VillageBook,Wada,Palghar

VillageBook,Wada,Palghar Panchayat Samiti Wada

आरोग्य रथआज दिनांक २७.०५.२०२१ रोजी मा सभापती ,मा उपसभापती, मा गटविकास अधिकारी,सर्व खातेप्रमुख ,इतर अधिकारी यांच्या उपस्थ...
27/05/2021

आरोग्य रथ
आज दिनांक २७.०५.२०२१ रोजी मा सभापती ,मा उपसभापती, मा गटविकास अधिकारी,सर्व खातेप्रमुख ,इतर अधिकारी यांच्या उपस्थितीत आरोग्य व जनजागृती रथाचे उदघाटन पंचायत समिती वाडा येथे झाले. सदर रथ पुढील 20 दिवस सर्व गावात आरोग्य व जनजागृती करीता फिरेल.

26/02/2021

🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑
*Facebook live कार्यक्रम*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

*विषय: - " शाळाबाहय , अनियमित व स्थलांतर मुलांच्या विशेष शोध मोहीम" संर्दभातील फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाबाबत ....*

उपरोक्त विषयान्वये आपणास कळविण्यात येते की , दि .२६ /०२ /२०२१ रोजी सकाळी १० .३० वा . शाळाबाहय , अनियमित व स्थलांतर मुलांच्या विशेष शोध मोहीम" संर्दभातील फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले आहे . या कार्यक्रमात खालील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत .
🌷 *प्रमुख उपस्थिती :-*
*मा.श्रीमती. भारती कामडी मॅडम*
( अध्यक्ष जि .प .पालघर )
*मा . श्री . निलेश सांबरे साहेब*
( उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती . जि .प .पालघर )
*मा . श्री .सिद्धाराम सालीमठ साहेब ( भा .प्र.से )*
( मुख्य कार्यकारी अधिकारी , जि.प .पालघर )
*मा .श्री. चंद्रकांत वाघमारे साहेब*
( अतिरीक्त मुख्य कार्यकारी , जि .प .पालघर )
*मा . श्रीमती .लता सानप मॅडम .*
(प्राचार्या DIET तथा शिक्षणाधिकारी प्राथ . जि .प .पालघर )
*मा . श्री. प्रविण भावसार साहेब*
( जिल्हा कार्यक्रम अधिकारी , महिला व बालविकास जि .प .पालघर )
हे मान्यवर महोदय सर्व गटशिक्षणाधिकारी ,बालविकास प्रकल्प अधिकारी ,विस्तार अधिकारी , केंद्रप्रमुख , अंगणवाडी पर्यवेक्षिका , साधनव्यक्ती , IED विशेष तज्ञ व विशेष शिक्षक सर्व प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक ,केंद्रस्तरीय बालरक्षक , शाळास्तरीय बालरक्षक ,शिक्षक व सर्व अंगणवाडी सेविका यांच्याशी संवाद साधणार आहे . तसेच या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात शोध मोहीम बाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे . तरी सदर कार्यक्रमात सन्मानीय जि .प . सदस्य , सन्मा . विषय समिती सभापती ( सर्व जि .प ) , सन्मा .सभापती पं .स .( सर्व ) , सन्मा .पंचायत समिती सदस्य , सन्मा .सरपंच , उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य , सन्मा शालेय व्यवस्थापन समिती सदस्य ( सर्व ) , सर्व पालक यांनी देखील फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात सहभागी व्हावे .

*चला तर आपण दि .२६ /०२/२०२१ रोजी सकाळी १० .३० आपण सर्व जण यात सहभागी होऊया आणि "पालघर जिल्हा शाळाबाहय मुक्त मुल करूया. "🌹🌹🌹*

https://www.facebook.com/ZPPalghar/
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
*Like and follow above link*
🌴🌊🌴🌊🌴🌊🌴🌊🌴🌊

Official page of Zilla Parishad Office, , Rural Development Department, Government of Maharashtra

31/12/2020

Facebook live कार्यक्रम

विषय: - " #ऑनलाईन_शिक्षण_उपक्रम " संर्दभातील फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाबाबत ....

उपरोक्त विषयान्वये आपणास कळविण्यात येते की , दि .१/०१ /२०२१ रोजी आपल्या जिल्ह्यातील सर्व आस्थापनाच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये "ऑनलाईन शिक्षण उपक्रम " सुरू होत आहे . या उपक्रम संर्दभात दि .१/०१/२०२१ रोजी फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले आहे . या कार्यक्रमात खालील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत .

🌷 प्रमुख उपस्थिती :-

मा.श्रीमती. भारती कामडी मॅडम
( अध्यक्ष जि .प .पालघर )

मा . श्री . निलेश सांबरे साहेब
( उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती . जि .प .पालघर )

मा . श्री .सिद्धाराम सालीमठ साहेब
( मुख्य कार्यकारी अधिकारी , जि.प .पालघर )

मा .श्री. चंद्रकांत वाघमारे साहेब
( अतिरीक्त मुख्य कार्यकारी , जि .प .पालघर )

मा . श्रीमती .लता सानप मॅडम .
(प्राचार्या DIET तथा शिक्षणाधिकारी प्राथ . जि .प .पालघर )

हे मान्यवर सर्व अधिकारी , कर्मचारी व मुख्याध्यापक , शिक्षक यांच्याशी संवाद साधणार आहे . तरी सदर कार्यक्रमात सन्मानीय जि .प . सदस्य , सन्मा . विषय समिती सभापती ( सर्व जि .प ) , सन्मा .सभापती पं .स .( सर्व ) , सन्मा .पंचायत समिती सदस्य , सन्मा .सरपंच , उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य , सन्मा शालेय व्यवस्थापन समिती सदस्य ( सर्व ) , सर्व पालक यांनी देखील फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात सहभागी व्हावे .

