जांभूलबेट हे मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील पालम व पूर्णा तालुक्याच्या मध्यभागी गोदावरी नदीवरील निसर्गरम्य बेट आहे. या बेट जवळपास २० एकर चे असून पुर्वी या बेटावर बरेच जांभळाचे झाडे असल्याने त्यांचे नाव जांबुलबेट असे पडले. आज या बेटावर बरेच झाडे आहेत जसे की जांभळ, आंबा, चिंच, वेळू, वड, पिंपळ, तुती , कडुनिंब इत्यादि. जा बेटाच्या मध्यभागी जुने संकटमोचंन हनुमान चे हेमाडपंती मंदीर आहे. तिथे पिण्याच्या
पाण्यासाठी हातपंप आहे. जांबुलबेट ला जाण्यासाठी लोकसहभागातून एक नवीन बोट पण सुरू केली आहे. बोटेतून जांबुलबेट ला गोदावरी नदीच्या पात्रातून जाताना तुम्हाला गोदावरी नदीतील पाण्याचा आनंद पण घेता येईल. तसेच आत जांबुलबेट मध्ये वणजेवन पण करता येईल. नक्की या बेटास भेट द्या. हे बेट परभणी शहरापासून 58 किलोमीटर आहे. मार्ग परभणी- ताडकळस - पालम - जांबुलबेट. नांदेड ते जांबुलबेट ते अंतर 56 किलोमीटर आहे मार्ग नांदेड- लोहा - पालम - जांबुलबेट .परभणी व नांदेड वरून पालम ला येण्यासाठी बस सेवा उपलब्ध असून , पालम वरून जांबुलबेट ला वाहने आहेत. हे बेट पालम पासून उत्तेरेस ६ किलोमीटर आहे.