Nanded Loksabha Election 2014

Nanded Loksabha Election 2014 Nanded Loksabha Election 2014

Nanded Lok Sabha constituency (Marathi: नांदेड लोकसभा मतदारसंघ) is one of the 48 Lok Sabha (parliamentary) constituencies in Maharashtra state in western India. Contents

1 Assembly segments
2 Members of Parliament
3 Election results
3.1 General elections 2009
4 See also
5 Notes

Assembly segments

Presently, after the implementation of the delimitation of parliamentary

constituencies in 2008, Nanded Lok Sabha constituency comprises six Vidhan Sabha (legislative assembly) segments. These segments are:[1]

Bhokar
Nanded North
Nanded South
Naigaon
Deglur
Mukhed

Members of Parliament

1967: Venkatarao Tarodekar, Indian National Congress
1971: Venkatarao Tarodekar, Indian National Congress
1977: Keshav Dhongde, Janata Party
1980: Shankarrao Chavan, Indian National Congress
1984: Shankarrao Chavan, Indian National Congress
1987: Ashok Shankarrao Chavan, Indian National Congress
(Bye-elections due to resignation of S B Chavan) [2]

1989: Venkatesh Kabde, Janata Dal
1996: Gangadhar Kunturkar, Indian National Congress
1998: Bhaskarrao Khatgaonkar, Indian National Congress
1999: Bhaskarrao Khatgaonkar, Indian National Congress
2004: Digamber Patil, Bharatiya Janata Party (BJP)
2009: Bhaskarrao Khatgaonkar, Indian National Congress

16/05/2014
`धूम-३`चा आमिर खान इंटरनेटवर                       =======================‘धूम-३’च्या शुटिंगला सुरूवात झालेली आहे. या सि...
11/08/2012

`धूम-३`चा आमिर खान इंटरनेटवर
=======================

‘धूम-३’च्या शुटिंगला सुरूवात झालेली आहे. या सिनेमात आमिर खान चोराच्या भूमिकेत दिसणार आहे. शिकागोमध्ये या सिनेमाचं शुटिंग सुरू झालं आहे. शुटिंगदरम्यान काढण्यात आलेले काही फोटो आता इंटरनेटवर झळकू लागले आहेत.

धूम आणि धूम-२ च्या यशानंतर यशराज फिल्म्सच्या धूम-३ शुटिंग सुरू झालं आहे. अमेरिकेमधील शिकागो येथे धूम-३ चं शुटिंग सुरू आहे. या सिनेमात पहिल्यांदाच आमिर खान चमकणार आहे. आमिर खान यामध्ये नकारात्मक भूमिकेत दिसेल. बुद्धिमान चोराच्या भूमिकेत आमिर खान काही बाईकवरील स्टंटदेखील करणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत उदय चोप्रा आणि अभिषेक बच्चन हे देखील असतील. अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रा हे धूमच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागातही होते. पहिल्या भागात जॉन अब्राहमने तर दुसऱ्या भागात हृतिक रोशनने स्टाइलिश चोराची भूमिका साकारली होती.

या सिनेमात आमिर खान पहिल्यांदाच अभिषक बच्चनसोबत काम करणार आहे. याशिवाय सिनेमात आमिर खानच्या नायिकेच्या भूमिकेत कतरिना कैफही दिसणार आहे. आणिर आणि कतरिना ही जोडीदेखील पहिल्यांदाच सिनेमात दिसणार आहे. यात आमिर खानची स्टाइल नेहमीप्रमाणेच हटके असेल.

Breaking News...       Breaking News...        Breaking News..
01/08/2012

Breaking News... Breaking News... Breaking News..

Some Old Memories.....
01/08/2012

Some Old Memories.....

