05/09/2026
नोबेल शांतता पारितोषिक विजेत्या समाजसेविका, भारतरत्न मदर टेरेसा यांचा आज स्मृतीदिन. सुरवातीला त्यांनी शाळेत शिक्षिका म्हणून काम केले.
कोलकात्यामधील गरिबी आणि लोकांचे हाल पाहून त्यांनी दीनदलितांची सेवा करण्याचा निश्चय केला. १९५० मध्ये त्यांनी कोलकात्यात 'मिशनरीज ऑफ चॅरिटी' या संस्थेची स्थापना केली. ही संस्था आज जगभरातील अनेक देशांमध्ये अनाथ मुले, कुष्ठरुग्ण आणि आजारी व्यक्तींची सेवा करते. १९७९ साली नोबेल शांतता पुरस्कार स्विकारताना आयोजित करण्यात आलेली मेजवानी त्यांनी रद्द करून तो पैसा गरिबांसाठी वापरण्यास सांगितला होता. आज स्मृतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन !