04/06/2026
राज्याचे माजी मंत्री व ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. एखाद्या मतदारसंघाचं ६ वेळा प्रतिनिधित्व करणं हीच त्यांच्या योगदानाची पोचपावती आहे आणि हे कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी त्यांना भोरच्या जनतेने त्यांच्या जनमानसातील प्रतिमेमुळे दिली. जवळपास १४ वर्ष महाराष्ट्राचं मंत्रिपद भूषवत उच्च व तंत्रशिक्षण, परिवहन, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय यांसारख्या अनेक महत्त्वाच्या खात्यांमध्ये त्यांनी मोलाचं योगदान दिलं.
अनंतराव थोपटे ह्यांच्या निधनाने राज्याने एक दीर्घ अनुभव असलेला, जनमानसाच्या प्रश्नांशी बांधिलकी जपणारा नेता गमावला आहे. साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली व थोपटे कुटुंबियां प्रती सहवेदना .. !!