Nashik Division Skill Development Mission

Nashik Division Skill Development Mission Free Training Courses under Pramod Mahajan Kaushalya vikas Abhiyan. For more information do visit our website www.mahaswyam.in Phone 02532450129

*पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा*दि 16 जानेवारी, 2025*जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळ...
14/01/2025

*पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा*
दि 16 जानेवारी, 2025

*जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव* यांच्या संयुक्त विद्यमाने *दिनांक 16 जानेवारी, 2025* रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन पदवी प्रधान सभागृह, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव या ठिकाणी सकाळी १०.०० वाजता करण्यात आलेले आहे.

सदर रोजगार मेळाव्यात 25+ कंपन्यांनी /उद्योजकांनी सुमारे 2500+ रिक्त पदे अधिसूचित केलेली आहेत.

या रोजगार मेळाव्यात भाग घेण्यासाठी या विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करून रोजगार मेळाव्यातील रिक्त पदांना *ऑनलाइन अप्लाय* करावे व आपली शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे, आधार कार्ड, बायो डेटा सह रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित रहावे.

जास्तीत जास्त उमेदवारांनी या भव्य रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा व आपल्या परिचितांना याबाबत माहिती द्यावी असे आवाहन *सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव* यांनी केले आहे.

Overview: The Government of Maharashtra has introduced the Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana, an initiative designed to provide internship opportunities to the unemployed youth of the state. This scheme aims to enhance the employability and skill set of young individuals, preparing them for...

25/05/2021
🙏लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी.धर्म, पंथ, जात, एक मानतो मराठी,एवढ्या जगात माय मानतो मराठी .....
27/02/2021

🙏
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी.
धर्म, पंथ, जात, एक मानतो मराठी,
एवढ्या जगात माय मानतो मराठी
... सुरेश भट

🌹सर्व मराठीप्रेमींना जागतिक मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा!🌹

*कृषी क्षेत्रातील रोजगार व स्वयंरोजगार संधी - ऑनलाईन मार्गदर्शन सत्र**जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन...
11/02/2021

*कृषी क्षेत्रातील रोजगार व स्वयंरोजगार संधी - ऑनलाईन मार्गदर्शन सत्र*

*जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव* यांचे मार्फत जिल्‍हयातील सुशिक्षित बेरोजगार युवक - युवती साठी *दिनांक 16/02/2021 रोजी सकाळी 11.30 ते 12.30 या वेळेत* कृषी क्षेत्रातील रोजगार व स्वयंरोजगार संधी - ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या मार्गदर्शन सत्रास *मा. श्री. अनिल वसंतराव भोकरे, कृषी उपसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, जळगांव* हे विविध योजना व इतर अनुशंगिक बाबींविषयी मार्गदर्शन करणार आहेत. या ऑन लाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन *गुगल मिट* या ॲप द्वारे करण्‍यांत आलेले आहे.

*गुगल मिट लिंक खालीलप्रमाणे*
https://meet.google.com/wqx-yftf-kag

*फेसबुक लिंक खालीलप्रमाणे*
www.facebook.com/jalgaonskill

तरी जिल्‍हयातील जास्‍तीत जास्‍त उमेदवारांनी लाभ घ्यावा असे आवाहन *सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव* यांनी केले आहे.

*या मार्गदर्शन सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी पुढील सूचनांचे पालन करावे*
१. https://meet.google.com/wqx-yftf-kag या लिंक वर क्लिक करावे.
२. आपल्याकडे Google meet app यापूर्वी install केलेले नसेल तर install करून घ्यावे.
३. आपण Google meet app मधून कनेक्ट झाल्यानंतर Ask to join वर क्लिक करावे.
४. सदर सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी १० मिनिटे वेळेपूर्वी जॉईन करावे.
५. दिलेल्या लिंक मधून connect झाल्यावर लगेच आपला video व mice mute/ बंद करावे.
६.सत्राच्या शेवटी काही प्रश्न विचारावयाचे असल्यास माईक unmute / सुरु करून विचारावे व लगेच माईक mute/ बंद करण्याची दक्षता घ्यावी.

*For More Information Contact - 0257 - 2239605*

Education is one of the ways to spread the message of women empowerment.
03/01/2021

Education is one of the ways to spread the message of women empowerment.

