आगरी व कोळी समाज सेल - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार

  • Home
  • India
  • Navi Mumbai (New Mumbai)
  • आगरी व कोळी समाज सेल - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार

आगरी व कोळी समाज सेल - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार To Promote Aagri and Koli Community of Maharashtra, and resolve their social, political cultural issues.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा संसद रत्न सन्मानीय खासदार सौ सुप्रिया सुळे ताई...
02/09/2026

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा संसद रत्न सन्मानीय खासदार सौ सुप्रिया सुळे ताई ह्यांच्या भिवंडी दौऱ्या निमित्त सन्मानीय खासदार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे ह्यांच्या घरी भेट झाली, सोबत माजी मंत्री आणि सन्मानीय आमदार जितेंद्र आव्हाड साहेब आणि बाळ्यामामांचे चिरंजीव श्री सुमित म्हात्रे उपस्थित होते.

ह्यावेळी ताईंना आमचे मित्र आणि AKYF चे कोर सदस्य अरविंद पाटील ह्यांनी आगरी भाषेत लिहिलेले #बोली हे पुस्तक भेट दिले, आणि ताईंनी ही मोठ्या उत्सुकतेने ते स्वीकारले त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार!

सीए निलेश मिनाक्षी ज्ञानेश्वर पाटील
प्रदेश अध्यक्ष- आगरी व कोळी समाज सेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार
अध्यक्ष- आगरी कोळी यूथ फाउंडेशन
संपर्क- ९९२०२८२८२०

Balya Mama - Suresh Rekha Gopinath Mhatre Jitendra Awhad Supriya Sule

 #विचारकरा
02/09/2026

#विचारकरा

कुळ कायद्याचे जनक आप्पासाहेब नारायण नागू पाटील साहेब यांना त्यांच्या १३४ व्या जयंती निमित्त त्यांना मानाचा मुजरा!!! चला ...
29/08/2026

कुळ कायद्याचे जनक आप्पासाहेब नारायण नागू पाटील साहेब यांना त्यांच्या १३४ व्या जयंती निमित्त त्यांना मानाचा मुजरा!!!

चला तर त्यांच्या जयंती निमित्त नारायण नागू पाटील साहेबांच्या नेतृत्वा खाली लढल्या गेलेल्या कुळ कायद्याच्या आंदोलनाच्या इतिहासावर एक दृष्टीक्षेप टाकूयात...

आगरीकोळी समाजाचे सुपुत्र श्री नारायण नागू पाटील हे मुळचे अलिबाग तालुक्यातील चरी जवळील धेरंड येथील. त्यांनी १९३२ साली दांडग्या सावकारांविरुद्ध “खोती विरुद्ध आंदोलनाला” सुरुवात केली जे १९३९ पर्यंत सतत सात वर्ष १९३९ पर्यंत सुरु होता. स्थानिक भूमिपुत्र असलेला आगरी-कोळी आणि इतर बहुजन शेतकरी समाजाचे सुरु असलेले शोषण त्यांना पाहवले नाही. त्यावेळी जवळ जवळ सर्वच जमिनीचे मालक हे सावकार होते किंवा शेतकऱ्यांच्या उरल्या सुरल्या जमिनी ह्या सावकाराकडे गहाण पडून सावकार किंवा खोत त्यांचे मालक झाल्यात जमा होते.

शेतकरी वर्षभर जमिनी कसत, आणि सावकाराने फेकलेल्या तुकड्यांवर त्यांना जगावे लागे. त्यांच्या श्रमाचे योग्य मोल हि त्यांना मिळत नव्हते. एकीकडे इंग्रजी सरकार आणि दुसरीकडे स्वतःच्याच देशातील सावकारांनी चालवले त्यांचे हाल नारायण नागू पाटील या चाळीशीच्या आसपास च्या तरुणाला पाहवले नाही. त्यांनी सावकारांविरुद्ध यल्गार उभारला आणि “खोती विरुद्ध” आंदोलना सुरुवात झाली आणि त्यांना त्यात साथ मिळाली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची.

"जमिनीचा मालकी हक्क मिळत नसेल तर जमीन कसणार नाही”, असा नारा दिला गेला, जवळ जवळ ७ वर्ष जमिनी कसण्याविना ठेवल्या गेल्या, ज्या शेतीमुळे त्यांचे दोन वेळेचे अर्धवट का होईना पोट सुरु होते, ती शेती बंद ठेवली गेली होती, शेतकरी जंगलातील पाला पाचोळा खाऊन जगत होती, पण आंदोलन सुरु होते, जागतिक पातळीवर हि इतका दीर्घ वेळ सुरु असलेल्या या संपाची दखल घेतली गेली होती. सरकार कडे सातत्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतकऱ्यांची बाजू लावून धरली होती. आणि त्यातुनच स्वातंत्र्यानंतर “कसेल त्याची जमीन” म्हणजेच “कुळ कायद्याचा” जन्म झाला आणि कसणारा शेतकरी त्या जमिनींचा मालक झाला आणि हे घडवून आणणारा आपल्या समाजाचा माणूस होता याचा आपल्या सार्थ अभिमान असायला हवा. कुळ कायदा नसता तर आपल्याला १२.५% योजनेचा लाभ सुद्धा आपल्याला मिळाला नसता.

