22/11/2025
आपल्या महाराष्ट्रात मालेगाव सारखी दुर्दैवी घटना घडून संपूर्ण राज्यातील नागरिक व आई वडील आणि जिव्हाळा असणारे सर्व हळहळ व्यक्त करीत, मिळून आलेल्या नराधमाला फाशी व्हावी यासाठी आक्रोश करीत, पोलीस तसेच मा न्याय पालिकेला साकडं घालीत आहेत.
त्यास कठोर शिक्षा होईल यांत किंतु मात्र शंका नाही मात्र ती वेळेवर आणि तत्काळ व्हावी हाच आपला सर्वांचा आग्रह आहे. कारण या नंतर पून्हा कुठली यज्ञा बळी जाणार नाही याच साठी अट्टाहास आपल्या सर्वांचा.
#डोंगराळे #मालेगाव
या निमित्ताने पुढे काही अपरिहार्य घडू नये यासाठी काही पालकांना सूचना व विनम्र आवाहन..
१) आपली मुले अथवा मुली शाळा, कॉलेजला वेळवर जाऊन वेळेवर घरी परततात का?
२) आपली मुले अथवा मुली शाळेच्या अथवा शिकवणी च्या नावाखाली इतरत्र जॉगिंग ट्रेक, गार्डन, मंदिर परिसरात घरच्यांना माहीत नसलेल्या अनोळखी व्यक्ती सोबत फिरायला जाण्याची हिंमत कशी करतात?
३) आपली मुले आणि मुली शिकवणी सोडुन शहराच्या मध्यवर्ती भागातील जॉगिंग ट्रेक परिसरात सर्रास सकाळी 7 वाजे पासून रात्री 11 वाजे पर्यंत पालकांच्या डोळ्यात धूळफेक करीत असतात, याला जबाबदार कोण?
४) यात मुली देखील सर्रासपणे अश्लील चाळे करीत संबंधित मुलांचे मनोरंजन करताना आढळून येतात.
५) सदर बाबतीत पोलिसांची मदत घेतली तर उलट पोलिसांना कायदा शिकवितात. हाय कोर्टाचा आदेश आहे सार्वजनिक ठिकाणी बसण्यास कोणीही हरकत घेऊ शकत नाही.
६) या घटना बघता अनेक जॉगिंग ट्रेक परीसरात लव्ह जिहाद सारख्या प्रकारांनी मजल मारली आहे. समाजवादी संघटना जेवढी मदत करता येईल अथवा हे रोखता येईल त्याचा कायम प्रयत्न करीत असतात.
७) शाळा, कॉलेज, क्लासेस, फाउंडेशन आदी ठिकाणी मुले अथवा मुली येत जात असतील तर तेथील प्रशासनाने येण्याची व जाण्याची वेळ पालकांना कॉमन मेसेज स्वरूपात नित्य पाठविल्यास या अपप्रकारांना आळा घालणे शक्य होईल.
८) पालकांनी परवानगी दिल्यास जी मुले व मुली शाळा, कॉलेज, क्लासेस, फाउंडेशन सोडून इतरत्र पालकांना चुकवून अपप्रकार करतात त्यांचे छायाचित्र संकलन करून या CPCI च्या माध्यमातून जागृती करावी का?
या द्वारा संदेश एकच घ्यायचा आहे की पालकांना निदर्शनास आणून देऊन भविष्यात काही अपरिहार्य घटना होणे आधीच सावध होणेच मदत.
~जनहितार्थ
-CPCI