22/08/2026
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी संघर्षाचा निर्धार!
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ (NTUI) आणि युनियनच्या आयटक (AITUC) संलग्नतेच्या वतीने कॉम्रेड दत्तात्रय कापले एम. ए. पाटील जयंतीनिमित्त अंगणवाडी कर्मचारी मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात नाशिक येथे पार पडला.
अंगणवाडी सेविका व मदतनीस या ग्रामीण व शहरी भागातील बालकांच्या संगोपन, पोषण आणि शिक्षणाच्या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडत असतानाही त्यांच्या श्रमाला योग्य मोबदला आणि कामगार म्हणून मिळणारे हक्क अद्याप पूर्णपणे मिळालेले नाहीत. त्यांच्या प्रलंबित मागण्या, मानधनवाढ, सामाजिक सुरक्षा, पेन्शन, निवृत्तीवेतन तसेच सन्मानजनक कामाच्या परिस्थितीबाबत मेळाव्यात सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर मार्गदर्शन करत संघटित संघर्षातूनच न्याय्य हक्क मिळवता येतील, असा निर्धार व्यक्त केला. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक न्याय्य मागणीसाठी संघटना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
एकजूट वाढवूया, संघर्ष तीव्र करूया!
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा विजय असो!
#अंगणवाडीकर्मचारी #अंगणवाडीसेविका