Seeta Ramchandra Dalvi

Seeta Ramchandra Dalvi Social Worker S R Dalvi(I) Foundation is a non-profit organization, founded by Smt Seeta Ramachandra Dalvi and Mr. The one our parents trust.

Ramachandraa Dalvi, in gratitude to our society’s two pillars of education and environment.With a dream of a sustainable and enlightened society, our foundation aims to empower teachers and instill environmental awareness among students.After family, the first person we meet is the teacher.

🌹 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त विनम्र अभिवादन! 🌹"पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नाही, तर कष्टकरी, शोषित आणि बहुजनांच्य...
01/08/2026

🌹 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त विनम्र अभिवादन! 🌹
"पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नाही, तर कष्टकरी, शोषित आणि बहुजनांच्या तळहातावर तरलेली आहे."
अन्याय, विषमता आणि शोषणाविरुद्ध आपल्या लेखणीतून आवाज उठवणारे, बहुजन समाजाच्या वेदनांना शब्दबद्ध करणारे, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील तेजस्वी व्यक्तिमत्त्व, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏

#लोकशाहीरअण्णाभाऊसाठे #अण्णाभाऊसाठे #अण्णाभाऊसाठेजयंती #मराठीसाहित्य #महाराष्ट्र #सामाजिकन्याय #मराठी #मराठीमाणूस #जयभीम

🌺 गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सर्व गुरुजनांना विनम्र अभिवादन🙏🙏सर्व शिक्षक, मार्गदर्श...
29/07/2026

🌺 गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सर्व गुरुजनांना विनम्र अभिवादन🙏🙏
सर्व शिक्षक, मार्गदर्शक, पालक आणि जीवनात योग्य दिशा दाखवणाऱ्या प्रत्येक गुरूंना एस. आर. दळवी (I) फाउंडेशन तर्फे गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸

#गुरुपौर्णिमा #भारतीयसंस्कृती #मराठी

🌿🙏 आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🌿पांडुरंगाच्या नामस्मरणात चालणारी वारी ही केवळ भक्तीची नव्हे, तर सेवा, समर्पण आणि...
25/07/2026

🌿🙏 आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🌿

पांडुरंगाच्या नामस्मरणात चालणारी वारी ही केवळ भक्तीची नव्हे, तर सेवा, समर्पण आणि संस्कृतीची परंपरा आहे.

"विठ्ठलभक्ती म्हणजेच निसर्गभक्ती... आणि पर्यावरण संवर्धन हीच खरी पांडुरंगाची पूजा!" 💚

जय हरी विठ्ठल! 🚩

#आषाढीएकादशी #आषाढीवारी #पंढरपूरवारी #जयहरीविठ्ठल #विठ्ठल विठ्ठलरखुमाई हरितवारी निसर्गभक्ती पर्यावरणसंवर्धन वृक्षलागवड प्लास्टिकमुक्तवारी स्वच्छभारत GoGreen SaveNature PlantATree EcoFriendly GreenMaharashtra

🌱 वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी संदेश! 🌿रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालय, काले (ता. कराड) य...
21/07/2026

🌱 वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी संदेश! 🌿
रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालय, काले (ता. कराड) येथे कृषी सप्ताहानिमित्त एस. आर. दळवी फाउंडेशन व निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात वृक्षारोपण सोहळा संपन्न झाला.
विद्यालयाने गतवर्षी लावलेल्या ९५% वृक्षांचे यशस्वी संवर्धन केल्याबद्दल संस्थेचे विशेष अभिनंदन करण्यात आले. मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांच्या सहभागामुळे हा उपक्रम अधिक प्रेरणादायी ठरला.
🌳💚

🌱 आशिया खंडातील सर्वात मोठ्या रयत शिक्षण संस्थेच्या जन्मगावातील महात्मा गांधी विद्यालय, काले येथे हजारो सिडबॉल्स तयार कर...
18/07/2026

🌱 आशिया खंडातील सर्वात मोठ्या रयत शिक्षण संस्थेच्या जन्मगावातील महात्मा गांधी विद्यालय, काले येथे हजारो सिडबॉल्स तयार करून "सिडबॉल ॲक्टिव्हिटी" मोठ्या उत्साहात संपन्न! 🌿

राष्ट्रीय पुरस्कार विजेते किरण कुंभार सर यांच्या पुढाकारातून आणि मुख्याध्यापक एस. एम. पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो सिडबॉल्स तयार करण्यात आले. कार्यक्रमात मोहन पाटील सर यांनी पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देत विद्यार्थ्यांना निसर्ग संरक्षणाची प्रेरणा दिली.