त्यामुळे कुळकायदा आणून आम्हा समस्त महाराष्ट्रातील कसणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनीचे मालक बनविणाऱ्या आगरी कोळी समाजाचे सुपूत्र आप्पासाहेब नारायण नागू पाटील साहेब यांना त्यांच्या १३४ व्या जयंती निमित्त आगरी-कोळी युथ फाउंडेशन, आणि समस्त भूमिपुत्र आणि शेतकऱ्यांच्या वतीने पुन्हा एकदा मानाचा मुजरा!!!

सीए निलेश ज्ञानेश्वर पाटील
प्रदेश अध्यक्ष- आगरी व कोळी समाज सेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार
अध्यक्ष- आगरी कोळी यूथ फाउंडेशन
संपर्क- ९९२०२८२८२०

#नानापाटील #आगरीकोळी #भूमिपुत्र #कुळकायदा #कसेलत्याचीजमीन

Balya Mama - Suresh Rekha Gopinath Mhatre

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष, उच्चशिक्षित व्यक्तिमत्व, धडाडीचे उद्योजक आणि आमच...
22/08/2026

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष, उच्चशिक्षित व्यक्तिमत्व, धडाडीचे उद्योजक आणि आमचे मित्र डॉ मंगेश आमले साहेब ह्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आई एकवीरा त्यांना उदंड निरोगी आनंदी आणि अधिक यशस्वी आयुष्य देवो!🙏💐🎂❤️

“सागरी भूमिपुत्रांची वज्रमूठ!”✊गुरुवार दिनांक २० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता शासकीय विश्राम गृह, ठाणे येथे भिवंडी ...
21/08/2026

“सागरी भूमिपुत्रांची वज्रमूठ!”✊

गुरुवार दिनांक २० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता शासकीय विश्राम गृह, ठाणे येथे भिवंडी लोकसभेचे विद्यमान खासदार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे ह्यांच्या ह्यांच्या माध्यमातून ठाणे, रायगड, पालघर, मुंबई आणि उपनगर ह्या पाच ही सागरी जिल्ह्यातील सागरी भूमिपुत्र संघटनांच्या प्रतिनिधींची त्या त्या भागातील सागरी भूमिपुत्रांच्या समस्या आणि प्रश्न समजून घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आलेली होती.

सदर बैठकीला पाच ही सागरी जिल्ह्यातील पन्नास हून अधिक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून आपापल्या भागातील व्यथा खासदार बाळ्यामामा म्हात्रे ह्यांच्या पुढे मांडल्या ज्या मध्ये विविध प्रकल्पासाठीचे अन्यायकारक भूसंपादन, भूमिपुत्रांच्या जमिनीवर पाडलेले आरक्षण, गावठाण आणि विस्तारित गावठाण आणि कोळीवाड्यांचे नियमनाचे प्रश्न, रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी अशा विविध विषयांवर चर्चा झाली.

आणि ते समस्यांची सोडवणूक करण्याकरीता पाच ही सागरी जिल्ह्यातील भूमिपुत्रांची शिखर संघटना असावी आणि त्याचे नेतृत्व खासदार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे ह्यांनी करावे अशी कळकळीची विनंती सर्व उपस्थित प्रतिनिधींनी केली.

सन्मानिय खासदार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे ह्यांनी ही सदर विनंती ला सकारात्मक प्रतिसाद देत सागरी भूमिपुत्रांच्या समस्या सोडविण्यासाठी लवकरच समाजाची एक शिखर संस्था म्हणून सागरी भूमिपुत्र संघटनेचे नियोजन होईल आणि त्या माध्यमातून समाजाचे विविध प्रश्न आणि समस्या सोडविण्याचे १००% प्रयत्न केले जातील असे उपस्थितांना आश्वस्त केले.

