28/07/2025
BJP Maharashtra प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर, मा. Ravindra Chavan यांनी आज प्रथमच आदरणीय मा. पंतप्रधान Narendra Modi यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. ही भेट अत्यंत दिशादर्शक आणि प्रेरणादायी ठरली.
जानेवारी ते जून २०२५ या कालावधीत मा. रविंद्र चव्हाण यांनी भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष म्हणून केलेल्या कामाचा सविस्तर अहवाल मा. नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी महाराष्ट्रातील पक्ष संघटना अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने प्रदेशाध्यक्ष मा. चव्हाण साहेबांनी मा. नरेंद्र मोदीजी यांच्याशी आगामी निवडणुकांच्या रणनीती विषयी चर्चा केली. आगामी राजकीय दिशा, कार्यपद्धती व कार्यकर्त्यांशी संवाद या अनुषंगाने मा. पंतप्रधानांनी मूल्यवान मार्गदर्शन केले.