A H Motiwala-RatnaShastri

A H Motiwala-RatnaShastri ए एच मोतीवाला-रत्नशास्त्री
जुन्या पी?

कोल्हापूरचे प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक श्री प्रमोदजी सावंत यांनी आज शुभरत्न केंद्र ला सदिच्छा भेट दिली व स्वर्गीय एच ए म...
13/09/2022

कोल्हापूरचे प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक श्री प्रमोदजी सावंत यांनी आज शुभरत्न केंद्र ला सदिच्छा भेट दिली व स्वर्गीय एच ए मोतीवाला यांना अभिवादन केले.

*प्रिय बाबा,*_प्रत्येक मुलांसाठी आपला बाबा ग्रेट असतो. मलाही तुम्ही  ग्रेटच वाटता, बाबां तुम्ही मला काय दिल, यावर मी बोल...
12/09/2022

*प्रिय बाबा,*

_प्रत्येक मुलांसाठी आपला बाबा ग्रेट असतो. मलाही तुम्ही ग्रेटच वाटता, बाबां तुम्ही मला काय दिल, यावर मी बोलायचं म्हंटलं तर अख्ख पुस्तक होईल._

_लहानपणी मी तुमच्याकडे हट्ट केला की संध्याकाळी पूर्ण झालेला असायचा. वाटायचं आपले बाबा किती भारी पण बाबा आपल्यासाठी करत असलेल्या कष्टाची जाणीव न्हवती._

_नन्तर कळत्या वयात लोक तुमच्याबद्दल बोलायचे, तुम्हाला मान पान द्यायचे तेव्हा किती भारी वाटायचं. *गर्व वाटायचा, माझे बाबा किती भारी आहेत.*_

_नन्तर 7-8 वर्षाचा असल्यापासून बाबां तुम्ही मला, रत्न, हस्तशास्त्र आणि चेहराशास्त्रच ज्ञान दिलंत. तुम्ही तुमच्या जीवनात हजारो लोकांना सुखी जीवनाचा मंत्र दिलात, तुमचा हाच गुण मला देण्यासाठी आपण झटलात. *मला स्वतःसोबत फिरवलं, मोठं मोठ्या लोकांसोबत भेटी घडवल्या, आणि आपल्या शुभरत्न केंद्र, रत्नशास्त्र, हस्तशास्त्राच शिक्षण दिल* .त्यात पारंगत होऊ पर्यत आपण मला कितीतरी वेळा समजावलं. आपल्याकडे आलेला माणूस समस्या मुक्त झाला पाहिजे, हे किती तळमळीने सांगायचं तुम्ही._

_*बाबा, 12 सप्टेंबर 2020 हा दिवस मात्र आमच्या आयुष्यात काळ रात्र घेऊन आला. तुम्ही आजारी पडल्याचे निमित्त झाल. आणि तुम्ही स्वर्गवासी झालात. पण तुम्हाला मृत्यू आधीच कळलं होता, हे आपण कृतीतून दाखवलं. मला शुभरत्न केंद्रची जबाबदारी दिली. आयुष्यात कितीही संकट येउडे, कितीही त्रास होउदे, आपल्या केंद्राचे, मोतीवाला घराण्याचे नाव खाली जाता कामा नये, हे 8 दिवस मला सांगत होता. तुमचं हे सांगण अस अघटित घडणारे आहे, हे माहीत न्हवत.*_

_बाबा,तुम्ही शरीराने गेलात, मनाने, आत्माने आमच्या सोबत अहात. याचीही अनुभूती आम्हाला आली आहे. बाबा आज तुम्ही जाऊन 2 वर्षे झाली. तुम्ही दिलेल्या ज्ञानाचा आणि पाचव्या पिढीच्या वारसा हक्काचा पुरेपूर बहुमान करीन आणि निपाणी व्यतिरिक्त कुठेही शाखा काढणार नाही, हा दिलेला शब्द पाळीन. तुमच्या शुभरत्न केंद्रात आलेला माणूस हसत गेला पाहिजे, ही शिकवण न विसरता काम करीन, एवढा शब्द देतो._

_बाबा खुप काही दिलंत तुम्ही पण तरीही तुमच्याशिवाय आमची ओंजळ रिकामी आहे. माझ्या मुलांनी तुमच्या अंगाखांद्यावर खेळण्याच्या वयात आपण गेलात, देवाच्या इच्छेपुढे चालायचं. बाबा आशीर्वाद राहुदेत. तुम्ही स्थापण केलेल्या शुभरत्न केंद्र निपाणीची प्रतिष्ठा वाढविण्याच्या प्रयत्न करीन. तुमच्यासारखं लढवये, दानशूर, हसतमुख, मदतनीस बनण्याचा प्रयत्न करीन. तुम्ही म्हणाला होतात की स्वतःची ओळख बनव. आजपर्यत रत्नशास्त्री एच ए मोतीवाला यांचा मुलगा म्हणून ओळख होती ती रत्नशास्त्री ए एच मोतीवाला अशी निर्माण करून तुमचे शब्द खरे ठरविण. बाबा तुमचं ज्ञान माझ्यासाठी वरदान आहे. ते न विसरता आणि समाजाची उन्नती होण्यासाठी काम करीन._

_बाबा आज लोक माझं कौतुक करतात ते ऐकायला तुम्ही हवे होतात. असो_

*दुसऱ्या पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण श्रध्दांजली...*

11/09/2022
कोल्हापुरातील कसबा बावडा येथे सम्राट मित्र मंडळ यांच्यातर्फे प्रत्येक वर्षी गणेशोत्सवानिमित्त वेगवेगळे सांस्कृतिक सामाजि...
10/09/2022