Jul 31, 2012                       परभणीमध्ये एसटी बस पुलावरुन कोसळली,एक ठार31 जुलैपरभणीमध्ये येलदरी नदीवरील पुलावरुन एक...
31/07/2012

Jul 31, 2012
परभणीमध्ये एसटी बस पुलावरुन कोसळली,एक ठार


31 जुलै


परभणीमध्ये येलदरी नदीवरील पुलावरुन एक एसटी बस खाली कोसळून अपघात जालाय. या या अपघातात एकाचा मृत्यू झालाय. तर 25 जण जखमी झाले आहेत. उटी या गावावरुन जिंतूरला येणारी ही बस 30 फूट उंचीवरुन नाल्यात कोसळली. नाल्यात जवळपास 6 फूट पाण्यात ही बस गेली. सकाळी 7 ला अचानक घडलेल्या अपघातानं आतील प्रवासी जखमी झाले यातील एकाच्या डोक्यास मार लागल्यानं तो जागीच ठार झाला.या बसचं समोरील टायर फुटल्यानं चालकाचा बसवरचा ताबा सुटला. यामुळे हा अपघात घडल्याचं समजतंय. या भागातील स्थानिक मच्छीमारांनी तातडीने मदत केल्यामुळे बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं. जखमी प्रवाशांना जिंतूर इथल्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.

देशाची अंतर्गत सुरक्षा आता सुशील कुमार शिंदे यांच्या हवाली. सुशीलकुमार शिंदे देशाचे नवे गृहमंत्री.तर पी. चिदंबरम हे देशा...
31/07/2012

देशाची अंतर्गत सुरक्षा आता सुशील कुमार शिंदे यांच्या हवाली. सुशीलकुमार शिंदे देशाचे नवे गृहमंत्री.

तर पी. चिदंबरम हे देशाचे नवे अर्थमंत्री.

पीएनडीटी कायदयाची कडक अंमलबजावणी                            155 सोनोग्राफी केंद्र आणि 76                           गर्भप...
31/07/2012

पीएनडीटी कायदयाची कडक अंमलबजावणी
155 सोनोग्राफी केंद्र आणि 76
गर्भपात केंद्रांची जिल्ह्यात तपासणी
- जिल्हाधिकारी धीरजकुमार
-
नांदेड, दि.30 :-नांदेड जिल्ह्यातील 155 सोनोग्राफी केंद्र आणि 76 वैद्यकीय गर्भपात केंद्राची आरोग्य यंत्रणेकडून चोख तपासणी करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी दिली.
पीएनडीटी कायदयाच्या कडक अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी आढावा घेतांना ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधिक्षक विठ्ठलराव जाधव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
जुलै महिन्यात सोनोग्राफी केंद्र व गर्भपात केंद्रांच्या तपासणीची मोहिम हाती घेण्यात आली होती. जिल्हा शल्य चिकित्सक आणि नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी यांच्या यंत्रणेकडून केंद्राची तपासणी सुरु आहे. ही मोहिम ऑगस्ट महिन्यातही राबविण्याची सूचना जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी यावेळी केली व कामकाजाचा आढावा घेतला.
जिल्ह्यातील संपूर्ण केंद्रांवर यापुढे विशेष लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे सांगून कोणत्याही वैद्यकीय व्यावसायिकाला नाहक त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली. अशा प्रकारची एकही तक्रार प्रशासनाकडे प्राप्त झालेली नाही व तपासणीत एकाही केंद्राकडून कायदाचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले नाही असेही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम. जी. राठोड आणि महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. साहेबराव मोरे यांनी स्पष्ट केले.
नांदेड जिल्ह्यात कायदयाचे उल्लंघन करणाऱ्या 15 सोनोग्राफी केंद्राविरुध्द कार्यवाही करण्यात आली होती. त्यापैकी 2 प्रकरणात व्यवसायिकांना शिक्षा झाली असून उर्वरित 13 प्रकरणे न्याप्रविष्ठ आहेत. त्या प्रकरणांचा आढावा या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला.
या बैठकीत श्री गुरुगोबिंद सिंघजी शासकीय रुग्णालयाच्या सुरक्षेच्या प्रश्नाविषयी चर्चा करण्यात आली. रुग्णालयात येणाऱ्यांसाठी प्रवेशद्वारावर नोंदणी करुन प्रवेशपत्र देण्याची पध्दत अवलंबण्यात यावी. त्यासाठी रुग्णांना भेटीच्या वेळा निश्चित करुन पाळण्यात याव्यात. ही पध्दत कडक अंमलात येण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी नेमण्यात येतील. या ठिकाणी एक स्वतंत्र वायरलेस केंद्र सुरु करण्यात येईल. गर्दी नियंत्रणासाठी नियोजन करण्यात यावे. खाजगी सुरक्षा व्यवस्था सध्या कार्यरत आहे त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात यावे, अशी सूचना यावेळी जिल्हाधिकारी यांनी केली.
या बैठकीस सल्लागार समितीचे सदस्य डॉ. एस. आर. वाकोडे, उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके, डॉ. अंजली वासडीकर, जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर, विधी अधिकारी ऍड. आनंद माळाकोळीकर, आयुष अधिकारी मालशेटवार, पोलीस उपअधिक्षक प्रदीप बाबर आदि उपस्थित होते.
*******

