Vikrant Patil

Vikrant Patil Member of Legislative Council | BJP Maharashtra
Former Deputy Mayor – Panvel
Committed to Progress, Governance & Public Welfare

02/06/2026

‘मन की बात’ हा केवळ संवाद नसून, देशाच्या विकासयात्रेत सहभागी झालेल्या सामान्य नागरिकांच्या प्रेरणादायी कार्याचा गौरव आहे.पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे श्रवण करून विविध सामाजिक, पर्यावरणीय आणि राष्ट्रहिताच्या विषयांवरील विचार जाणून घेतले.

विकसित भारताच्या संकल्पनेसाठी प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्त्वाचे आहे.

पनवेलचे मा. नगराध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते मा. श्री. जे. एम. म्हात्रे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! समाजकारण, ...
01/06/2026

पनवेलचे मा. नगराध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते मा. श्री. जे. एम. म्हात्रे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजकारण, लोकसेवा आणि जनसंपर्क यांचा आदर्श वारसा जपत पनवेलच्या विकासात मोलाचे योगदान देणारे आदरणीय नेतृत्व.

आपणास निरोगी, दीर्घायुषी व यशस्वी जीवन लाभो तसेच आपल्या मार्गदर्शनाचा लाभ समाजाला निरंतर मिळत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

उदंड आयुष्याच्या आणि उत्तम आरोग्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

📍 तळोजापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त सकल धनगर समाज, तळोजा यांच्या वतीने आयोजित भव्य उत्सव स...
01/06/2026

📍 तळोजा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त सकल धनगर समाज, तळोजा यांच्या वतीने आयोजित भव्य उत्सव सोहळ्यास उपस्थित राहण्याचा मान मिळाला.

लोककल्याणकारी राज्यकारभार, न्यायप्रियता, दूरदृष्टी आणि समाजसेवेचा आदर्श घालून देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे.

या पवित्र प्रसंगी त्यांच्या महान कार्याला विनम्र अभिवादन करून उपस्थित बांधवांशी संवाद साधला.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम!

01/06/2026

🏆 आमदार चषक २०२६ | भंडारी प्रीमियर लीग, वडवली 🏏

ग्रामीण भागातील क्रीडा संस्कृतीला बळ देणारा आणि युवकांच्या प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देणारा आमदार चषक २०२६ स्पर्धेचा उत्साहपूर्ण प्रारंभ झाला.

खेळाडूंचा जोश, प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि गावकऱ्यांचा सहभाग यामुळे संपूर्ण परिसर क्रीडामय वातावरणाने भारावून गेला आहे. अशा स्पर्धांमधून केवळ खेळाडूच घडत नाहीत, तर शिस्त, संघभावना आणि नेतृत्वगुणही विकसित होतात.

सर्व सहभागी संघांना व खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा! 💐

खेळाडू घडला तर समाज घडतो, आणि समाज घडला तर राष्ट्र सक्षम बनते. 🇮🇳

#आमदारचषक2026

📍 वावंजे, पनवेलकाल श्री. श्रीपत जयराम पाटील यांच्या सेवा निवृत्ती सत्कार समारंभास उपस्थित राहिलो.तब्बल ३४ वर्षे प्रामाणि...
01/06/2026

📍 वावंजे, पनवेल

काल श्री. श्रीपत जयराम पाटील यांच्या सेवा निवृत्ती सत्कार समारंभास उपस्थित राहिलो.तब्बल ३४ वर्षे प्रामाणिकपणे आणि निष्ठेने सेवा बजावत त्यांनी आपल्या कार्याचा एक आदर्श ठसा उमटवला आहे. त्यांच्या प्रदीर्घ सेवाकार्यातील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद, समाधान आणि यशस्वी वाटचालीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

सेवा संपते, पण कर्तृत्व आणि माणुसकीची ओळख कायम स्मरणात राहते.

महाराष्ट्र विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक २०२६ आणि द्वैवार्षिक पोट-निवडणूक २०२६ साठी भारतीय जनता पार्टीच्या ...
31/05/2026

महाराष्ट्र विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक २०२६ आणि द्वैवार्षिक पोट-निवडणूक २०२६ साठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारी जाहीर झालेल्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन आणि विजयासाठी खूप-खूप शुभेच्छा !

🏆 आमदार चषक २०२६ | भंडारी प्रीमियर लीग, वडवलीग्रामीण भागातील क्रीडा संस्कृतीला बळ देणारा आणि युवकांच्या प्रतिभेला व्यासप...
31/05/2026

🏆 आमदार चषक २०२६ | भंडारी प्रीमियर लीग, वडवली

ग्रामीण भागातील क्रीडा संस्कृतीला बळ देणारा आणि युवकांच्या प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देणारा आमदार चषक २०२६ स्पर्धेचा उत्साहपूर्ण प्रारंभ झाला.

खेळाडूंचा जोश, प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि गावकऱ्यांचा सहभाग यामुळे संपूर्ण परिसर क्रीडामय वातावरणाने भारावून गेला आहे. अशा स्पर्धांमधून केवळ खेळाडूच घडत नाहीत, तर शिस्त, संघभावना आणि नेतृत्वगुणही विकसित होतात.

सर्व सहभागी संघांना व खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा! 💐

खेळाडू घडला तर समाज घडतो, आणि समाज घडला तर राष्ट्र सक्षम बनते.

राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त विनम्र अभिवादन! न्यायप्रिय, दूरदर्शी आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्श निर्...
31/05/2026

राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

न्यायप्रिय, दूरदर्शी आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्श निर्माण करणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे.

स्त्रीशक्ती, धर्मसंरक्षण आणि जनसेवेचा अखंड दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या या महान विभूतीस कोटी कोटी प्रणाम.

30/05/2026

📍 करंजाडे, पनवेल

ज्ञानाची पायाभरणी जितकी भक्कम, तितके भविष्य अधिक उज्ज्वल! ✨📚

ज्ञानसेतू किंडरगार्टन स्कूलच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहून लहानग्यांच्या शिक्षणासाठी उभारलेल्या या सुंदर उपक्रमास शुभेच्छा दिल्या या वेळची काही क्षणचित्र..

📍 चिंचवली आज चिंचवली येथे आयोजित भव्य दिव्य बिनजोड मैदान बैलगाडा शर्यतीला उपस्थित राहिलो.ग्रामीण संस्कृतीचा उत्साह, तरुण...
29/05/2026

📍 चिंचवली

आज चिंचवली येथे आयोजित भव्य दिव्य बिनजोड मैदान बैलगाडा शर्यतीला उपस्थित राहिलो.

ग्रामीण संस्कृतीचा उत्साह, तरुणांचा जल्लोष आणि बैलगाडा शौकिनांचा अफाट प्रतिसाद अनुभवताना महाराष्ट्राच्या मातीतल्या परंपरांचा अभिमान पुन्हा एकदा जाणवला.

बैलगाडा शर्यत ही केवळ स्पर्धा नसून शेतकरी संस्कृती, परंपरा आणि बैलांप्रती असलेल्या जिव्हाळ्याचं जिवंत प्रतीक आहे.

ही शानदार स्पर्धा यशस्वीपणे पार पाडणाऱ्या सर्व आयोजकांचे आणि उत्साहाने सहभागी झालेल्या युवा वर्गाचे मनःपूर्वक अभिनंदन!

Address

Vikrant Balasaheb Patil Public Meeting Office , Behind Hotel Garden, Plot No 100, Swami Nityanand Marg, Dist/Raigad
Panvel
410106

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vikrant Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Vikrant Patil:

Share