बैठकीला नवी मुंबईतून सीए निलेश पाटील, अविनाश सुतार, प्रवीण पाटील, हिमांशू पाटील ठाणे शहरातून सागर पाटील, डॉ गिरीश साळगावकर, पुंडलिक वाडेकर, रोहिदास पाटील, अनंत डाकी, सागर बारी, गीतेश घरत, मिलिंद पाटील, वसई हुन सुशांत पाटील, भिवंडी हुन सर्वेश तरे, मनेश पाटील, अरविंद म्हात्रे, कल्याण डोंबिवली हून संजय पाटील, नितीन पाटील, श्री पावशे, संतोष पाटील, सचिन पाटील, महेंद्र पाटील, शिळ डायघर हून उदय मुंडे, रोहिदास मुंडे, हिरा पाटील, संजय नथू पाटील, अॅड कौशल पाटील, चौदा गाव नवी मुंबई पूर्व मधून कमलाकर पाटील, किशोर पाटील, निवृत्ती पाटील, पनवेल हून संजय घरत, अॅड विवेक भोपी, प्राजक्ता गोवारी, रश्मिता पोपेटा, किरण केणी, उलवे हुन राज पाटील, विशाल भोईर, पेण रोहा हुन अॅड रोशन पाटील, विकी कदम, अलिबाग हून आल्हाद पाटील, मुंबई हून विकास कोळी, वैभव पाटील, शहापूर हून भास्कर भोईर सर, मुरबाड हून नगराध्यक्ष राम दुधाले आणि विविध संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्य समन्वयक-
सीए निलेश मिनाक्षी ज्ञानेश्वर पाटील
संपर्क: ९९२०२८२८२०

#सागरीभूमीपुत्र #आगरीकोळी #कराडी #कुणबी #आदिवासी
Balya Mama - Suresh Rekha Gopinath Mhatre
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

🇮🇳 भारताचे माजी पंतप्रधान, आधुनिक भारताचे शिल्पकार राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 💐राजीव गांधी यांनी भार...
20/08/2026

🇮🇳 भारताचे माजी पंतप्रधान, आधुनिक भारताचे शिल्पकार राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 💐
राजीव गांधी यांनी भारताच्या विकासाला आधुनिक दिशा देताना विज्ञान, तंत्रज्ञान, संगणकीकरण आणि दूरसंचार क्षेत्राला चालना दिली. तरुण शक्ती ही देशाच्या प्रगतीची खरी ताकद आहे, या विचारातून त्यांनी युवकांना राष्ट्रनिर्माणाच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले.
स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी, पंचायतराज व्यवस्थेचा विस्तार, शिक्षणाचा प्रसार आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशाला २१व्या शतकासाठी सक्षम करण्याचे त्यांचे प्रयत्न भारताच्या आधुनिक वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे ठरले.
देशाची एकता, अखंडता, शांतता आणि सामाजिक सलोखा यांना त्यांनी सदैव महत्त्व दिले. आधुनिक, प्रगत आणि तंत्रज्ञानसक्षम भारताचे स्वप्न पाहणाऱ्या राजीव गांधी यांच्या विचारांमधून आजच्या युवा पिढीने प्रेरणा घेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!💐

सीए निलेश मिनाक्षी ज्ञानेश्वर पाटील
प्रदेश अध्यक्ष – आगरी व कोळी समाज सेल, महाराष्ट्र राज्य
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार

🕯️ विचारांना मरण नसते…बुद्धीवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रद्धा, र...
20/08/2026

🕯️ विचारांना मरण नसते…
बुद्धीवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रद्धा, रूढी-परंपरा आणि समाजातील अवैज्ञानिक विचारांविरोधात आयुष्यभर निर्भीडपणे संघर्ष केला. वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकनिष्ठ विचार आणि सामाजिक परिवर्तनाची चळवळ त्यांनी महाराष्ट्राच्या जनमानसात रुजवली.
समाजात प्रश्न विचारण्याची, सत्याचा शोध घेण्याची आणि अंधश्रद्धेऐवजी विवेक व विज्ञानाची कास धरण्याची प्रेरणा देणारे त्यांचे विचार आजही तितकेच मार्गदर्शक आहेत.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन! 💐
त्यांचा विवेकवादी विचार आणि वैज्ञानिक दृष्टिकोन पुढे नेणे, हीच त्यांना खरी आदरांजली.

सीए निलेश मिनाक्षी ज्ञानेश्वर पाटील
प्रदेश अध्यक्ष – आगरी व कोळी समाज सेल, महाराष्ट्र राज्य
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री मा. शशिकांत शिंदे साहेब यांच्या मान्यतेने मा. खा. सुरेश बाळ्यामामा म्हात्रे साहेब ...
18/08/2026

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री मा. शशिकांत शिंदे साहेब यांच्या मान्यतेने मा. खा. सुरेश बाळ्यामामा म्हात्रे साहेब यांची पक्षाच्या ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !

