10/07/2026
🚨 "रेल्वे स्थानकांवरील स्टॉल्स मराठी मुलांनाच मिळाले पाहिजेत!" : राज ठाकरेंचे मनसे कार्यकर्त्यांना कडक आदेश!
'मनसे रेल्वे कामगार सेना' स्थापना दिनाच्या निमित्ताने राज ठाकरेंनी केवळ राजकीय टोलेबाजी न करता, मराठी तरुणांच्या रोजगाराच्या मुद्द्यावर अत्यंत महत्त्वाची भूमिका मांडली. रेल्वे स्थानकांवर मराठी माणसाचा ठसा पुसला जाऊ नये, यासाठी त्यांनी मनसैनिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
📌 पोस्टमधील महत्त्वाचे मुद्दे:
👉 स्टॉल्सच्या टेंडर्सवर मराठी मुलांचा हक्क: मुंबईसह महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थ, पुस्तके आणि इतर वस्तूंच्या स्टॉल्सची कंत्राटं (टेंडर्स) स्थानिक मराठी तरुणांनाच मिळाली पाहिजेत, अशी आग्रही मागणी राज ठाकरेंनी केली.
👉 "पायाखालची जमीन सरकेल..." : रेल्वे स्टेशन आणि भरती प्रक्रियेत सध्या काय चाललंय यावर बारीक लक्ष ठेवा, आपण बेसावध राहिलो तर पायाखालची जमीन सरकेल, असा इशारा त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
👉 २००८ च्या आंदोलनाची आठवण: लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना महाराष्ट्रातील मुलांना डावलून उत्तर प्रदेश-बिहारमध्ये रेल्वे भरतीच्या जाहिराती दिल्या जायच्या. त्याविरुद्ध मनसेने केलेल्या आक्रमक आंदोलनाची आठवण त्यांनी करून दिली.
👉 ममता बॅनर्जींचे कौतुक: मनसेच्या आंदोलनानंतर ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना त्यांनी प्रादेशिक भाषांमध्ये रेल्वे भरतीच्या जाहिराती देण्याचा निर्णय घेतला, याचे राज ठाकरेंनी कौतुक केले.
🚨 "रेल्वे स्थानकांवरील स्टॉल्स मराठी मुलांनाच मिळाले पाहिजेत!" : राज ठाकरेंचे मनसे कार्यकर्त्यांना कडक आदेश!
#राजसाहेब
#महाराष्ट्र