Aaple Jalalkheda

Aaple Jalalkheda नमस्कार मित्रांनो,
आपले जलालखेडा पेज मध्ये आपले स्वागत आहे.

23/11/2025

*मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब व आमदार चरणसिंग ठाकूर साहेब यांच्या विशेष* *पुढाकाराने महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाचा* *निर्णय घेण्यात आला.*
*प्रभात संघ व ग्राम संघातील महिला बचत गटांना १ लाख रुपयांचा निधी प्रदान करण्यात आला असून हा निधी त्यांच्या व्यवसाय विकास व आत्मनिर्भरतेसाठी देण्यात आला आहे.*

*या कार्यक्रमात महिलांना उद्योजकतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.*
*स्वयंरोजगार वाढवणे, उत्पन्नवाढ, व्यवसायाचा विस्तार, नवी संधी शोधणे आणि गट व्यवस्थापन याबाबत तज्ज्ञांनी सूचना दिल्या.*
*यामुळे संबंधित महिला बचत गटांना आर्थिक बळकटी मिळून त्यांचा व्यवसाय अधिक सक्षमपणे पुढे नेण्यास मोठी मदत होणार आहे.*

*सुषमा श्री. राऊत*
*(उमेद महिला संघटना जिल्हाध्यक्ष नागपूर बचतगट)*


िंगठाकूर
#काटोल_नरखेड_विधानसभा
#जलालखेडा_सर्कल

22/11/2025

*ग्रामपंचायत मेंढला, वडविहीरा*– मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ऍनीमिया मुक्त गाव उपक्रम
ग्रामपंचायत मेंढला, पंचायत समिती नरखेड व जिल्हा परिषद नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत ऍनीमिया मुक्त गाव या उपक्रमाचा एक भाग म्हणून महिला आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात गावातील महिलांची
— हिमोग्लोबिन तपासणी
— आरोग्य तपासणी
— आहार व पोषणाविषयी मार्गदर्शन
— आयर्न गोळ्यांचे वाटप
अशा विविध सेवा पुरविण्यात आल्या. कार्यक्रमाला ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, आशा व अंगणवाडी कार्यकर्त्या तसेच ग्रामस्थ महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती होती.
या उपक्रमामुळे गावात ऍनीमिया मुक्तीबाबत जनजागृती वाढून महिलांच्या आरोग्यसंदर्भात सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

सुषमा श्री. राऊत
(उमेद महिला संघटना जिल्हाध्यक्ष नागपूर बचतगट)

िंगठाकूर
#जलालखेडा_सर्कल
#काटोल_नरखेड_विधानसभा

18/11/2025

ऑनलाईन आर्थिक फसवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून या बाबत जनजागृती होणे गरजेची आहे. याच उद्देशाने आरबीआय व तेजस्विनी बहुद्देशीय सेवा भावी संस्था हिंगणा यांच्या संयुक्त विद्यमानाने सुषमा ताई राऊत यांनी अतिशय चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी केजाजी सभागृहात केले होते. या कार्यक्रमाला शेकडो महिलांनी उपस्थिती लावली


#जलालखेडा_सर्कल
िंगठाकूर
#काटोल_नरखेड_विधानसभा

02/11/2025

🚩🔱श्री सोमेश्वर मंदिर (किल्ला) देवस्थान तथा पर्यटन स्थळ जलालखेडा
𝗙𝗼𝗹𝗹𝗼𝘄 𝗧𝗵𝗶𝘀 𝗣𝗮𝗴𝗲 ❤️
𝗟𝗶𝗸𝗲 𝗦𝗵𝗮𝗿e & 𝗠𝗲𝗻𝘁𝗶𝗼𝗻 ✌️in post
Aaple Jalalkheda❤️

31/10/2025

*जाहीर आभार जाहीर आभार*
*महिला बचत गटाच्या*
*सीआरपी* (CRP) *यांना अभियानातील ऑनलाईन कामे वेळेत पूर्ण होण्या करिता एक अनॉरॉईड मोबाईल व विशेष अनुदान ,उमेद- जि. प.नागपूर अंतर्गत देण्याचे निर्देश, मा.ना.श्री.चंद्रशेखर बावनकुळे,साहेब (महसूल मंत्री) महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री ,नागपूर यांनी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद,नागपूर यांना सूचना देऊन,लवकरात लवकर अमलबजावणी करण्याचे निर्देश दिल्याबद्दल , मा.मंत्री महोदय, व काटोल /नरखेड विधानसभा क्षेत्राचे आमदार चरणसिंग ठाकूर,साहेब व आमदार डॉ आशिष देशमुख साहेब यांचे जाहीर आभार.*

