30/06/2026
आम्ही आपल्या ऋणात राहू इच्छितो.....
✨ सेवा... समर्पण... परिवर्तन... ✨
रोटरी वर्ष २०२५–२६ आमच्यासाठी केवळ एका वर्षाचा प्रवास नव्हता, तर समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा एक सामूहिक संकल्प होता.
या एका वर्षात Rotary Club Dharashiv ने आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, महिला व बालकल्याण, युवक विकास, जलसंवर्धन, दिव्यांग सेवा, रक्तदान, नेत्रसेवा, सामाजिक जनजागृती आणि विविध मानवतावादी उपक्रमांद्वारे हजारो नागरिकांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण केला.
Happy School, Rotary Eye Hospital, Dental Clinic, Mobile Eye Check-up Van, रक्तदान शिबिरे, कृत्रिम अवयव वितरण, महिला आरोग्य तपासणी, इंटरॅक्ट क्लब स्थापना, वृक्षारोपण, शालेय साहित्य व गणवेश वाटप, संगीत वाद्यांचे वितरण, गरजू रुग्णांना आर्थिक मदत आणि अनेक लोकहितकारी प्रकल्प हे आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे यशस्वी झाले.
या यशामागे प्रत्येक रोटेरियन, दाते, सहकारी संस्था, डॉक्टर, शिक्षक, स्वयंसेवक, प्रसारमाध्यमे आणि समाजातील सर्व हितचिंतक यांचे अमूल्य योगदान आहे. आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार.
"Unite for Good" या ब्रीदवाक्याला साकार करत आम्ही सेवेला सर्वोच्च प्राधान्य दिले आणि समाजहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा अधिक दृढ केली.
चला... सेवेचा हा प्रवास यापुढेही अधिक जोमाने सुरू ठेवूया.
– Rtn. Ranjit Randive
President, Rotary Club Dharashiv (2025–26)
– Rtn. Pradeep Khamkar
Secretary, Rotary Club Dharashiv (2025–26)