30/07/2012

दिड लाख शिधापत्रिकाधारक कुटुंबांची
माहिती आता संकेतस्थळावर उपलब्ध
-अप्पर जिल्हाधिकारी अहिरराव यांची माहिती

नांदेड, दि.27 :-नांदेड जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारक कुटूंबांची माहिती संगणकीकृत करुन संकेतस्थळावर भरण्याचे काम सुरु असून आतापर्यंत जिल्ह्यातील दिड लाख कुटूंबांची संपूर्ण माहिती संकेतस्थळावर भरण्यात आली असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश अहिरराव यांनी दिली.
जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक त्यांच्या दालनात घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या समितीचे सदस्य ऍड. डी. पी. पवार, जिल्हा उपनिबंधक एन. व्ही. आघाव, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी रामगीरवार, जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर, सहाय्यक पुरवठा अधिकारी अनुराधा ढालकरी आदी उपस्थित होते.
अप्पर जिल्हाधिकारी अहिरराव यावेळी बोलतांना पुढे म्हणाले की, शिधापत्रिकाधारकांच्या कुटुंबाची माहिती स्वस्त धान्य दुकानदार निहाय राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, नवी दिल्ली यांनी विकसित केलेल्या संगणक प्रणालीवर भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. याबाबत सर्व प्रक्रिया सुरु झाली आहे. याबाबत सर्व शिधापत्रिकाधारकांना आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे गॅस जोडणी असलेल्या शिधापत्रिकाधारकांची शोध मोहिम सुरु असून गॅसधारकांनी याबाबत संबंधित गॅस एजन्सी कडून ग्राहक पत्रिकेवर शिक्के मारुन घेण्याची कार्यवाही करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
नांदेड जिल्ह्यात 18 ठिकाणी धान्य साठविण्यासाठी गोदाम बांधण्याचे प्रस्ताव मंजूर झाले असून त्यापैकी 14 ठिकाणी बांधकाम प्रगतीपथावर आहे, अशी माहिती याबैठकीत देवून अहिरराव म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने mahaonline.gov.in या संकेतस्थळावर रास्त भाव दुकानदारांना जोडण्यात आलेल्या 25 व्यक्तींचा समुह करुन त्यांना एस.एम.एस. सेवेद्वारे दुकानदारास देण्यात आलेल्या नियतनाची माहिती कळविण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. याबाबतची कार्यवाही सर्व तहसीलस्तरावर करण्यात येत असल्याचेही अहिरराव यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत अशासकीय सदस्य पवार यांनी शिधापत्रिकाधारकांना अधिक माहिती देण्यासाठी ग्रामीण भागात दवंडी माध्यमाचा उपयोग करण्याची सूचना केली. ******

Address

Nanded
431601

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nanded Loksabha Election 2014 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Nanded Loksabha Election 2014:

Share