आम्ही रातोळीकर

आम्ही रातोळीकर Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from आम्ही रातोळीकर, Social service, At Post Ratoli, Nanded.

🙏🏻🙏🏻नमस्कार🙏🙏*सावधान* (Alert)*धरण क्षेत्रावर पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे धरणात पाण्याची आवक पाहता पुनःस्य पाणी विसर्ग खाल...
01/09/2024

🙏🏻🙏🏻नमस्कार🙏🙏
*सावधान* (Alert)
*धरण क्षेत्रावर पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे धरणात पाण्याची आवक पाहता पुनःस्य पाणी विसर्ग खालील प्रमाणे वाढविण्यात येत आहे*
उर्ध्व मानार प्रकल्प लिंबोटी धरणातुन आज दिनांक *01/09/2024* रोजी अतिरिक्त दोन दरवाजे उघडून नदी पात्रात वाढीव 100 क्युमेक्स ने (Cumecs)पाणी सोडण्यात येत आहे. सध्यस्तितीस धरणाच्या तीन वक्र द्वारा मधून एकूण 150 क्युमेक्स ने (Cumecs) नदीपात्रात पाणी विसर्ग सुरु आहे. तरी नदीकाठावर असणाऱ्या सर्व गावांतील नागरिकांच्या मालमत्तेची, जीविताची, पशुधनाची, वीटभट्टी साहित्य व इतर कोणतीही हानी
होणार नाही, यासाठी काळजी घ्यावी, ही विनंती..

*शाखा अधिकारी तथा ,*
पूर नियंत्रण अधिकारी लिंबोटी.

" माझ्याठायी सत्य जिवंत असेतोवर मी मरणार नाही.मी जन्मलोय ते मरून जाण्यासाठी नव्हे,तर सूर्य - चंद्राबरोबर जगण्यासाठी! "- ...
30/08/2024

" माझ्याठायी सत्य जिवंत असेतोवर मी मरणार नाही.मी जन्मलोय ते मरून जाण्यासाठी नव्हे,तर सूर्य - चंद्राबरोबर जगण्यासाठी! "- डॉ.कलबुर्गी.

डॉ.एम.एम.कलबुर्गी यांच्या विचार,कार्य व स्मृतीस स्मृतीदिनी विनम्र अभिवादन..

मर्द को नजर हटानी नही है, औरत को जिस्म ढकना नही है और इज्जत दोनो को चाहिये !                वरवर पाहता हे विधान लुभावनं ...
29/08/2024

मर्द को नजर हटानी नही है, औरत को जिस्म ढकना नही है और इज्जत दोनो को चाहिये !

वरवर पाहता हे विधान लुभावनं असलं तरी याला पुरुषप्रधानतेचा, ब्राह्मणी मानसिकतेचा वास आहे. या विधानाचे विवेचन केल्यास आपल्या लक्षात येईल. "औरत को जिस्म ढकना नहीं है, फिर भी उसे इज्जत चाहीए !" याचा अर्थ काय ? तर स्पष्ट आहे की ,जर स्त्रीला इज्जत हवी असेल तर तिला अंग झाकणे अनिवार्य आहे ! पण एक समजत नाही की अंग झाकण्याचे मापदंड स्त्रीलाच का ? पुरुषाने अंडरपॅन्ट घालून मस्त हवेशीर गावभर हुंदडले तर चालते. तेव्हा त्याच्या इज्जतीचा बोभाटा केला जात नाही. इतकेच काय बलात्कार करणाऱ्या पुरुषाला एखाद्या योध्याप्रमाणे पाहणाऱ्या मानसिकतेला काय म्हणणार ? पुरुषाला बलात्कारी आहे म्हणून लाज वाटत नाही पण पीडितेला मात्र अशा नजरेने पाहतात की जणू काही तिनेच बलात्कार केला आहे. स्त्रीने कायम सोवळ्यातच असायला पाहिजे हा पुरुषांचा अट्टाहास ! कधी पुरुषांच्या पोशाखविषयी बोलणार आहात का ? "मर्द को नजर हटानी नहीं है , इसिलिए औरते आपणे इच्छा की कुर्बानी देणी चाहीए। उद्या स्त्रियांनी आक्षेप घेतला तर तुम्ही पुरुषांनी पण घुंगट घेऊन फिरणार आहात का ?
कोणाचेही उघडं अंग पाहून तर रानटी जनावरे देखील उत्तेजित होत नाहीत, झालेच तर बलात्कार करत नाहीत. घोडे, गाढव, हत्ती बलात्कार करत नाहीत. मग माणूसच इतर प्राण्यांपेक्षा कामांध का ? तर याचे उत्तर आहे त्याची तृष्णा ! वासनांधपणा !! व्यभिचारी मनोवृत्ती !!! यावर माणसाने प्रयत्नाने नियंत्रण मिळवणे सोडून जीन्स घालू नये, हाफ चड्डी घालू नये, अंग प्रदर्शन करू नये, ती बुरख्यातच रहावी असा आग्रह धरणे म्हणजे आपण अजनुही पाशवी वृत्तीतच आहोत हे सिद्ध होते.