13/12/2020

राज्यस्तरीय रोजगार मेळाव्यास दि 20 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ

राज्यस्तरीय रोजगार मेळाव्याची मुदत वाढविण्यात आली असून रोजगार मेळाव्याचा कालावधी 20 डिसेंबर 2020 पर्यंत करण्यात आला आहे,

तरी कृपया, नियोक्त्याना वाढवलेल्या दिनांकापर्यंत पुन्हा अधिकची रिक्तपदे अधिसूचित करता येतील आणि युवकांना पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांना वाढीव दिनाकापर्यंत apply करता येईल. याचा सर्व इच्छुकांनी लाभ घ्यावा.

रिक्तपदाना apply केल्यानंतर सदर उमेदवारांचा resume व profile data पडताळून योग्य वाटल्यास नियोक्ते सरळ उमेदवाराला मुलाखतीबाबत संपर्क करून संदेश देतील.

धन्यवाद

10/12/2020
दि 12 ते 13 डिसेंबर, 2020 दरम्यान ऑनलाईन पद्धतीने *राज्यस्तरीय महारोजगार मेळावा* आयोजन- 63000+ रिक्तपदे उपलब्धमहाराष्ट्र...
09/12/2020

दि 12 ते 13 डिसेंबर, 2020 दरम्यान ऑनलाईन पद्धतीने *राज्यस्तरीय महारोजगार मेळावा* आयोजन- 63000+ रिक्तपदे उपलब्ध

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत ऑनलाईन पद्धतीने *राज्यस्तरीय महारोजगार मेळावा* आयोजित करण्यात आला आहे.

*दिनांक*: 12 ते 13 डिसेंबर 2020 पर्यंत

*वेळ*: नियोक्त्याच्या सोईनुसार

*नोंदणी*: ऑनलाईन पोर्टलवर www.rojgar.mahaswayam.gov.in किंवा mahaswayam अँड्रॉइड अप्लिकेशनद्वारे

*मुलाखती*: नियोक्त्यांने सूचित केल्यानुसार- mobile द्वारे whatsapp, skype, zoom, google meet, etc

*अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवार*: एसएससी, एचएससी, आयटीआय, सर्व ग्रॅज्युएट्‌स, बीएस्सी, बीकॉम,एमकॉम, एमएमबीए, डिप्लोमा इंजिनिअर्स, ग्रॅज्युएट्स इंजिनिअर्स, फार्मसी, इत्यादी सर्व पात्रताधारक

*राज्यातील सहभागी नियोक्ते*: 387+
*उपलब्ध रिक्तपदे*: 63000+

*नाशिक जिल्ह्यातील सहभागी नियोक्ते-30+ आणि उपलब्ध रिक्तपदे-3000+*

*मुलाखत मार्गदर्शन उपलब्ध*: फेसबुक पेज व युट्युब चॅनेल NashikSkill

*अधिक माहिती*: 0253- 2972121
*वेबसाईट*: www.rojgar.mahaswayam.gov.in
*अँड्रॉइड मोबाईल अप्लिकेशन*: mahaswayam

*मोठी संधी-विनम्र आवाहन:*
नाशिक जिल्ह्यातील नोकरी इच्छूक युवक-युवतींना आवाहन करण्यात येते की कोविड-2019 च्या साथरोग पार्श्वभूमीवर अनलॉक मिशन बिगीन अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी शोधून उपलब्ध केल्या आहेत. याचा लाभ घेण्यासाठी महास्वयं वेबपोर्टल किंवा मोबाईल अप्लिकेशनमध्ये लॉग-इन करून राज्यातील विविध जिल्ह्यातील उपलब्ध आस्थापनेच्या विविध रिक्तपदांना दि 13 डिसेंबर पूर्वी अप्लाय करावे. काही अडचण असल्यास दूरध्वनीवर संपर्क करावा.
…..........................................
*जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक*............................................

State Level Mega Job Fair on 12th and 13th Dec, 2020.Thousands of vacancies across the state....Visit website, apply to ...
03/12/2020

State Level Mega Job Fair on 12th and 13th Dec, 2020.

Thousands of vacancies across the state....Visit website, apply to interested vacancies...Get interviewed online....Get Job!

Address

Commissioner Office Nashik Road
Nashik
422101

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Telephone

02532450129

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nashik Division Skill Development Mission posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Nashik Division Skill Development Mission:

Share