13/10/2020
काल दिनांक 12/10/2020 रोजी मा,श्री, शशिकांत शिंदे साहेब, आमदार विधान परिषद तथा नवी मुंबई प्रभारी व घणसोली गावातील तरूण व
ब्लास्टर बॉईज ग्रुप, म्हात्रे आळी व मंगलमूर्ती प्रतिष्ठान यांनी घणसोली गावातील विध्युत प्रवाह वारंवार खंडित होत असल्यामुळे रहिवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्या कारणाने, त्याच बरोबर अचानक खंडित होणाऱ्या विध्युत प्रवाहामुळे घरातील महागडी उपकरणे खराब होण्याचा सरास प्रकार होत असल्यामुळे हे संगळे शिष्टमंडळ महावितरण कार्यालय वाशी येथे चर्चा करण्यासाठी गेले असता ,वाढीव बील कमी करूण लवकरात लवकर खंडित होणाऱ्या विध्युत प्रवाहाचे दुरस्तीकरण व सब स्टेशन केन्द्र उभारण्याचे काम येणाऱ्या काही दिवसातच सुरू होऊन या समस्या सुटण्याचा मार्ग मोकळा जहाला असुन लवकरच गावठाण भागांत यांचे काम सुरू होईल.असे आश्वासन अधिकारी वर्गाने दिले आहे.
तसेच यासाठी ब्लास्टर बॉईज ग्रुप (म्हात्रे आळी) यांनी घणसोली गावातील विविध मंडळातील सभासदांना संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या स्वाक्षरीने त्यांचं सहमत घेऊन हे तक्रार अर्ज माननीय आमदार श्री शशिकांत शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत वाशी येथील MSEB कार्यालयातील
श्री राजाराम माने साहेब (अधीक्षक अभियंता) यांना देण्यात आले. सदर बैठकीसाठी MSEB ऐरोली, घणसोली विभागातील अधिकारीही उपस्थित होते.
श्री गोडसे सर (कार्यकारी अभियंता)
श्री सुरेश जाधव (अतिरिक्त कार्यकारी अभियंता)
श्री विवेक भट (सहाय्यक अभियंता)
श्री दीपक भट (सहाय्यक अभियंता)
श्री दीपक शिंदे (सहाय्यक अभियंता)