भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा रायगड़ जिल्हा••

  • Home
  • India
  • Panvel
  • भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा रायगड़ जिल्हा••

भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा रायगड़ जिल्हा•• भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाति मोर्चा रायगड़ जिल्हा•••

08/03/2026
"नागपूरचा एक थोर आणि उत्साही हिंदू कार्यकर्ता नाहीसा झाला.. "  जनता (२९ जून १९४०)भारतरत्न डॉ.बाबासाहेबंना आंबेडकर यांनी ...
19/07/2025

"नागपूरचा एक थोर आणि उत्साही हिंदू कार्यकर्ता नाहीसा झाला.. " जनता (२९ जून १९४०)

भारतरत्न डॉ.बाबासाहेबंना आंबेडकर यांनी ‘जनता’ नावाचे साप्ताहिक अनेक वर्षे चालविले. जनता च्या अंकांमधून मोठा इतिहास आणि अनेक महत्वाचे संदर्भ सापडतात. जनता वृत्तपत्राचे तीन खंड शासनाने नुकतेच प्रकाशित केले आहे. हे अंक अभ्यासत असताना एक महत्वाचा संदर्भ हाती लागला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांच्या निधनाची बातमी जनता साप्ताहिकाच्या २९ जून १९४० च्या अंकात प्रसिद्ध झालेली आहे. सदर बातमी पुढील प्रमाणे..

“डॉ. हेडगेवार यांचे निधन. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. के. बी. हेडगेवार हे ता. २१-६-४० रोजी सकाळी ९-३० वाजतां रक्तदाबाच्या विकाराने मृत्यू पावलें. निधनसमयीं त्यांचे वय सुमारें ५१ वर्षांचें असून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सुमारे सहाशेवर शाखा स्थापन केलेल्या आहेत, आणि त्यांत जवळ जवळ पाऊण लाखांवर स्वयंसेकांची नोंद पटावर झालेली आहे. त्यांच्या निधनाने नागपूरचा एक थोर आणि उत्साही हिंदु कार्यकर्ता नाहींसा झाला आहे”.

संघ संस्थापक डॉ हेडगेवार यांचे कर्तुत्व सांगून त्यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे व त्याच्या निधनाने ‘नागपूरचा एक थोर आणि उत्साही हिंदू कार्यकर्ता नाहीसा झाल्याचे म्हटले आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड लिखाण केलेले आहे. त्याचे लिखाण अनेक खंडात प्रसिद्ध झालेले आहे. या लिखाणात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल कठोर टीका केल्याचे आढळत नाही. कराड येथील संघ शाखेस डॉ.आंबेडकर यांनी २ जानेवारी १९४० रोजी भेट दिली होती आणि म्हटले होते कि, “काही बाबतीत मतभेद असले तरी या संघाकडे मी आपलेपणाने पाहतो” हा आपलेपणा वाढवला पाहिजे आणि त्या उद्देशाने कराड येथे या वर्षी पहिली ‘बंधुता परिषद’ संपन्न झाली.

जनता वृत्तपत्रांच्या खंडांचे वाचन सध्या सुरु आहे. तत्कालीन समस्या, राजकारण, समाजकारण व चर्चेचे विषय याविषयी वृत्तपत्रातून महत्वाची माहिती व संदर्भ मिळत आहेत. काँग्रेस व गांधीजींवर तर पानापांवर टीका आणि चिकित्सा बाबासाहेबांनी केलेली आहे. असो.. आणखी काही महत्वाचे संदर्भ लवकरच कळवतो.

Amit Jadhav Avinash Gaikwad Prakash Binedar Prakash Binedar चेतन रमेश कांबळे. Chetan Aruna Ramesh Kamble

19/07/2025
फोटो नीट लक्ष देऊन बघा!- राष्ट्रपती एसटी प्रवर्गातील आहेत,-पंतप्रधान हे ओबीसी प्रवर्गातील आहेत,- सरन्यायाधीश हे अनुसूचित...
19/07/2025

फोटो नीट लक्ष देऊन बघा!

- राष्ट्रपती एसटी प्रवर्गातील आहेत,

-पंतप्रधान हे ओबीसी प्रवर्गातील आहेत,

- सरन्यायाधीश हे अनुसूचित जाती श्रेणीतील आहेत,

- उपाध्यक्ष हे ओबीसी आहेत,

- कायदा मंत्री अनुसूचित जाती वर्गातील आहेत.

या देशात खरोखरच तथाकथित मनुवाद/ब्राह्मणवाद आहे का?

की घाणेरड्या राजकारणासाठी एक कथानक रचून चुकीचा नेरेटिव्ह सेट केला गेला आहे?

सध्या देशातील सर्व महत्त्वाची आणि शक्तिशाली पदे अनुसूचित जाती/जमाती/मागासवर्गीयांकडे आहेत, ज्यांना वंचित/शोषित/पीडित म्हटले जाते आणि त्यांच्यावर राजकारण केले जाते.आज ते सगळे भारताच्या सतेचा महत्वचा भाग आहेत!

जय हिंद जय भारत 🙏🙏
Amit Jadhav Prakash Binedar Avinash Gaikwad Chetan Aruna Ramesh Kamble चेतन रमेश कांबळे.

.
02/04/2025

.

नरेंद्र-देवेंद्र जोडीची जगप्रसिद्ध कामगिरी! भारतातील फक्त दोन प्रमुख नेत्यांना भेटले बिल गेट्स
23/03/2025

नरेंद्र-देवेंद्र जोडीची जगप्रसिद्ध कामगिरी! भारतातील फक्त दोन प्रमुख नेत्यांना भेटले बिल गेट्स

Address

#830, SWAPNAPURTI, AT-BORLE, POST-AJIWALI, TALUKA-PANVEL DISTRICT-RAIGAD
Panvel
410221

Alerts

Be the first to know and let us send you an email when भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा रायगड़ जिल्हा•• posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share