20/07/2026
📍 धाराशिव | विद्यार्थी-युवकांच्या न्याय्य हक्कांसाठी निवेदन
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने आज धाराशिव येथील मा. जिल्हाधिकारी यांना विद्यार्थी व युवकांच्या विविध न्याय्य मागण्यांसंदर्भात निवेदन सादर करण्यात आले. विद्यार्थी-युवकांच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करून त्यांना न्याय मिळावा, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष शेखर घोडके, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते खलिफा भाई कुरेशी, शहराध्यक्ष नगरसेवक बबलु भाई शेख, शहर कार्याध्यक्ष नगरसेवक नरसिंह मेटकरी, नगरसेवक पंकज भोसले, नगरसेवक सुनील आंबेकर, मा नगरसेवक बाबा मुजावर,ओबीसी जिल्हाध्यक्ष रवी ठेंगल, ओबीसी जिल्हाउपाध्यक्ष अजिंक्य हिबारे, तालुकाध्यक्ष अमर गुंड, मजहर शेरिकल, शहराध्यक्ष रणवीर इंगळे, शहर संघटक कुणाल कर्णवर , तसेच पृथ्वीराज मुळे, रणवीर बर्डे, दत्ता लोंढे, शुभम सुकाळे, प्रवीण घोलप, ज्ञानेश्वर निंबाळकर, सचिन अंधारे, बाळासाहेब शहापुरे, अविनाश जाधव, अर्चना अंबुरे माळाले ताई, सुमित दूधभाते, अन्वर भाई शेख, इंजिनिअर सेल जिल्हाध्यक्ष सुरज वडवले, पृथ्वीराज अंधारे, अजयकुमार कोळी व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थी आणि युवकांच्या हक्कांसाठीचा हा लढा न्याय मिळेपर्यंत सुरूच राहील! ✊