राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार धाराशिव

  • Home
  • India
  • Osmanabad
  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार धाराशिव

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार धाराशिव फक्त शरद पवार साहेब प्रेमी

सहज, सुसंस्कृत आणि जनताप्रिय नेतृत्व !महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री, स्वच्छ चारित्र्याचे आणि लोकांच्या मनात घर करणारे नेत...
16/08/2026

सहज, सुसंस्कृत आणि जनताप्रिय नेतृत्व !

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री, स्वच्छ चारित्र्याचे आणि लोकांच्या मनात घर करणारे नेते स्व. आर. आर. आबा पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

आपली साधी राहणी, रोखठोक भूमिका आणि जनतेसाठी असलेली तळमळ आजही प्रेरणादायी आहे.

25/07/2026

इतिहास घडला! ✊📚
जंतरमंतरचा आवाज दिल्लीने ऐकला.
विद्यार्थ्यांच्या निर्धारासमोर सत्ता झुकली.

संघर्ष कधीच व्यर्थ जात नाही!
जय हिंद! 🇮🇳

#विद्यार्थीएकजूट

विकासाचा ध्यास, जनसेवेचा श्वास!महाराष्ट्राच्या विकासासाठी आयुष्य वेचणारे, प्रशासनावर घट्ट पकड असणारे कणखर नेतृत्व,स्व. अ...
22/07/2026

विकासाचा ध्यास, जनसेवेचा श्वास!

महाराष्ट्राच्या विकासासाठी आयुष्य वेचणारे, प्रशासनावर घट्ट पकड असणारे कणखर नेतृत्व,
स्व. अजितदादा पवार यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

तुमचे विचार, तुमचे कार्य आणि महाराष्ट्राप्रती असलेली तुमची निष्ठा सदैव प्रेरणादायी राहील.
तुमच्या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम!

#जयंती #अभिवादन #महाराष्ट्र

📍 धाराशिव | विद्यार्थी-युवकांच्या न्याय्य हक्कांसाठी निवेदनराष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने आज धा...
20/07/2026

📍 धाराशिव | विद्यार्थी-युवकांच्या न्याय्य हक्कांसाठी निवेदन

राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने आज धाराशिव येथे मा. जिल्हाधिकारी यांना विद्यार्थी व युवकांच्या विविध न्याय्य मागण्यांसंदर्भात निवेदन सादर करण्यात आले.

स्पर्धा परीक्षा, भरती प्रक्रिया, पेपरफुटी, बेरोजगारी तसेच विद्यार्थी-युवकांशी संबंधित विविध प्रश्नांवर तातडीने आणि प्रभावी कार्यवाही करून त्यांना न्याय मिळावा, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.

विद्यार्थी-युवकांच्या हक्कांसाठी, त्यांच्या भविष्याच्या संरक्षणासाठी आणि न्यायासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा लढा यापुढेही अधिक ताकदीने सुरू राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

तसेच सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर होत असलेल्या दडपशाहीच्या निषेधार्थ आज धाराशिव येथे केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

भारतीय संविधानाने दिलेल्या लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शांततापूर्ण आंदोलनाच्या अधिकाराचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. या मूलभूत मूल्यांवर होणारा कोणताही आघात आम्ही खपवून घेणार नाही.

संविधानिक हक्क, लोकशाही मूल्ये आणि नागरिकांच्या आवाजाच्या संरक्षणासाठी आमचा संघर्ष यापुढेही अधिक ताकदीने सुरू राहील, असा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

संविधानाचा सन्मान, लोकशाहीचा अभिमान!

#विद्यार्थीन्याय #युवकहक्क #धाराशिव #राष्ट्रवादीयुवककाँग्रेस #शरदचंद्रपवार

20/07/2026

जाहीर निषेध 🏴

दिल्लीतील जंतर-मंतर येथे आपल्या न्याय्य हक्क आणि मागण्यांसाठी संविधानाने दिलेल्या लोकशाही मार्गाने शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या निष्पाप विद्यार्थी-युवकांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या अमानुष लाठीहल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो.