अंगभर कपडे घालणाऱ्या आपल्या देशाने बलात्कारात टॉप मारलेलं आहे. बलात्काराचे प्रमाण पाहिले तर जे देश मागास आहेत त्याच देशांमध्ये अधिक आढळून येते. आफ्रिकन देश, आशिया खंडातील भारत, चीन, पाकिस्तान, बांगलादेश यांचा नंबर वरचा लागतो. पाकिस्तान, बांगलादेश हे इस्लामिक देश आहेत. बुरख्यात राहणाऱ्या महिलांचेही प्रमाण अधिक आहे पण तिथे सुद्धा बलात्काराचे प्रमाण अधिक आहे. याचे कारण अंगभर वस्त्र किंवा अर्धनग्नता नसून पुरुषांच्या डोक्यातील नग्नता आहे. शरीर कधीच नग्न नसते, नग्न असते ते मन ! मनाने नग्न असलेल्या पुरुषी जनावराला अंगभर कापडं घातलेली स्त्री असो की अंग प्रदर्शन करणारी स्त्री असो, तरुणी असो की वृद्ध वा बालिका असो तिच्यात फक्त मादीच त्याला दिसते ! याला म्हणतात मानसिक नग्नता ! भगवान बुद्ध म्हणतात की, लालसा, तृष्णा, वासना ही कोणत्या वस्तूत नसून ( शरीरातसुद्धा ) मनात आहे. म्हणून मनाला नियंत्रण करायला हवं. मात्र चारित्र्याचे ठेकेदार स्त्रीच्या पोशाखाला नियंत्रित करण्याचा दुराग्रह धरतात. नियंत्रित मनाला सर्व निसर्ग, नैर्गिक रचना हे सुंदर दिसू लागते. अनियंत्रित मनाचा वासनांध पुरुष कधी कोणावर बलात्कार करेल याचा नेम नाही. मागे कोल्हापुरात एका पठ्याने चक्क घोरपडीवर बलात्कार केला, काहींनी कोंबडीवर तर काहींनी गायिवर बलात्कार केला. आता या बिचाऱ्या मुक्या प्राण्यांना कापडं घालून रहावं लागणार का ? जितके लपवाल तितकी उत्सुकता अधिक असते. याचा अर्थ सगळे कापडं काढून सर्वांनी फिरावे असा नाही. पण, कापडं किती,कोणते व कसे घालावे याचे मात्र जरूर स्वातंत्र्य द्यायला हवे. आज अंगभर कापडं घालणार्यांनी काल हिजाब नको म्हणत होते. हा तुमच्या मनाचा कोतेपणा आहे. आम्ही काल हिजबचे समर्थन करी होतो आज बिकिनी घालुन फिरणाऱ्या महिलांचे समर्थन यासाठी करतो की ज्यांना कम्फर्टेबल वाटेल त्यांनी तसे वागावे या न्यायाने आम्ही वागतो.

- सिद्धार्थ रातोळीकर


*मुलांना लैंगिक शिक्षणाची गरज आहे* . *लैंगिक शिक्षण काळाची गरज आहे* .

Address

At Post Ratoli
Nanded
431722

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आम्ही रातोळीकर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category