Maharashtra Tourism

Call Directions

Maharashtra Tourism Rich Historical town of Legendary Lord Rama, who spent some time of his exile in Nashik is a unique blend of civilization & modernization.

II  Eco-city: GHATGHAR, Bhandardara  II
19/04/2022

II Eco-city: GHATGHAR, Bhandardara II

|| 🅑🅗🅐🅝🅓🅐🅡🅓🅐🅡🅐 ||
19/04/2022

|| 🅑🅗🅐🅝🅓🅐🅡🅓🅐🅡🅐 ||

पुणे येथील अभिजित घोरपडे यांच्या 'भवताल' या पर्यावरण या विषयावर मत मांडणारे एकमेव मराठी मासिक. या मासिकात प्रसिद्ध झालेल...
03/09/2021

पुणे येथील अभिजित घोरपडे यांच्या 'भवताल' या पर्यावरण या विषयावर मत मांडणारे एकमेव मराठी मासिक. या मासिकात प्रसिद्ध झालेला एक लेख. धन्यवाद 'भवताल'.

कावनई किल्ला.. "हुनर क़भी तारीफोंका महौताज नही होता".. कावनई किल्ल्याला भेट दिली की ह्या ओळींची प्रचिती आल्याशिवाय राहात ...
14/07/2019

कावनई किल्ला.. "हुनर क़भी तारीफोंका महौताज नही होता"..

कावनई किल्ल्याला भेट दिली की ह्या ओळींची प्रचिती आल्याशिवाय राहात नाही. कावनई किल्ला इगतपुरी तालुक्यात कावनई गावाच्या उत्तरेला आहे. तसा ह्या किल्ल्यावर जायला फारसा वेळ लागत नाही. कावनई गावातून किल्ल्यावर जाण्यासाठीचा प्रवास सुरू होतो. वाट मात्र खूप अरुंद आणि बिकट आहे. किल्ल्यावर प्रमुख दरवाज्यातून प्रवेश करन्यासाठी एका वेळेला एकच माणसाला चालता यईल इतकी अरुंद वाट आहे. ह्या वाटेने गेल्यावर कळत की मराठी साम्राज्यामध्ये ह्या किल्ल्याची स्वतःची अशी एक ऐट असेल. सहजासहजी हा किल्ला कबीज होणं अशक्य! कारण अतिशय निमुळती, सरळ उभी, बिकट आणि कपारीतून नागमोडी वळण घेऊन जाणारी वाट. ह्या वाटेवर दरवाज्याच्या आत एक जरी सैनिक असेल तरी तो हजारो शत्रू सैन्याची खांडोळी करू शकत असेल.दरवाज्यातून आत गेल्यावर पठारावर 3 पाण्याचे टाके आणि कावनई मातेचे मंदिर आहे. मंदिराच्या समोरच एक तलाव आहे... त्याच्यातील पाणी कधीच आटत नाही. विशेष म्हणजे ह्या पाण्यात सोनेरी रंगाचे मासे आहेत, आणि ते त्याठिकाणी कुणीही आणून सोडलेले नाहीत तर ते नैसर्गिकरित्या तिथे आढळतात. तलावाच्या उजव्या बाजूला शिवाचे मंदिर आहे. कावनई किल्ल्यावरून आजूबाजूचा परिसर अतिशय स्पस्ट पने दिसतो. कवणीच्या पुढेच त्याच रांगेत बुधल्या आणि वनदेव पर्वत आहेत.