देशाचे भविष्य घडवणाऱ्या विद्यार्थी-युवकांच्या हातात पुस्तके असताना त्यांच्यावर लाठ्या चालविणे ही लोकशाहीला काळिमा फासणारी घटना आहे. रोजगार, पारदर्शक भरती प्रक्रिया, पेपरफुटी रोखणे आणि न्याय्य संधी यांसारख्या रास्त मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांना दडपशाहीच्या बळावर गप्प करण्याचा प्रयत्न हा अत्यंत निंदनीय आणि असंवैधानिक आहे.

लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार आहे. त्या अधिकाराचा सन्मान करण्याऐवजी विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणे ही लोकशाही मूल्यांची पायमल्ली आहे.

#निषेध

विद्यार्थी-युवकांच्या न्यायासाठी निर्णायक लढा!स्पर्धा परीक्षांतील वारंवार होणारी पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील गैरव्यवहार,...
19/07/2026

विद्यार्थी-युवकांच्या न्यायासाठी निर्णायक लढा!

स्पर्धा परीक्षांतील वारंवार होणारी पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील गैरव्यवहार, ऑनलाइन परीक्षा व्यवस्थेतील अनागोंदी, रिक्त पदे असूनही होत असलेला भरतीतील विलंब, तसेच दिवसेंदिवस वाढणारी बेरोजगारी यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थी व युवकांचे भविष्य धोक्यात आले आहे.

विद्यार्थी-युवकांच्या स्वप्नांशी सुरू असलेला हा अन्याय आता सहन केला जाणार नाही. पारदर्शक, विश्वासार्ह आणि वेळेत भरती प्रक्रिया, पेपरफुटीला कायमचा आळा, दोषींवर कठोर कारवाई आणि प्रत्येक पात्र उमेदवाराला न्याय मिळावा, या मागण्यांसाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याची हीच वेळ आहे.

चला, विद्यार्थी-युवकांच्या न्यायासाठी आवाज बुलंद करूया!
आपल्या हक्कांसाठी, आपल्या भविष्याच्या संरक्षणासाठी आणि न्याय्य व्यवस्थेसाठी आयोजित आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊया!

"विद्यार्थ्यांचा संघर्ष – न्यायाचा विजय!"

#विद्यार्थीआंदोलन #युवक #न्याय
#धाराशिव #राष्ट्रवादी

अखेर शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय झाला ! पंढरपूर येथील अन्नत्याग आंदोलनापासून ते छत्रपती संभाजीनगर येथील एल्गार लढ्यापर्य...
10/07/2026

अखेर शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय झाला !

पंढरपूर येथील अन्नत्याग आंदोलनापासून ते छत्रपती संभाजीनगर येथील एल्गार लढ्यापर्यंत शेतकऱ्यांच्या न्याय्य मागणीसाठी उभारलेल्या संघर्षाला अखेर यश मिळाले.

राम कृष्ण हरी!
#शेतकरी

चला पंढरीसी जाऊं | रखुमादेवीवरा पाहूं |डोळे निवतील कान | मना तेथे समाधान ||संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्...
08/07/2026

चला पंढरीसी जाऊं | रखुमादेवीवरा पाहूं |
डोळे निवतील कान | मना तेथे समाधान ||

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त समस्त वारकऱ्यांना हार्दिक शुभेच्छा !

#संत_ज्ञानेश्वर_महाराज #पालखी #आषाढी_वारी #पंढरपूर #विठ्ठल_दर्शन

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 'ज्ञान, भक्ती आणि वैराग्याचा' ...
07/07/2026

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

'ज्ञान, भक्ती आणि वैराग्याचा' अमृतसंदेश देणारी ही पवित्र वारी आपल्याला श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक ऐक्याची प्रेरणा सदैव देत राहो!

#संततुकाराममहाराज | #वारी2026 | #पालखीसोहळा |
#पालखी #रामकृष्णहरी

Address

Osmanabad
413501

Alerts

Be the first to know and let us send you an email when राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार धाराशिव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share