कोल्हापुरातील कसबा बावडा येथे सम्राट मित्र मंडळ यांच्यातर्फे प्रत्येक वर्षी गणेशोत्सवानिमित्त वेगवेगळे सांस्कृतिक सामाजिक उपक्रम व देखावा आयोजित करण्यात येतो,यंदावर्षी रत्नशास्त्री ए एच मोतीवाला यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सामाजिक कार्यात निस्वार्थपणाने माझे वडील स्वर्गीय मोतीवाला नेहमी सहभागी व्हायचे व अनेक मंडळांना त्यांनी मोलाचे सहकार्य केले आहे त्याचाच एक भाग म्हणून त्यांचा वारसा आम्ही पुढे चालवत स्वर्गीय एच ए मोतीवाला सामाजिक सेवा संस्था या माध्यमातून समाजसेवा करत आहोत. मंडळाला नेहमी आमचं सहकार्य राहील अशी गवाही यावेळी देण्यात आली.

संयुक्त राजनगर युवक मंडळ आडके प्लॉट निपाणी येथील श्री गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीचे उद्घाटन रत्नशास्त्री ए एच मोतीवाला या...
10/09/2022

संयुक्त राजनगर युवक मंडळ आडके प्लॉट निपाणी येथील श्री गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीचे उद्घाटन रत्नशास्त्री ए एच मोतीवाला यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

*_नांगणूर येथील जय हनुमान कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या महागणपतीच्या आरतीला उपस्थित राहता आले.यावेळी कार्यकर्त्यांनी...
10/09/2022

*_नांगणूर येथील जय हनुमान कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या महागणपतीच्या आरतीला उपस्थित राहता आले.यावेळी कार्यकर्त्यांनी खूप मान दिला.गेली 35 वर्षे मंडळाने केलेलं कार्य पाहून समाधान वाटले. यापुढेही या मंडळाच्या कार्यात सहभागी होऊन मदत करू अस रत्नशास्त्री ए एच मोतीवाला यांनी सांगितलं आहे. मंडळाच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा_*

_बापा चालले गावाला__चैन पडेना आम्हाला_गणपती बापा मोरया*पुढच्या वर्षी लवकर या*
09/09/2022

_बापा चालले गावाला_
_चैन पडेना आम्हाला_

गणपती बापा मोरया
*पुढच्या वर्षी लवकर या*

_कोल्हापूरातील कसबा बावडा येथील सम्राट मित्र मंडळाच्या गणेश मंडपाचे उदघाटन आज रत्नशास्त्री ए एच मोतीवाला निपाणी व लोकप्र...
06/09/2022

_कोल्हापूरातील कसबा बावडा येथील सम्राट मित्र मंडळाच्या गणेश मंडपाचे उदघाटन आज रत्नशास्त्री ए एच मोतीवाला निपाणी व लोकप्रिय आमदार ऋतुराज पाटील दादा यांच्या हस्ते पार पडले. गणपती हा सर्वांच्या आवडीचा देव आहे. त्याची कृपा सर्वांवर राहावी,अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. यावेळी अनेक मान्यवर, मंडळाचे सदस्य उपस्थित होते."

पावले गल्ली तरुण मंडळ PTM आयोजित गणेशाची आजची महाआरती कर्नाटकच्या मंत्री व निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले वहिनी यांच्या ...
06/09/2022

पावले गल्ली तरुण मंडळ PTM आयोजित गणेशाची आजची महाआरती कर्नाटकच्या मंत्री व निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले वहिनी यांच्या हस्ते संपन्न यावेळी त्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन रत्नशास्त्री ए एच मोतीवाला यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी उपस्थित होते

रायझिंग स्टार युक्त क्लब छत्रपती शिवाजी महाराज चौक निपाणी यांच्या वतीने आयोजित श्री गणेशाची आज महाआरती रत्नशास्त्री ए एच...
05/09/2022

रायझिंग स्टार युक्त क्लब छत्रपती शिवाजी महाराज चौक निपाणी यांच्या वतीने आयोजित श्री गणेशाची आज महाआरती रत्नशास्त्री ए एच मोतीवाला व उद्योजक रोहन साळवे यांच्या शुभहस्ते संपन्न यावेळी रायझिंग स्टार युक्त क्लब मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी उपस्थित होते

संयुक्त राजनगर युवक मंडळ,आडके प्लॉट आयोजित आरतीला उपस्थित निपाणीचे आमदार व मंत्री सौ शशिकला जोल्ले वहिनी व रत्नशास्त्री ...
05/09/2022

संयुक्त राजनगर युवक मंडळ,आडके प्लॉट आयोजित आरतीला उपस्थित निपाणीचे आमदार व मंत्री सौ शशिकला जोल्ले वहिनी व रत्नशास्त्री ए एच मोतीवाला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

संयुक्त राजनगर युवक मंडळ च्या गणेशाला युवा नेते श्री उत्तम अण्णा पाटील व माजी नगराध्यक्ष,विद्यमान नगरसेवक विलासअण्णा गाड...
05/09/2022

संयुक्त राजनगर युवक मंडळ च्या गणेशाला युवा नेते श्री उत्तम अण्णा पाटील व माजी नगराध्यक्ष,विद्यमान नगरसेवक विलासअण्णा गाडीवडर, नगरसेवक संजय पावले यांनी भेट घेऊन आशीर्वाद घेतला यावेळी त्यांचा सत्कार रत्नशास्त्री ए एच मोतीवाला यांनी केला व भावी कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी उपस्थित होते

Address

Nehru Chowk
Nipani
591237

Alerts

Be the first to know and let us send you an email when A H Motiwala-RatnaShastri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share