नाशिक चे आशिक - Nashik

नाशिक चे आशिक - Nashik 💛 नाशिकचं सौंदर्य, संस्कृती आणि आठवणी... 📍Hidden Places | Food | Festivals | History 🎥 Daily Reels & Beautiful Moments 📩 Collab | Promotions | DM

🚨 नाशिकच्या खड्ड्यांवर महापालिकेची युद्धपातळीवर कारवाई!सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली रस्त्यांची कामे,...
28/08/2026

🚨 नाशिकच्या खड्ड्यांवर महापालिकेची युद्धपातळीवर कारवाई!
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली रस्त्यांची कामे, गॅस व जलवाहिन्यांसाठी झालेले खोदकाम आणि पावसामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे नाशिकच्या रस्त्यांचा प्रश्न चांगलाच गाजला.
🛣️ महापालिकेच्या माहितीनुसार, शहरातील आतापर्यंत तब्बल २० हजार खड्डे बुजवण्यात आले असून, हे प्रमाण जवळपास ९०% असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
दरम्यान, सिंहस्थासाठी २८ प्रमुख रस्त्यांची कामे सुरू असून, खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांनंतर प्रशासनावर नागरिकांकडूनही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
❓ २० हजार खड्डे बुजवले म्हणतात… मग तुमच्या परिसरातील रस्त्यांची अवस्था सुधारली का?
📍 तुमच्या भागाचे नाव कमेंटमध्ये सांगा 👇
नाशिक चे आशिक ❤️
नाशिकची माहिती… नाशिककरांसाठी!
#नाशिक #नाशिकबातम्या #खड्डे #नाशिकमहानगरपालिका #सिंहस्थकुंभ #नाशिकचेआशिक

🚨 कुंभमेळ्याच्या ₹३० हजार कोटींच्या खर्चावर सवाल!नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला असताना, कुंभ...
27/08/2026

🚨 कुंभमेळ्याच्या ₹३० हजार कोटींच्या खर्चावर सवाल!
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला असताना, कुंभमेळ्यासाठी होणाऱ्या मोठ्या खर्चावरून आता राजकीय चर्चा रंगली आहे.
एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी प्रश्न उपस्थित करत,
“या पैशातून किती शाळा, रुग्णालये किंवा IIT उभारता आली असती?” असा सवाल केला आहे.
👉 कुंभमेळा आणि विकासकामांचा खर्च — तुमचं मत काय?
कमेंटमध्ये नक्की सांगा 👇
📍 नाशिक चे आशिक ❤️
#नाशिक #सिंहस्थकुंभ #कुंभमेळा #नाशिकबातम्या #नाशिकचेआशिक

🚨 गोदावरीच्या पुरात ₹६३ कोटींच्या रिव्हरफ्रंटला फटका!सिंहस्थ २०२७ आधीच पायाभूत सुविधांच्या टिकाऊपणावर प्रश्नचिन्ह?📍 रामक...
25/08/2026

🚨 गोदावरीच्या पुरात ₹६३ कोटींच्या रिव्हरफ्रंटला फटका!
सिंहस्थ २०२७ आधीच पायाभूत सुविधांच्या टिकाऊपणावर प्रश्नचिन्ह?
📍 रामकुंड–गोडाघाट परिसर
🌊 सात वर्षांनंतर गोदावरीला मोठा पूर
⚠️ नव्याने विकसित केलेल्या रिव्हरफ्रंटच्या काही भागांचे नुकसान
💧 जोरदार प्रवाह आणि अनेक दिवसांची वाढलेली पाणीपातळी
🛕 दुतोंड्या मारुतीची मूर्ती जवळपास ३ तास पाण्याखाली
सिंहस्थाच्या आधी रिव्हरफ्रंटची गुणवत्ता आणि पूरप्रतिकारक क्षमता तपासण्याची गरज?
नाशिक चे आशिक ❤️ | नाशिकची माहिती… नाशिककरांसाठी!

🚨 नाशिकच्या रस्त्यांसाठी मोठी अपडेट!शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने सुमारे ...
24/08/2026

🚨 नाशिकच्या रस्त्यांसाठी मोठी अपडेट!
शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने सुमारे ३५० कोटी रुपयांचा एलबीसीचा थकीत निधी मिळवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. 💰🛣️
हा निधी मिळाल्यास प्रत्येक प्रभागातील प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण, मजबुतीकरण आणि पुनर्पृष्ठीकरण करण्याचे नियोजन आहे.
दरम्यान, कॉलनी रस्त्यांसाठी ₹१,३५५ कोटींचा DPR शासनाकडे सादर करण्यात आला आहे.
👉 आता प्रश्न एकच…
३५० कोटींचा निधी मिळणार कधी आणि नाशिकचे रस्ते सुधारणार कधी? 🤔
तुमच्या भागातील खराब रस्त्याचे नाव कमेंटमध्ये सांगा 👇
📍 नाशिक चे आशिक ❤️
नाशिकची माहिती… नाशिककरांसाठी!
#नाशिक #नाशिकबातम्या #नाशिकमहानगरपालिका #रस्ते #खड्डे #नाशिकचेआशिक