चला तर आपण दि .१/०१/२०२१ रोजी सकाळी ११ .०० आपण सर्व जण यात सहभागी होऊया.🌹🌹🌹🌹

https://www.facebook.com/ZPPalghar/

Like and follow above link

Official page of Zilla Parishad Office, , Rural Development Department, Government of Maharashtra

उपमुख्यकार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) श्री. टी. ओ. चव्हाण साहेब यांनी वाडा तालुका पंचायत समिती येथे भेट देऊन तालुक्याती...
26/06/2020

उपमुख्यकार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) श्री. टी. ओ. चव्हाण साहेब यांनी वाडा तालुका पंचायत समिती येथे भेट देऊन तालुक्यातील सहा नोडल अधिकारी यांचा कोरोना संदर्भात दैनंदिन अहवाला बाबत VC द्वारे आढावा घेऊन कोरोना संदर्भात घ्यावयाची काळजी बाबत विशेष मार्गदर्शन केले. त्या वेळेस गटविकास अधिकारी वाडा राजलक्ष्मी येरपुडे मॅडम, तालुका आरोग्य अधिकारी श्री. बुरपुल्ले साहेब, प्राथमिक आरोग्य केंद्र परळी येथील डॉ. श्री. यतीश पाटील हे उपस्थित होते.

16/06/2020

Official page of Zilla Parishad Office, , Rural Development Department, Government of Maharashtra

15/06/2020

https://www.facebook.com/CMOMaharashtra/

मुख्यमंत्री सचिवालय, महाराष्ट्र शासन
Official Page of Chief Minister Office, Maharashtra

15/06/2020

https://www.facebook.com/AjitPawarSpeaks/

संकल्प, निष्ठा, कर्म-
हाच माझा धर्म!
उपमुख्यमंत्री- महाराष्ट्र राज्य |

Commitment, Conviction, Service- My Vision |
Deputy Chief Minister- Maharashtra

https://www.facebook.com/536126633433966/posts/1101476400232317/
15/06/2020

https://www.facebook.com/536126633433966/posts/1101476400232317/

‘आशा’ गटप्रवर्तक,अर्धवेळ स्त्री परिचरांना मिळणार प्रत्येकी १ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई, दि. ४ – कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावांमध्ये काम करणाऱ्या आरोग्य विभागाच्या ‘आशा’ गटप्रवर्तक तसेच अर्धवेळ स्त्री परिचर यांना त्यांच्या कामाची दखल घेऊन प्रत्येकी १ हजार रुपये इतकी प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

राज्यातील गावांमध्ये सर्व यंत्रणा जीवाची पर्वा न करता दिवसरात्र कोरोना महामारीच्या संकटाचा मुकाबला करीत आहेत. गावपातळीवरील हे कर्मचारी म्हणजे कोरोना विषाणुविरुद्ध लढणारे योद्धेच आहेत. या कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना प्रत्येकी १ हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण यामध्ये आशा गटप्रवर्तक तसेच अर्धवेळ स्त्री परिचर बाकी होते. आता या कर्मचाऱ्यांनाही प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सुमारे १३ हजार ५०० आशा गटप्रवर्तक आणि अर्धवेळ स्त्री परिचरांना याचा लाभ होणार आहे. चालू महिन्यामध्येच या कर्मचाऱ्यांना रकमेचे वाटप करण्याचे निर्देश जिल्हा परिषदांना देण्यात आले आहेत, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

आतापर्यंत २ लाख ७४ हजार ग्रामीण कर्मचाऱ्यांना रकमेचे वाटप

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, राज्यात आतापर्यंत कोरोना रोखण्यासाठी काम करणाऱ्या एकुण २ लाख ७४ हजार इतक्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यात आली आहे. आता राज्यातील आशा गटप्रवर्तक आणि आरोग्य उपकेंद्रांमधील अर्धवेळ स्त्री परिचरांनाही ही प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येईल.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना संपूर्ण वेतन

कोरोनाविरुद्ध काम करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाही दिलासा देण्यात आला असून त्यांच्या वेतनासाठी असलेली ग्रामपंचायत करवसुलीची अट रद्द करण्यात आली आहे. यापुर्वी या कर्मचाऱ्यांचे वेतन हे ग्रामपंचायत करवसुलीशी निगडीत होते. पण आता करवसुलीची अट रद्द केल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सन २०२० – २१ या वर्षात त्यांचे संपूर्ण वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहितीही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिली.

दिनांक १९/०८/२०१९ रोजी वाडा तालुका आमसभा मा.शांतारामजी मोरे आमदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सदर सभेस मा.निलेशजी गं...
23/08/2019

दिनांक १९/०८/२०१९ रोजी वाडा तालुका आमसभा मा.शांतारामजी मोरे आमदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सदर सभेस मा.निलेशजी गंधे उपाध्यक्ष जिल्हा परिषद पालघर , जिल्हा परिषद सदस्य, मा.अश्विनी शेळके सभापती पंचायत समिती वाडा, पंचायत समिती सदस्य, मा.गीतांजली कोलेकर नगराध्यक्ष नगर पंचायत वाडा, तसेच नगरसेवक नगरपंचायत वाडा, तहसीलदार वाडा,गटविकास अधिकारी वाडा, सहा.गटविकास अधिकारी,पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी, वाडा तालुक्यातील पत्रकार, प्रतिष्ठित व्यक्ती इ. उपस्थित होते.

21/06/2019

Address

Wada
Palghar
421303

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Telephone

+912526271417

Alerts

Be the first to know and let us send you an email when VillageBook,Wada,Palghar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to VillageBook,Wada,Palghar:

Share