*सुषमा राऊत*
*जिल्हा अध्यक्ष महिला बचत गट नागपूर*


आज दिनांक ३० ऑक्टोबर २०२५ रोजी नागपूर येथे ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत “उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्...
30/10/2025

आज दिनांक ३० ऑक्टोबर २०२५ रोजी नागपूर येथे ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत “उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान”, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अभियान, जिल्हा परिषद, नागपूर आणि जिल्हा खनिज प्रतिष्ठान, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “नवसखी उद्योगिनी योजना” या शुभारंभ कार्यक्रमास उपस्थित राहिलो.

या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. महसूल मंत्री तथा पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमास मंत्री अँड.आशिष जैस्वाल, खासदार श्री. शामकुमार बर्वे, माझी आमदार सुधाकर कोहळे श्री. डॉ आशिष देशमुख आमदार चरणसिंह ठाकूर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर श्री. महामुनी तसेच भाजप जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर कुंभारे

या उपक्रमाद्वारे ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबन, उद्यमशीलता आणि आर्थिक सबलीकरणाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकण्याची संधी मिळणार आहे.

नेहमी पाठीशी राहणाऱ्या माझ्या माय-बाप जनतेलाभारतीय जनता पार्टी कडून   दीपावली निमित्त  हार्दिक शुभेच्छा ! िंगठाकूर  #काट...
20/10/2025

नेहमी पाठीशी राहणाऱ्या माझ्या माय-बाप जनतेला

भारतीय जनता पार्टी कडून दीपावली निमित्त हार्दिक शुभेच्छा !
िंगठाकूर #काटोल_नरखेड_विधानसभा #जलालखेडा_सर्कल

जाललखेडा ग्रामस्थांचा अभिमान!जाल लखेडा येथील गरीब घरातील तरुण दिनेश कळबे यांची SRPF (State Reserve Police Force) मध्ये न...
16/10/2025

जाललखेडा ग्रामस्थांचा अभिमान!
जाल लखेडा येथील गरीब घरातील तरुण दिनेश कळबे यांची SRPF (State Reserve Police Force) मध्ये नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल गावात आनंदाचे वातावरण असून बसस्टॅण्ड परिसरात मित्रपरिवार व ग्रामस्थांनी फुलांच्या वर्षावाने, मिठाई वाटप करून दिनेश यांचा भव्य स्वागत सोहळा आयोजित केला.

दिनेश कळबे हे अत्यंत सामान्य व गरीब कुटुंबातून असून, त्यांनी कठोर परिश्रम, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. त्यांच्या या यशामुळे ग्रामस्थांचा अभिमान वाढला असून युवकांसाठी ते प्रेरणास्थान ठरले आहेत.

िंगठाकूर Charansing thakur

 #जलालखेडा_सर्कलAaple Jalalkheda ❤️ #काटोल_नरखेड_विधानसभा िंगठाकूर
15/10/2025

#जलालखेडा_सर्कल
Aaple Jalalkheda ❤️
#काटोल_नरखेड_विधानसभा
िंगठाकूर

आपल्या गावासाठी अभिमानाचा क्षण.🇮🇳आपल्या गावचे दिनेश दिलीपजी कळंबे याने नुकतीच SRPF ची ट्रेनिंग पूर्ण केलेली आहे..त्यांचे...
12/10/2025

आपल्या गावासाठी अभिमानाचा क्षण.🇮🇳
आपल्या गावचे दिनेश दिलीपजी कळंबे याने नुकतीच SRPF ची ट्रेनिंग पूर्ण केलेली आहे..
त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन..!व त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...💐💐
Dinesh Kalambe
Aaple Jalalkheda ❤️
#काटोल_नरखेड_विधानसभा

Address

Narkher
441301

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aaple Jalalkheda posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share