Nandurbar Police

Nandurbar Police नंदुरबार पोलीसांचे अधिकृत खाते
आपत्कालीन संपर्क 112
महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क
8976004111
8805200600
022-45161635

कारगिल विजय दिनानिमित्त प्राणांची आहुती दिलेल्या वीरांना सलाम! #कारगिल_विजय_दिवस
26/07/2026

कारगिल विजय दिनानिमित्त प्राणांची आहुती दिलेल्या वीरांना सलाम!

#कारगिल_विजय_दिवस

अनोळखी क्रमांकावरून निःशब्द कॉल येत आहेत?
25/07/2026

अनोळखी क्रमांकावरून निःशब्द कॉल येत आहेत?

08/07/2026

नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप (भा.पो. से) यांचे नंदुरबार जिल्हातील नागरिकांना जाहीर आहवान व निवेदन

📢 नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनाचे नागरिकांना आवाहनदि. 08/07/2026 रोजी नंदुरबार येथे जनआक्रोश मोर्चास पोलीस प्रशासनाने प...
07/07/2026

📢 नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

दि. 08/07/2026 रोजी नंदुरबार येथे जनआक्रोश मोर्चास पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली आहे.

सर्व नागरिकांनी परवानगी नसलेल्या मोर्चा, आंदोलन किंवा जमावामध्ये सहभागी होऊ नये. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा त्या पसरवू नयेत.

शांतता, कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनास सहकार्य करावे.

गडचिरोली जिल्ह्यातील माओवादविरोधी अभियानात उल्लेखनीय आणि धाडसी कामगिरी बजावणाऱ्या ०५ कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षका...
06/07/2026

गडचिरोली जिल्ह्यातील माओवादविरोधी अभियानात उल्लेखनीय आणि धाडसी कामगिरी बजावणाऱ्या ०५ कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षकांना राज्य शासनामार्फत वेगवर्धित पदोन्नती (Accelerated Promotion) प्रदान करण्यात आली.

या अनुषंगाने आयोजित पिपिंग समारंभात मा. पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते यांच्या हस्ते अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

कर्तव्य, धैर्य आणि राष्ट्रसेवेच्या या प्रवासासाठी पदोन्नती प्राप्त सर्व अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! 💐

#आपले_मपो

🚨 नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनाचे आवाहन 🚨आदिवासी आमदार चेतरभाई वसावा यांच्या समर्थनार्थ दिनांक 04 जुलै 2026 रोजी नंदुरब...
03/07/2026

🚨 नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनाचे आवाहन 🚨

आदिवासी आमदार चेतरभाई वसावा यांच्या समर्थनार्थ दिनांक 04 जुलै 2026 रोजी नंदुरबार येथे प्रस्तावित "आदिवासी आक्रोश मोर्चा" संदर्भात समाज बांधवांनी/नागरिकांनी सोशल मीडियावरील अफवा, अपप्रचार व भुलथापांना बळी पडू नये.

⚠️ सदर मोर्चासाठी आयोजकांनी कोणताही अर्ज सादर केलेला नाही. तसेच, सदर मोर्चास जिल्हा पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही.

📢 समाज बांधवांनी/नागरिकांनी परवानगी नसलेल्या मोर्चा, आंदोलन किंवा जमावामध्ये सहभागी होऊ नये. कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत तसेच शांतता, कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे.

🤝 आपली सुरक्षा – आपली जबाबदारी
🚔 नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासन

#नंदुरबार_पोलीस


#शांतता_राखा
#कायदा_सुव्यवस्था

📢  #नंदुरबार_जिल्हा_पोलीस🚔 स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी! 🚔आंतरराज्यीय दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीतील तीन आरोपींना अट...
29/06/2026

📢 #नंदुरबार_जिल्हा_पोलीस

🚔 स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी! 🚔

आंतरराज्यीय दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीतील तीन आरोपींना अटक करून ₹30 लाख 30 हजार किंमतीच्या 32 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे नंदुरबारसह इतर जिल्हे व राज्यांतील एकूण 19 गुन्ह्यांची उकल झाली आहे.