16/07/2026

🌳 एस. आर. दळवी (I) फाउंडेशन, सातारा शाखा आणि रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालय, काले येथे कृषी सप्ताहानिमित्त वृक्षपूजन व वृक्षदिंडी सोहळा उत्साहात संपन्न झाला. 🌱
मुख्याध्यापक एम. एस. पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली, मोहन पाटील सर यांच्या उपस्थितीत आणि किरण कुंभार सर यांच्या नियोजनातून विद्यार्थी, शिक्षक व मान्यवरांच्या सहभागाने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
"एक वृक्षापासून जंगल घडते, आणि एका विचारापासून समाज बदलतो." 🌿

🌱

🌱 International Plastic Bag Free Day | 3rd July 🌱Every plastic bag used for a few minutes can remain on our planet for h...
03/07/2026

🌱 International Plastic Bag Free Day | 3rd July 🌱

Every plastic bag used for a few minutes can remain on our planet for hundreds of years. The choice is ours - continue polluting the Earth or become part of the solution.

🛍️ Carry a cloth bag.
🌍 Protect our planet.
💚 Inspire others to choose sustainability.

One Cloth Bag Today, A Greener Tomorrow.

Together, let's reduce plastic waste, protect wildlife, keep our oceans clean, and build a healthier future for the next generation.

♻️ Say NO to single-use plastic. Say YES to a greener Earth!

🌍💚

*S. R. Dalvi (I) Foundation च्या वनमहोत्सव उपक्रमाला दमदार सुरुवात; ‘एक विद्यार्थी – एक रोप – एक झाड’ अभियानातून विद्यार...
01/07/2026

*S. R. Dalvi (I) Foundation च्या वनमहोत्सव उपक्रमाला दमदार सुरुवात; ‘एक विद्यार्थी – एक रोप – एक झाड’ अभियानातून विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश*

S. R. Dalvi (I) Foundation तर्फे वनमहोत्सवानिमित्त राबविण्यात येणाऱ्या “एक विद्यार्थी – एक रोप – एक झाड” या अभिनव उपक्रमाला उत्साहपूर्ण सुरुवात झाली असून, छत्रपती शिवाजी विद्यालय, दुधोंडी, ता. पलुस, जि. सांगली येथील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी घरातील वापरून झालेल्या टाकाऊ प्लास्टिक वस्तूंचा पुनर्वापर करून त्यामध्ये विविध प्रकारची रोपे तयार करून शाळेत आणली. पर्यावरण संवर्धनासोबतच ‘Reuse, Reduce, Recycle’ या संकल्पनेचा प्रभावी संदेश विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दिला.

शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी आणलेल्या रोपांची लघु रोपवाटिका (Mini Nursery) तयार करण्यात येणार असून, पुढील काही महिन्यांपर्यंत विद्यार्थी व शिक्षक या रोपांचे संगोपन करणार आहेत. त्यानंतर ही रोपे शाळा परिसर, गाव तसेच सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येणार असून त्यांची नियमित काळजी घेतली जाणार आहे.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन, पुनर्वापर, वृक्षसंवर्धन आणि निसर्गप्रेमाची भावना दृढ होत असल्याचे शाळेच्या शिक्षकांनी सांगितले.









राष्ट्राच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना आणि डॉक्टरांना मनःपूर्वक सलाम!🌾 जागतिक कृषी दिनाच्या ह...
01/07/2026

राष्ट्राच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना आणि डॉक्टरांना मनःपूर्वक सलाम!

🌾 जागतिक कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
👨‍⚕️ राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

#शेतकरी #डॉक्टर #कृषीदिन #डॉक्टरदिन #जयकिसान #निरोगीभारत #समृद्धभारत 🌱

Address

Office No 6, Mayuresh Cosmos, Ground Floor, Sector 11, CBD Belapur
Navi Mumbai
400614

Alerts

Be the first to know and let us send you an email when Seeta Ramchandra Dalvi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Seeta Ramchandra Dalvi:

Shortcuts

Share