26/02/2024
नगरमध्ये बहुजन रयत परिषदेचा
संवाद मेळावा उत्साहात संपन्न
उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान
संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या बहुजन रयत परिषदेचा संवाद मेळावा अहमदनगर येथे आज मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी उत्तर महाराष्ट्रातील महिला व पुरुष पदाधिकाऱ्यांच्या निवडी करून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार डॉ. सुजय विखे पाटील व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते झाले, संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. यावेळी खासदार सुजय विखे पाटील यांचा मानाचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात श्रीमती मंदाताई ठोकळ यांची अहमदनगर जिल्हा महिला अध्यक्षपदी, अबोली सकट जिल्हा युवती अध्यक्ष अहमदनगर, वैष्णवी ताकवणे जिल्हा विधी कायदे सल्लागार अहमदनगर, रवींद्र कनगरे जिल्हा युवक अध्यक्ष अहमदनगर, राजू थोरात जिल्हाध्यक्ष नाशिक, संजय भिसे जिल्हा कार्याध्यक्ष अहमदनगर, अशा निवडी करून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी खासदार सुजय विखे पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच ad. कोमलताई साळुंखे यांनी संघटनेची ध्येयधोरणे, महत्व आणि पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या याविषयी मार्गदर्शनपर भाषण केले. प्रा. लक्ष्मणराव ढोबळे साहेब यांनी संघटनेच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांनी दानाजोपयोगी उपक्रम राबवून संघटनेचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचवावे, असे आवाहन केले.
मेळाव्यास संघटनेचे प्रदेश सरचिटणीस ईश्वर क्षीरसागर. प्रदेश संपर्कप्रमुख श्री दत्तात्रय पाटील, प्रदेश उपाध्यक्ष ना. म. साठे. प्रदेश कार्यकारणी सदस्य सिद्राम जावीर, अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र साहेबराव शृंगार, संपर्कप्रमुख उत्तर महाराष्ट्र रवींद्र पाटील, कार्याध्यक्ष उत्तर महाराष्ट्र अनिल बाविस्कर, अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र सुरेश आबा वाघमारे, सोलापूर जिल्हाध्यक्ष बंडू पवार, सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष चंदू चव्हाण, सोलापूर शहराध्यक्ष अमित तांबे, धाराशिव जिल्हाध्यक्ष योगेश येडाळे, नाशिक शहराध्यक्ष अंबादास आहिरे, तसेच संघटनेचे पुरुष व महिला पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ना. म. साठे सर यांनी केले. अहमदनगर जिल्हा सरचिटणीस संतोष साळवे यांनी आभार मानले.