28/07/2026
💧नाशिककरांसाठी आनंदाची आणि दिलासादायक बातमी💧
वरुणराजाच्या कृपेने आणि गोदावरी मातेच्या आशीर्वादाने गंगापूर धरण आता ९६ टक्के भरले आहे. ही केवळ पाणीसाठ्याची आकडेवारी नाही, तर लाखो नाशिककरांच्या मनातील पाण्याच्या चिंतेवर उमटलेला दिलास्याचा ठसा आहे.
आज गंगापूर धरणावर महापौर मा. हिमगौरीताई आडके यांच्या शुभहस्ते जलपूजन करण्यात आले.
नाशिककरांच्या पाण्याच्या चिंतेचे निवारण करणाऱ्या या आनंदाच्या क्षणी आज गंगापूर धरणावर जाऊन ‘जलपूजन’ करून कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी स्थायी समिती सभापती मच्छिंद्र भाऊ सानप, मनपा आयुक्त मनिषा खत्री मॅडम, शिवसेना गटनेते अजय दादा बोरस्ते, भाजपा गटनेते श्याम भाऊ बडोदे, राष्ट्रवादी काँग्रेस गटनेत्या सीमा वहिनी ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते केशव अण्णा पोरजे, पश्चिम प्रभाग सभापती सुरेश अण्णा पाटील, सातपूर प्रभाग सभापती समाधान भाऊ देवरे, नगरसेवक निवृत्ती अण्णा इंगोले, नितीन भाऊ निगळ, भगवान भाऊ दोंदे, नगरसेविका अंकिता ताई शिंदे, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन साहेब, अधिक्षक अभियंता पाणी पुरवठा रविंद्र धारणकर साहेब, शहर अभियंता संजय अग्रवाल साहेब, विद्युत व यांत्रिकी अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत साहेब व मनपा अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते.
नाशिकचा पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीचा प्रश्न मिटवणारा हा क्षण आपल्या सर्वांसाठीच अत्यंत समाधानाचा आणि उल्हासाचा आहे. निसर्गाने दिलेल्या या अमूल्य संपत्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा भावपूर्ण क्षण होता.
भरलेले धरण म्हणजे शहरासाठी सुरक्षित पिण्याचे पाणी, शेतकऱ्यांसाठी नव्या आशा आणि आगामी काळासाठी अधिक आत्मविश्वास. नाशिकच्या विकासाला बळ देणारा आणि प्रत्येक कुटुंबाला समाधान देणारा हा क्षण आपल्या सर्वांच्या आनंदाचा आहे.
चला, निसर्गाने दिलेल्या या वरदानाचे जतन करूया आणि “पाणी वाचवा, भविष्य घडवा” हा संकल्प अधिक दृढ करूया. 🙏🌧️
#गंगापूरधरण #नाशिक #जलपूजन #पाणीआहेतरजीवनआहे #निसर्गाचेवरदान