Aasha Foundation Navi Mumbai

Aasha Foundation Navi Mumbai "Asha Foundation" is established on 3rd January 2024 for the empowerment of girls.

24/03/2026

महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री मा. ना. अदिती तटकरे यांनी आशा फाऊंडेशन, नवी मुंबई तर्फे आयोजित "आशा गौरव पुरस्कार 2026" कार्यक्रमाला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

महिला सशक्तीकरण, शिक्षण आणि समाजासाठी प्रेरणादायी कार्य करणाऱ्या एकल पालक व अनाथ मुलींच्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.

त्यांच्या शुभेच्छा आणि प्रोत्साहनामुळे आमच्या कार्याला नवी ऊर्जा मिळाली आहे. 🌸

— आशा फाऊंडेशन, नवी मुंबई

मराठी नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.       #ᴡᴏᴍᴇɴᴇᴍᴘᴏᴡᴇʀᴍᴇɴᴛ
18/03/2026

मराठी नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.


#ᴡᴏᴍᴇɴᴇᴍᴘᴏᴡᴇʀᴍᴇɴᴛ

✨धन्यवाद ✨ 📍 दैनिक लक्ष्मीपुत्र (सातारा एडिशन १२/०३/२०२६)आपल्यासारख्या संवेदनशील दैनिकाने या समाजकार्याचा आढावा घेतला व ...
14/03/2026

✨धन्यवाद ✨

📍 दैनिक लक्ष्मीपुत्र (सातारा एडिशन १२/०३/२०२६)

आपल्यासारख्या संवेदनशील दैनिकाने या समाजकार्याचा आढावा घेतला व योग्य वार्तांकन केले.
दि. ०८/०३/२०२६ रोजी 'आशा फाउंडेशन' च्या वतीने यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा येथे "आशा गौरव पुरस्कार २०२६" वितरण कार्यक्रम घेण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत सातारा जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकल पालक व अनाथ मुली तसेच संघर्षातून उभ्या राहिलेल्या प्रेरणादायी महिलांचा “आशा तेजस्विनी” व “आशा स्वयंसिद्धा” पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला.
आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद 🙏
आपले पाठबळ आम्हाला कायमच प्रेरणा देत राहील.

श्री. दत्तात्रय जगताप
संस्थापक अध्यक्ष व प्रथम सेवक,
सौ. रूपाली जगताप
उपाध्यक्षा व प्रथम सेविका,
श्री. अमोल भोसले
सचिव.
आशा फाऊंडेशन व टीम, नवी मुंबई.


14/03/2026

काही प्रवास संघर्षातूनच सुरू होतात. आणि, अनेकांसाठी प्रेरणा बनतात.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आशा फाऊंडेशन, नवी मुंबई तर्फे आयोजित “आशा गौरव पुरस्कार २०२६” कार्यक्रमात समाजासाठी प्रेरणादायी कार्य करणाऱ्या कु. शिवानी बाळासो दडस यांचा सन्मान करण्यात आला.

लहानपणी वडिलांचे छत्र हरपलेल्या शिवानी यांनी आपल्या आईच्या मदतीने अनेक अडचणींवर मात करत जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर पुढे जाण्याचा प्रयत्न केला. मास्टर ऑफ फार्मसी (M.Pharm) साठी घेतल्या जाणाऱ्या GPAT, म्हणजेच ग्रॅज्युएट फार्मसी ऍप्टिट्यूड टेस्टमध्ये 96.39% मिळवून AIR 1759 प्राप्त केले आणि गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये एम. फार्मसीसाठी प्रवेश मिळवला.

त्यांच्या या प्रवासाची दखल घेऊन त्यांना पहिल्यावहिला ‘आशा तेजस्विनी पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला.

13/03/2026

काहींचा संघर्ष हा जन्माआधीपासून आईच्या पोटातून सुरू होतो, तो आयुष्यभर सुरूच राहतो....

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित “आशा गौरव पुरस्कार २०२६” कार्यक्रमात कु. दिपाली शिवाजी घोलप यांचा सन्मान करण्यात आला.

वडीलांना नको असलेली मुलगी आईसोबत एकटी राहून जीवनाचा संघर्ष करते व एकमेव छत्र असलेल्या आईलाही गमावल्यानंतर संघर्षमय परिस्थितीतही आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. घरची आर्थिक परिस्थिती कठीण असल्यामुळे बारावीनंतर शिक्षणाला हातभार लागावा म्हणून त्यांनी Genius Polymer या कंपनीमध्ये वर्कर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. प्रचंड मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी पंधरावीपर्यंतचे शिक्षण काम करत असताना फर्स्ट क्लासने पूर्ण केले. आणि, आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे कु. दिपाली आज त्याच कंपनीमध्ये Quality Engineer म्हणून अत्यंत जबाबदारीने काम करत आहेत.

त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासासाठी त्यांना ‘आशा स्वयंसिद्धा पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले.

12/03/2026

08 मार्च 2026 रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या औचित्याने आशा फाऊंडेशन, नवी मुंबई तर्फे आयोजित “आशा गौरव पुरस्कार 2026” सोहळा सातारा येथे उत्साहात संपन्न झाला.