LS Marathi News

https://youtu.be/dEal6YES3tg?si=ooNlp8eybvw9FPb7

LS Khandish news

https://www.instagram.com/reel/DaH2EmPCEqT/?igsh=NHZtd3JkemJkaGJx

🔹 जप्त मोटारसायकली : 32
🔹 जप्त मालमत्ता : ₹30,30,000/-
🔹 उकल झालेले गुन्हे : 19

नंदुरबार जिल्हा पोलीस नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव कटिबद्ध असून, गुन्हेगारांवर कठोर कारवाई सुरूच राहणार आहे.

28/06/2026

🚨 धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्या युवकावर अक्कलकुवा पोलिसांची कारवाई! 🚨
अक्कलकुवा-मोलगी सार्वजनिक मार्गावर मोटारसायकलवर धोकादायक स्टंटबाजी करून स्वतःचा व इतर नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या युवकावर अक्कलकुवा पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे.
🚔 रस्ते हे स्टंटसाठी नाहीत, तर सुरक्षित प्रवासासाठी आहेत.
⚠️ वाहतूक नियमांचे पालन करा आणि स्वतःसह इतरांच्या जीवाची काळजी घ्या.
📢 नंदुरबार जिल्हा पोलीसांचे आवाहन:
सार्वजनिक ठिकाणी स्टंटबाजी करू नका. अशा प्रकारच्या कृतींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
#नंदुरबार_पोलीस #अक्कलकुवा_पोलीस 🚔

27/06/2026

#नंदुरबार_पोलीस
🚨 धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्या युवकावर अक्कलकुवा पोलिसांची कारवाई! 🚨

दिनांक 26/06/2026 रोजी अक्कलकुवा-मोलगी सार्वजनिक मार्गावर एका युवकाने मोटारसायकलवर धोकादायक स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला होता. या घटनेची गंभीर दखल घेत अक्कलकुवा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित युवकाचा शोध घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

⚖️ दाखल गुन्हा:
▪️ गु.र.नं. 295/2026
▪️ भारतीय न्याय संहिता कलम 125, 181
▪️ मोटार वाहन कायदा कलम 184

🚔 सार्वजनिक रस्त्यावर स्टंटबाजी, भरधाव वेगाने वाहन चालविणे व इतरांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या कृत्यांवर नंदुरबार जिल्हा पोलीस कठोर कारवाई करणार आहेत.

🙏 सर्व युवक व नागरिकांना आवाहन:
सार्वजनिक रस्त्यावर धोकादायक स्टंटबाजी करू नका. वाहतूक नियमांचे पालन करा आणि स्वतःचा व इतरांचा जीव सुरक्षित ठेवा.

 #नंदुरबार_पोलीस #उत्कृष्ट_कामगिरी🚔 नंदुरबार जिल्हा पोलीसांची मोठी कामगिरी! 🚔🔹 मोटारसायकल चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी ज...
25/06/2026

#नंदुरबार_पोलीस
#उत्कृष्ट_कामगिरी
🚔 नंदुरबार जिल्हा पोलीसांची मोठी कामगिरी! 🚔

🔹 मोटारसायकल चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद
🔹 21 चोरीच्या दुचाकी जप्त
🔹 जप्त वाहनांची किंमत ₹8.23 लाख
🔹 नंदुरबार जिल्ह्यातील 06 गुन्ह्यांची उकल

नंदुरबार जिल्हा पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोटारसायकल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला ताब्यात घेऊन उल्लेखनीय कारवाई केली आहे. या कारवाईत चोरीच्या 21 दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत सुमारे ₹7 लाख 50 हजार आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्यातील 06 गुन्ह्यांची यशस्वी उकल करण्यात आली आहे.

मा. पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

नंदुरबार जिल्हा पोलीस नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर असून गुन्हेगारीविरोधातील कारवाई पुढेही अशाच प्रभावीपणे सुरू राहील.

आपले सहकार्य – आमची जबाबदारी
नंदुरबार जिल्हा पोलीस – सदैव आपल्या सेवेत!

Address

Office Of The Supdt. Of Police Nandurbar
Nandurbar
425412

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nandurbar Police posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Nandurbar Police:

Shortcuts

Share