सीए निलेश मिनाक्षी ज्ञानेश्वर पाटील
प्रदेश अध्यक्ष - आगरी व कोळी समाज सेल, महाराष्ट्र राज्य | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार

आगरी व कोळी समाज सेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार नवी मुंबईचे सेलचे जिल्हाध्यक्ष श्री प्रवीण तुकाराम पाटील ह्...
17/08/2026

आगरी व कोळी समाज सेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार नवी मुंबईचे सेलचे जिल्हाध्यक्ष श्री प्रवीण तुकाराम पाटील ह्यांच्या पुढाकाराने आणि दारावे गावातील ग्रामस्थांच्या सहकार्याने समाज मंदिर भूखंडाचा प्रश्न मार्गी लागला असून १५ ऑगस्ट २०२६ रोजी सदर समाज मंदिरांचे भूमिपूजन ग्रामस्थांच्या हस्ते दारावे गावात उत्साहात संपन्न झाला.

गेले अनेक वर्ष प्रवीण पाटील आणि त्यांचे सहकारी ग्रामस्थ सदर समाज मंदिरासाठी सातत्याने संघर्ष करत होते आणि आज त्या संघर्षाची सकारात्मक फलश्रुती होत आहे त्याबद्दल आगरी व कोळी समाज सेल ची प्रदेश कार्यकारिणी आणि पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष श्री प्रवीण पाटील आणि दारावे ग्रामस्थांचे मनःपूर्वक अभिनंदन!

Pravin T. Patil
#भूमिपुत्र #समाजमंदिर
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar NCP SP - Navi Mumbai Balya Mama - Suresh Rekha Gopinath Mhatre Shashikant Shinde

वाढत्या शहराच्या विकासाचे बळी ठरणारी शहरातील गावठाणे-शनिवार दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत मीर...
16/08/2026

वाढत्या शहराच्या विकासाचे बळी ठरणारी शहरातील गावठाणे-

शनिवार दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत मीरा भाईंदर महानगर पालिका क्षेत्रात येणाऱ्या राई गावात राई मुर्धा आणि मोरवा ह्या तीन गावांच्या गावठाण आणि विस्तारित गावठाण नियमन ह्या विषयावरील सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहण्याची संधी मिळाली.

ह्यावेळी मोडकळीस आलेल्या जुन्या घरांच्या जागेवर नव्याने बांधल्या जाणाऱ्या घरांवर होणारी कारवाई, ती थांबवण्यासाठी करावी लागणारी तात्पुरती आणि कायम स्वरूपी उपाययोजना, घरांच्या जमिनी आणि घरे नियमित करण्याच्या कायदेशीर तरतुदी आणि उपाययोजना, प्रशासना सोबत करावी लागणारी हाताळणी, ग्रामस्थांच्या एकीची आणि संघटितपणाची आवश्यकता ह्यावर सविस्तर प्रबोधन आणि मार्गदर्शन करण्याची संधी ह्यावेळी मिळाली.

उपस्थित शेकडो ग्रामस्थांनी आपल्या मनातल्या शंकांचे निरसन ह्यावेळी करून घेतले आणि ग्रामस्थांची टीम बनवून येणाऱ्या काळात पोलीस आणि पालिका प्रशासनाला स्ट्रॅटेजिक आणि कायदेशीर पद्धतीने हाताळण्याचे एकमताने ठरले.

ह्यावेळी माझ्या सोबत ठाण्यातून आगरी सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष सागर पाटील, आगरी व कोळी समाज सेल चे सरचिटणीस संजय पाटील, सचिव विधी विभाग अॅड कौशल पाटील, सहसचिव हिमांशु पाटील उपस्थित होते.

सदर ग्राम सभा आमचे चळवळीतील मित्र प्रशांत म्हात्रे ह्यांच्या प्रयत्नाने लावण्यात आलेली होती ज्या मध्ये शिलोत्री संघाचे अध्यक्ष अशोक पाटील, नगरसेवक जयेश म्हात्रे, अनिताताई म्हात्रे, दिप्तेश पाटील, कुणाल म्हात्रे आणि अनेक ज्येष्ठ तरुण ग्रामस्थ आणि माता भगिनी उपस्थित होते.

सीए निलेश ज्ञानेश्वर पाटील
प्रदेश अध्यक्ष- आगरी व कोळी समाज सेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार
अध्यक्ष- आगरी कोळी यूथ फाउंडेशन
संपर्क- ९९२०२८२८२०

#गावठाण #नियमन #सागरीभूमिपुत्र #आगरीकोळी

Balya Mama - Suresh Rekha Gopinath Mhatre
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

Address

Gauri Nandan, House No. 288, At/Gothivali Village, Post And Node/Ghansoli
Navi Mumbai (New Mumbai)
400701

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आगरी व कोळी समाज सेल - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share