🚨 सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत मोठी अपडेट!मुख्य पर्वणीच्या दिवशी त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा विचार?🛕 लाखो भाव...
24/08/2026

🚨 सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत मोठी अपडेट!
मुख्य पर्वणीच्या दिवशी त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा विचार?
🛕 लाखो भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन प्रयागराजच्या धर्तीवर हा विचार सुरू असल्याची माहिती.
⚔️ मात्र आखाडा परिषदेचा विरोध!
१० शैवपंथीय आखाड्यांचे साधू-महंत अमृतस्नानानंतर त्र्यंबकराजाचे दर्शन घेतात, ही पारंपरिक प्रथा असल्याचे आखाडा परिषदेचे म्हणणे.
👉 “परंपरेला छेद देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही” — प्रमुख महंतांची भूमिका.
📍 त्र्यंबकेश्वर | सिंहस्थ कुंभमेळा २०२७
तुमच्या मते गर्दी नियंत्रणासाठी मंदिर दर्शन बंद ठेवणे योग्य की परंपरा कायम ठेवावी? 🤔👇
#नाशिक #सिंहस्थकुंभ #त्र्यंबकेश्वर #कुंभमेळा #नाशिकचेआशिक

23/08/2026

कस असतं ना....😅😅✌️✌️ #नाशिकचेआशिक

21/08/2026

कसं असतं गणेशशेठ 😅✌️ #नाशिक #नाशिकचेआशिक

🚨 हरिहर गडावर जाण्याचा प्लॅन असेल तर ही बातमी महत्त्वाची!🌧️ मुसळधार पावसामुळे गडाच्या दगडी पायऱ्या निसरड्या झाल्या आहेत....
20/08/2026

🚨 हरिहर गडावर जाण्याचा प्लॅन असेल तर ही बातमी महत्त्वाची!
🌧️ मुसळधार पावसामुळे गडाच्या दगडी पायऱ्या निसरड्या झाल्या आहेत.
🌫️ गडावर धुक्याचे प्रमाणही वाढले असून पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता वनविभागाने हरिहर गडावर गुरुवारपासून पूर्णवेळ प्रवेश बंद केला आहे.
⚠️ सुरक्षिततेच्या दृष्टीने पर्यटकांनी हरिहर गडावर जाणे टाळावे आणि वनविभागाच्या सूचनांचे पालन करावे.
📍 हरिहर गड | त्र्यंबकेश्वर | नाशिक
तुमच्या मित्रांना/ट्रेकिंग ग्रुपला ही माहिती नक्की शेअर करा. 🔄
नाशिक चे आशिक ❤️
#नाशिक #हरिहरगड #त्र्यंबकेश्वर #ट्रेकिंग #पावसाळीट्रेक #नाशिकचेआशिक

नाशिकमध्ये खाद्य आस्थापनावर FDA ची कारवाई!गंगापूर रोडवरील ‘अवंती स्नॅक्स’चा अन्न परवाना निलंबितअन्न सुरक्षा विभागाच्या त...
20/08/2026

नाशिकमध्ये खाद्य आस्थापनावर FDA ची कारवाई!
गंगापूर रोडवरील ‘अवंती स्नॅक्स’चा अन्न परवाना निलंबित
अन्न सुरक्षा विभागाच्या तपासणीत गंभीर त्रुटी आढळून आल्या 👇
❌ अन्नपदार्थ वृत्तपत्रावर ठेवलेले आढळले
❌ कच्च्या अन्नपदार्थांची योग्य तपासणी होत नव्हती
❌ कामगारांची वैद्यकीय प्रमाणपत्रे उपलब्ध नव्हती
❌ पेस्ट कंट्रोलचा पुरावा आढळला नाही
❌ परिसरातील स्वच्छता व रंगरंगोटीबाबत त्रुटी
⚠️ नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या खाद्य आस्थापनांवर कारवाई सुरूच राहणार, असा प्रशासनाचा स्पष्ट इशारा.
📍 गंगापूर रोड | नाशिक
तुम्ही बाहेरून खाद्यपदार्थ घेताना स्वच्छता किती तपासता? 👇
नाशिक चे आशिक ❤️
#नाशिक #नाशिकबातम्या #अन्नसुरक्षा #नाशिकचेआशिक

Address

Nashik
422 0XX

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when नाशिक चे आशिक - Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to नाशिक चे आशिक - Nashik:

Shortcuts

Share