II NASHIK. ANGENERI II
13/07/2019

II NASHIK. ANGENERI II

ब्रम्हगिरी: त्रिंबकेश्वर, नाशिक trambakeshwar and this fort offers a commanding view of the Jawhar Mokhada region of Tha...
07/07/2019

ब्रम्हगिरी: त्रिंबकेश्वर, नाशिक

trambakeshwar and this fort offers a commanding view of the Jawhar Mokhada region of Thane district. Trimbakeshwar itself is a place of worship because it is one of the 12 Jyotirlingas of Lord Shiva.... wiki

II जय शिवाजी I जय भवानी II "जयजयजय जय शिवाजी... जयजयजय जय भवानी"  ही गर्जना महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांवर नाही ऐकायला अ...
28/06/2019

II जय शिवाजी I जय भवानी II "जयजयजय जय शिवाजी... जयजयजय जय भवानी" ही गर्जना महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांवर नाही ऐकायला अली तरच नवल! महाराष्ट्राचा कैवारी सह्याद्री आणि त्या सह्याद्रीच्या कडीखांद्यावर दिमाखात उभे असलेले किल्ले म्हणजे मराठी माणसाच्या शिरपेचातला मानाचा तुरा! ह्या अवघड आणि अचाट किल्ल्यामधून ज्यावेळेला मराठी चैतन्य वहातं तेंव्हा अंगावर काटा उभा नाही राहिला तर तो मराठी नाही..... हो असाच अगदी असाच अनुभव येतो सह्याद्रीच्या नाशिक मधील'हरिहर' किल्ल्यावर. किल्ल्याच्या खाली पोहोचलो आणि दुरूनच "जय शिवाजी" च्या गर्जना ऐकायला येऊ लागल्या.... ही गर्जना म्हणजे अवघ्या महाराष्ट्राची चेतना आहे. ही गर्जना म्हणजे महाराष्ट्राच्या भूतकाळात जन्माला आलेला 'चमत्कार' आहे... ज्याने वर्तमान नियंत्रित केलाय आणि भविष्य घडविण्याची ज्याच्यात ताकत आहे. 'शिवराय आनि शंभूराजे' ह्या नावच गारुड मराठी मनावर होत, आहे आणि असणार हे त्रिकालाबाधित सत्य आहे. त्याची साक्ष घ्यायला आजही हरिहर, कलावंतीण दुर्ग, राजगड, रायगड आणि असे असंख्य साक्षीदार पाठीचा कणा ताठ करून शतकानुशतके उभे आहेत...

मी अजून हरलेलो नाही ....  रामशेज. मी अजून हरलेलो नाही... मझ्यावर हरण्याचा कलंक लागला तो ‘त्या’ फितूर किल्लेदारामुळे. अहो...
24/11/2018

मी अजून हरलेलो नाही .... रामशेज.

मी अजून हरलेलो नाही... मझ्यावर हरण्याचा कलंक लागला तो ‘त्या’ फितूर किल्लेदारामुळे. अहो.. अखेरच्या श्वासापर्यंत, देहाची चाळणी होईस्तोवर स्वराज्यासाठी लढणाऱ्या बाजीप्रभूंच्या मुलुखातले गडकिल्ले आम्ही... आम्हास कसली मरणाची भीती. प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरनकमलानी पावन झालेल्या माझ्या या देहाला मी मुगलांचा पाय का लागू दिला असता? .... फक्त एका किल्लेदाराची फितुरी नडली..... याचीच खंत वाटते.

छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठी साम्राज्यावर, पर्यायाने माझ्यावरही आक्रमणे वाढू लागली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने आखलेल्या पहिल्या मोहिमेत मलाही काबीज करण्याचा डावआखला होता. मला काबीज केल्यांनतर आपोआपच मुघलांचा मराठी साम्राज्यात शिरकाव होणार होता. औरंगजेबाचा सरदार शहाबुद्दीन खानाने १६८२ मध्ये माझ्यावर जोरदार अक्रणाने केली, पण त्याला मी मात्र दाद दिली नाही. त्याने माझ्या चहुबाजूने दहा हजार सैन्याचा वेढा दिला होता.... पण मी मात्र माझ्या सहाशे मावळ्यांनिशी तयार होतो. माझ्या अंगाखांद्यावर तयार झालेला एक-एक मावळा सहबुद्दिनच्या शेकडो सैनिकांच्या बरोबर होता. मी शहाबुद्दीनच्या हरऐक चालीस सरस प्रत्युत्तर देत होतो. त्यावेळी शहाबुद्दीन खानाने हल्ल्यासाठी माझ्याच उंचीचा लाकडी बुरूज (धमधमा) तयार केला. मला हसायला आले. मी मराठी साम्राज्याचा गड....ह्या असल्या बुरुजासमोर वाकने शक्य नाव्हते. धमधम्यावरून होणारा तोफांचा मारा माझ्या देशभक्तीला किंचितही खिंडार पाडू शकत नव्हता. शहाबुद्दीन खानचा दम झाला म्हणून औरंगजेबाने फतेह खान ला पाठवलं. फतेह खानला तर मी पळवून लावला. त्यानंतर कासम खान आला. आला तो मोठ्या गुर्मीत... मात्र नंतर मी म्हणजे काही भुताटकी आहे कि काय, असे समजून घाबरायला लागला. ह्या आमच्या पराक्रावर खुश होऊन संभाजी महाराजांनी माझ्या किल्लेदाराला आणि मला, चिलखत, पोषाख आणि रत्नजडित कडे देवून गौरविले. त्यावेळी माझा उर भरून आला. असाच मी सहा वर्ष झुंज देत राहिलो... प्रभूश्रीरामांनी माझी शेज म्हणून निवड केली, माझ्या अंगावरचा प्रत्येक कण त्यांच्या चरनकमलानी पावन झालेला आहे. मी गनिमांचा पाय माझ्यावर पडू देण शक्यच नव्हत.. मी अजिंक्य होतो....

त्यानंतर मात्र न घडावे तेच घडले. मराठी साम्राज्याला लागलेला शाप म्हणजे फितुरी... त्या फितुरीने मला माझ्या जीवनाचा कलंक लावला. नवा आलेला किल्लेदार फितुर झाला अन् १६८७ मध्ये मला औरंगजेबाने ताब्यात घेतलं.... फितुरीने घात केला नाहीतर मी अजूनही हरलेलो नाही.... मी अजूनही हरलेलो नाही.... रामशेज(एका अतुल्य पराक्रमाची गाथा).

"कलावंतीण दुर्ग" .... नावातील गूढ अजून कायम आहे !!!'कलावंतीण' .... . महाराष्ट्रातील एक लोकप्रिय आणि ऐतिहासिक नाव. कलावंत...
18/11/2018

"कलावंतीण दुर्ग" .... नावातील गूढ अजून कायम आहे !!!

'कलावंतीण' .... . महाराष्ट्रातील एक लोकप्रिय आणि ऐतिहासिक नाव. कलावंतीण हा शब्द तसा अनेक अर्थाने लोकप्रिय आहेच परंतु ह्या शब्दामध्ये असलेली अनामिक ओढ, पुरातन काळापासून महाराष्ट्रातील जनतेला भुरळ घालण्यात यशस्वी ठरली आहे. म्हणूनच ... 'कलावंतीण दुर्ग' आपल्याला अगोदर त्याच्या नावामुळे आकर्षित करतो आणि त्यानंतर त्याच्या अतिधोकादायक आणि थरारक चढणीसाठी. आमचीही भ्रमंतीची आवड आणि तीच अनामिक ओढ आम्हाला (सोमनाथ वानखेडे, नितीन गायकवाड, ज्ञानेश्वर खांडबहाले, रावसाहेब शिंदे) कलावंतीण दुर्गावर घेऊन गेली मात्र.... नावातील गूढ मात्र अजून कायम आहे !!!

कलावंतीण दुर्ग हा प्रबळगडाचाच एक भाग आहे. ह्या गडावर जाण्यासाठी मुंबई- पुणे महामार्गावरून शेडुंग फाट्यावरून प्रबळगडाकडे वळावे लागते. प्रबळगडाच्या पायथ्याला ठाकूरवाडी हे गाव आहे. कळंबोळीपासून पनवेल बायपासने आल्यास जेथे मुंबई-पुणे महामार्ग जोडला जातो, तेथे शेडुंग फाटा लागतो. शेडुंग फाट्यावरून ठाकुरवाडीला आल्यावर प्रबल गडाच्या दिशेने पायी पायी जावे लागते.