सातारा जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकल पालक व अनाथ मुली तसेच संघर्षातून उभ्या राहिलेल्या प्रेरणादायी महिलांचा “आशा तेजस्विनी” व “आशा स्वयंसिद्धा” पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला.

या सोहळ्यात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते समाजासाठी प्रेरणादायी कार्य करणाऱ्या कु. शिवानी बाळासो दडस यांचा पहिल्यावहिल्या 'आशा तेजस्विनी पुरस्कार २०२६' आणि कु. दिपाली शिवाजी घोलप यांना 'आशा स्वयंसिद्धा पुरस्कार २०२६' प्रदान करण्यात आला. त्यांच्या जिद्द, मेहनत आणि कर्तृत्वामुळे आज अनेकांसाठी नवी दिशा निर्माण झाली आहे.

आशा फाऊंडेशन, नवी मुंबई.

मा. श्री. पी. आर. भोसले (संस्थापक अध्यक्ष, संजीवन नॉलेज सिटी,पन्हाळा) संजीवन नॉलेज सिटी,पन्हाळाचे संस्थापक अध्यक्ष मा. श...
12/03/2026

मा. श्री. पी. आर. भोसले (संस्थापक अध्यक्ष, संजीवन नॉलेज सिटी,पन्हाळा)

संजीवन नॉलेज सिटी,पन्हाळाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. पी. आर. भोसले यांनी आपल्या भाषणातून महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करत त्यांच्या प्रगतीसाठी समाजाने एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली.

समाजातील प्रत्येक मुलीला शिक्षण आणि संधी मिळाली तर समाज अधिक सक्षम होईल, असे त्यांनी सांगितले.

मा. स्वाती थोरात (राज्य कर उपआयुक्त - GST, नवी मुंबई)राज्य कर उपआयुक्त मा. स्वाती थोरात यांनी महिलांच्या शिक्षणाचे आणि आ...
12/03/2026

मा. स्वाती थोरात (राज्य कर उपआयुक्त - GST, नवी मुंबई)

राज्य कर उपआयुक्त मा. स्वाती थोरात यांनी महिलांच्या शिक्षणाचे आणि आर्थिक स्वावलंबनाचे महत्त्व अधोरेखित केले.

स्वतःच्या कष्टाने आणि जिद्दीने महिलांनी समाजात आपली ओळख निर्माण करावी, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.

मा. डॉ. अमर मुल्ला (सर्वोच्च न्यायालय वकील, कायदेतज्ञ व लेखक)सर्वोच्च न्यायालयाचे वकील व लेखक मा. डॉ. अमर मुल्ला यांनी आ...
12/03/2026

मा. डॉ. अमर मुल्ला (सर्वोच्च न्यायालय वकील, कायदेतज्ञ व लेखक)

सर्वोच्च न्यायालयाचे वकील व लेखक मा. डॉ. अमर मुल्ला यांनी आपल्या भाषणातून शिक्षण, संविधानिक हक्क आणि सामाजिक न्याय याविषयी मार्गदर्शन केले.

प्रत्येक मुलीने स्वतःच्या हक्कांबद्दल जागरूक राहून आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा संदेश त्यांनी दिला.

मा. श्री. राज देशमुख (WE चांगुलपणाची चळवळ)WE चांगुलपणाच्या चळवळीचे संस्थापक व समाजसेवक मा. श्री. राज देशमुख यांनी महिलां...
12/03/2026

मा. श्री. राज देशमुख (WE चांगुलपणाची चळवळ)

WE चांगुलपणाच्या चळवळीचे संस्थापक व समाजसेवक मा. श्री. राज देशमुख यांनी महिलांच्या जिद्द, कष्ट आणि आत्मविश्वासाचे कौतुक करत त्यांच्या कर्तृत्वाला सलाम केला.

समाजातील मुलींना योग्य संधी दिल्यास त्या कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मा. डॉ. अविनाश पोळ (पाणी फाउंडेशन)पाणी फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक मा. डॉ. अविनाश पोळ यांनी आपल्या भाषणातून ग्रामीण विक...
12/03/2026

मा. डॉ. अविनाश पोळ (पाणी फाउंडेशन)

पाणी फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक मा. डॉ. अविनाश पोळ यांनी आपल्या भाषणातून ग्रामीण विकास, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनासाठी युवकांनी पुढे येण्याचे आवाहन केले.

समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून काम केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

मा. श्री. तुषार दोशी (IPS), जिल्हा पोलीस अधीक्षक, सातारा“आशा गौरव पुरस्कार 2026” कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्...
12/03/2026

मा. श्री. तुषार दोशी (IPS), जिल्हा पोलीस अधीक्षक, सातारा

“आशा गौरव पुरस्कार 2026” कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. तुषार दोशी (IPS) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येऊन समाजात आपले स्थान निर्माण करावे, तसेच शिक्षण आणि धैर्याच्या बळावर कोणतीही अडचण पार करता येते, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.

Address

Sector 10 A, Airoli
Navi Mumbai
400708

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aasha Foundation Navi Mumbai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category