होशील, हातात काठी येईपर्यंत ती मागणी मान्य होणार नाही''

अंतरवाली सराटीत होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर जालना पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द करत कडक पोलिस बंदोबस्त!
29/08/2026

अंतरवाली सराटीत होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर जालना पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द करत कडक पोलिस बंदोबस्त!

मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला; आंतरवाली सराटीत कडेकोट पोलीस बंदोबस्तमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पु...
29/08/2026

मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला; आंतरवाली सराटीत कडेकोट पोलीस बंदोबस्त

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसत आहेत. गेल्या तीन वर्षांतील हे त्यांचे 11 वे आंदोलन असल्याने या आंदोलनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यात पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंतरवाली सराटी परिसरात सुमारे 400 पोलिसांसह डीवायएसपी, पीआय, आरसीपी आणि एसआरपीएफची पथके तैनात करण्यात आली आहेत. आंदोलनस्थळी चार ठिकाणी पोलिसांच्या राहुट्याही उभारण्यात आल्या आहेत.

यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी समाजबांधवांना एकाच वेळी मोठ्या संख्येने आंतरवालीत दाखल न होता टप्प्याटप्याने येण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे आंदोलनस्थळी गर्दीचे नियोजन आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.

मराठा आरक्षणासोबतच विद्यार्थ्यांना विविध सवलती मिळाव्यात तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्याज परताव्याबाबतही मागण्या करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास गरज पडल्यास मुंबईकडे कूच करण्याचा पर्यायही मनोज जरांगे पाटील यांनी खुला ठेवला आहे. मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी अर्ज केल्याची माहितीही समोर आली आहे.

आता सरकार या आंदोलनावर काय भूमिका घेते, प्रशासन आणि आंदोलकांमध्ये संवाद होतो का आणि मराठा आरक्षणाच्या मागण्यांवर तोडगा निघतो का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

22/08/2026

दत्तकला शिक्षण संस्थेची तीन विभागांकडून चौकशी; रामदास झोळ व माया झोळ यांच्या अडचणी वाढल्या
रामदास झोळ अद्यापही फरार; अटकेसाठी विशेष पोलिस पथकांची नियुक्ती

करमाळा, प्रतिनिधी : भोंदू मनोहर भोसले याच्याशी आर्थिक हितसंबंध असल्याच्या पोलिस तपासात निष्पन्न झाल्याने
दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ आणि सचिव माया झोळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात माया झोळ यांना पोलिसांनी अटक केली असून रामदास झोळ अद्यापही फरार आहेत. दत्तकला शिक्षण संस्थेबाबत धर्मादाय आयुक्त, शिक्षण विभाग आणि आयकर विभाग या तीनही यंत्रणांमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांची विविध पथके तैनात करण्यात आली असून, विशेष पथकाचीही नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान रामदास झोळ याचा अटकपूर्व जामीन अर्ज बार्शी न्यायालयाने फेटाळला आहे.

मनोहर भोसले आणि दत्तकला शिक्षण संस्थेचे आर्थिक हितसंबंध असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्याचे यापूर्वीच पोलिसांनी सांगितले आहे. मनोहर भोसले याच्याकडून मिळालेल्या कथित पैशांची विल्हेवाट दत्तकला शिक्षण संस्थेच्या माध्यमातून लावल्याचे आणि तपासादरम्यान संस्थेच्या कामकाजातील विविध बाबींमध्ये अनियमितता आढळून आल्याचेही पोलिस तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. त्यामुळे धर्मादाय आयुक्त, शिक्षण विभाग आणि आयकर विभाग या तीनही स्तरांवरील चौकशीमुळे संस्थेच्या अडचणी वाढल्याचे दिसत आहे.

मनोहर भोसले हा अनिष्ट प्रथा, महिलांवरील अत्याचार, बलात्कारासारखे गंभीर गुन्हे तसेच इतर विविध गुन्ह्यांप्रकरणी सध्या तुरुंगात आहे. त्याच्याशी संबंधित आर्थिक व्यवहारांच्या तपासातून दत्तकला शिक्षण संस्थेचा सहभाग निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

तपासादरम्यान दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांचा मनोहर भोसले याच्या कथित अवैध पैशांची विल्हेवाट लावण्यात सहभाग असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

या प्रकरणात मदत केल्याच्या आरोपावरून संस्थेतील राजेंद्र गोकुळ हुंबे याला ११ ऑगस्ट रोजी, तर लक्ष्मीकांत मन्मथ लिगाडे याला १३ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. गुन्ह्याचा तपास सुरू असताना रामदास झोळ यांच्या पत्नी माया झोळ यांचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना १६ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली.

त्यानंतर तिन्ही आरोपींना माढा न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, पोलिसांच्या कोठडीच्या मागणीनंतर न्यायालयाने त्यांना २१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर शुक्रवारी तिन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने माया झोळ यांच्यासह राजेंद्र हुंबे आणि लक्ष्मीकांत लिगाडे या तिघांचीही १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

रामदास झोळ याचा अटकपूर्व जामीन अर्ज बार्शी न्यायालयाने फेटाळला, त्यामुळे झोळ दाम्पत्य यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करीत आहेत. दबंग आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या अधिपत्याखाली एस आय टी स्थापन करण्यात आली आहे.
कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता रामदास झोळ यांचा भुरखा फाडल्यानुळे पोलिसांच्या कामगिरीचे सर्व सामान्य जनतेतून कौतुक होत आहे.

20/08/2026

पुण्याचा गणेशोत्सव म्हणजे आपली अस्मिता आणि शिस्तबद्ध परंपरा. इतरत्र घडणारे चुकीचे प्रकार इथे घडणार नाहीत याची दक्षता माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांनी आणि प्रशासनाने आधीच घ्यावी.

आमदार रोहितदादा पवारांनी अर्ध्या तासात मंजूर करून आणला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ५० कोटींचा निधी.माँसाहेब जि...
19/08/2026

आमदार रोहितदादा पवारांनी अर्ध्या तासात मंजूर करून आणला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ५० कोटींचा निधी.

माँसाहेब जिजाऊंच्या मातृतीर्थ सिंदखेड राजा येथील प्रलंबित विकास आराखड्यासाठी स्थानिकांना दिलेला शब्द पाळला.

COEP च्या विद्यार्थ्यांनी दिलेला शब्द अन् मांडलेली अडचण दादांनी मनावर घेतली. शुल्काबाबत योग्य ती फेररचना करण्याचे निर्दे...
19/08/2026

COEP च्या विद्यार्थ्यांनी दिलेला शब्द अन् मांडलेली अडचण दादांनी मनावर घेतली. शुल्काबाबत योग्य ती फेररचना करण्याचे निर्देश देऊन दादांनी पुन्हा एकदा आपलं विद्यार्थीप्रेम सिद्ध केलं आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी सतत तत्पर असणारं खंबीर नेतृत्व!

19/08/2026

भोंदू मनोहर भोसले प्रकरणात SIT ची मोठी कारवाई

दौंड तालुक्यातील दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिव माया झोळ यांना पोलीस कोठडी. तर संस्थेचे अध्यक्ष रामदास झोळ फरार. आतापर्यंत २३ आरोपी निष्पन्न. १० जणांना अटक. कथित आर्थिक व्यवहारांचे धागेदोर पोहचले संस्थेपर्यंत.

Address

Nanded

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MH माझा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to MH माझा:

Shortcuts

Share