कलावंतीण बुरुज मात्र विस्मयकारक आहे. नाव कलावंतीण का आहे.. हे मात्र गूढच. कलावंतीण वर चढताना आणि उतरतानाही प्रत्येक पायरीवर पाय टाकताना प्राण कंठाशी येऊन आपल्या अगोदर आपल्या जीवनाचा अंदाज घेत असतो. आपले श्वास आपल्याच ताब्यात राहत नाहीत. एखाद्या शुल्लक खड्यावरून सटकलेला पाय सगळ्या अंगात झिणझिण्या आणतो.... त्या सरळ मेंदूपर्यंत जातात. ..... मात्र ट्रेकरम्हणून जो थरार हवा असतो तो मात्र मनसोक्त लुटता येतो…. आणि मी तो मनमुराद लुटला.

प्रबळगडाचा इतिहास: प्रबळगडाचे पूर्वीचे नाव 'मुरंजन' असे होते. शिवाजी महाराजांनी 'मुरंजन' नाव बदलून 'प्रबळगड' असे नामकरण केले. प्रबळगड सर्वात अगोदर बाहमनी राज्यांनी बांधला होता. उद्देश होता... उत्तर कोकण परिसरात पनवेल किल्ला आणि कल्याण किल्ला वर नजर ठेवने. सुमारे 1458 ला, अहमदनगरच्या मलिक अहमद यांनी कोकण जिंकल्यानंतर कडून ह्या किल्ल्यावर कब्जा केला. अहमदनगर साम्राज्याच्या पतनानंतर शहाजी राजांनी अहमदनगर साम्राज्याकडून मुगल साम्राज्य आणि आदिलशाही राजवंशांच्या शक्तींच्या विरोधात प्रयत्न केले. थोड्या काळापर्यंत शहाजी राजांनी आपली पत्नी राजमाता जिजाबाई आणि बालशिवाजींसोबत मुरंजन येथे वास्तव्य केले. तथापि, शहाजीराज्यांच्या पराजयानंतर ह्या किल्ल्यासह उत्तर कोकण मुघलांनी जिंकले. ह्यानंतर मुहुलीचा करारात मुघलांनी ह्या ठिकाणचे क्षेत्राधिकार बीजापुरच्या आदिलशहाला दिले. 1657 मध्ये छत्रपती शिवाजींमहाराजांनी मुघलांकडून हा किल्ला जिंकला. ह्या किल्ल्याचे नाव प्रबळगड असे ठेवण्यात आले.

सन 1826 मध्ये, स्वातंत्र्य सेनानी उमाजी नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी थोड्या काळासाठी वास्तव्यासाठी उपयोग केला होता.
ह्या किल्ल्याची उंची २३०० फूट आहे. नावाप्रमाणेच हा गाद खूप मजबूत आणि खूप मोठा आहे. निसर्गाची देणगी आहे कि प्रबळगडाला खूप मोठे पठार लाभले आहे. पठारावर गर्द झाडीत जुने किल्ल्याचे बांधकाम सुरक्षित स्थितीत बघायला मिळते. पाण्याचे टाकेही आहेत. अनेक जंगली प्राण्याचा वावर असल्याच्या स्पस्ट खुणा आपल्याला बघायला मिळतात. चारही दिशांना मजबूत बुरुज किल्ल्याच संरक्षण करतात. अनेक ठिकाणी निमुळत्या आणि लांब गुहा तयार केलेल्या आहेत. त्यापैकी एका गुहेत आम्ही आतवर शिरलो होतो. त्या गुहेत जर एकही जंगली प्राणी असता तर बहुतेक मला हे लिहिण्याची संधी मिळाली नसती.

13/11/2018

“The world is a book, and those who do not travel read only one page.” – Saint Augustine

So.. U decide.... Want to Read only "One Page" or "Book"!..... Nashik Tourism

Address

Nashik

Telephone

09423101666

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maharashtra Tourism posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share