22/07/2020
अपंगांच्या "जनगणने"चा इतिहास...
सन १८७२ ते १९४१ पर्यंत ब्रिटीशांनी केलेल्या देशाच्या जनगणनेमध्ये प्रत्येक वेळेस *अपंगांची जनगणना करावी* असा प्रश्न ऐरणीवर आला, परंतू त्याची अंमलबजावणी या ना त्या कारणास्तव होवू शकली नाही...
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर National Sample Survey Office *(NSSO)* या संस्थेमार्फत प्रथमच जुलै १९५९ ते जून १९६० दरम्यान १५ फेरीतून फक्त ग्रामीण भागातील अपंगांचा सर्वे करण्यात आला तर जुलै १९६० ते जून १९६१ दरम्यान १६ फेरीतून फक्त शहरी भागातील अपंगांचा सर्वे करण्यात आला. तसेच जुलै १९६९ ते जून १९७० दरम्यान २४ फेरीतून व आॅक्टोबर १९७३ ते जून १९७४ दरम्यान २८ फेरीतून संपूर्ण देशातील अपंगांचा सर्वे करण्यात आला...
*देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर "३४ वर्षानंतर प्रथमच" देशाची ४ थी जनगणना - १९८१ मध्ये अपंगांच्या Totally Blind, Totally Crippled, Totally Dumb या "तीन" प्रवर्गाचा समावेश* करण्यात येवून जुलै ते डिसेंबर १९८१ दरम्यान ३६ फेरीतून सर्वे करण्यात आला तर *पाचवी जनगणना - १९९१ मध्ये अपंगांना "वगळण्यात" आले होते...*
*सन - २००१ च्या जनगणनेमध्ये* Disability In Seeing, In Speech, In Hearing, In Moving, Mental Disability या *पाच प्रवर्गाच्या निकषावर* सर्वे करण्यात आला. NSSO संस्थेमार्फत करण्यात आलेल्या शेवटच्या जुलै ते डिसेंबर २००२ दरम्यानच्या ५८ फेरीतून अपंगाचे वय, आर्थिक स्थिती, शिक्षण, रोजगार इ. माहिती संकलीत करण्यात आली...
*सन - २०११ च्या जनगणनेमध्ये* Disability In Seeing, In Speech, In Hearing, In Moving, In Mental Retardation, In Mental Illiness, Multiple Disability, Any Other या *आठ प्रवर्गांचा अपंग म्हणून समावेश* करण्यात आला...
सन - २०११ च्या जनगणनेनुसार देशाची एकूण लोकसंख्या १२१,०८,५४,९७७ इतकी असून त्यापैकी २,६८,१४,९९४ म्हणजेच *२.२१%* इतकी आठ प्रवर्गाच्या अपंगांची लोकसंख्या आहे...
सन - २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याची एकूण लोकसंख्या ११,२३,७४,३३३ इतकी असून त्यापैकी *२९,६३,३९२ (पु - १६,९२,२८५ स्री - १२,७१,१०७) म्हणजेच २.६४% इतकी आठ प्रवर्गाच्या अपंगांची लोकसंख्या* आहे. याबाबत देशपातळीवर आपले राज्य सिक्कीम, ओडिशा, जम्मू व काश्मीर, आंध्रप्रदेश नंतर *"पाचव्या" क्रमांकावर* आहे...