Good Morning Parbhani

Good Morning Parbhani News, analysis, promotions, advertising, events and all about Parbhani City and District!

*प्राचार्य रामदासजी डांगे स्मृति व्याख्यानमाला, परभणी - पुष्प ४ थे*संत साहित्याचे साक्षेपी समिक्षक, वारंकरी संप्रदायाचे ...
15/07/2018

*प्राचार्य रामदासजी डांगे स्मृति व्याख्यानमाला, परभणी - पुष्प ४ थे*

संत साहित्याचे साक्षेपी समिक्षक, वारंकरी संप्रदायाचे अनूयायी, ज्ञानेश्‍वरीचे गाढे अभ्यासक, मराठी शब्दकोश महामंडळाचे निर्माते व महाराष्ट्र शासनाचा संत साहित्यातल्या ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार प्राप्त परभणी येथील प्राचार्य (कै.) रामदासजी डांगे स्मृति व्याख्यानमालेत माजी केंद्रीयमंत्री श्रीमती सूर्यकांताताई पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

प्राचार्य (कै.) रामदासजी डांगे यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने परभणी महापालिकेने गेल्या चार वर्षापासून स्मृतिव्याख्यानमालेचे आयोजन सुरू केले असून *चौथ्या स्मृति व्याख्यानमालेत भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या तथा माजी केंद्रीय मंत्री श्रीमती सूर्यकांताताई पाटील या 'नव्या पिढी समोरील आव्हाने' या विषयावर पुष्प गुंफणार आहेत.*

या कार्यक्रमास पुणे येथील डॉ.एम.एस.बागवान, प्राचार्या सौ.संध्याताई दुधगावकर हे प्रमुख पाहुणे म्हणून तर माजीमंत्री सुरेश वरपुडकर हे अध्यक्ष म्हणून लाभणार आहेत.

या व्याख्यानमालेस नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महापौर सौ.मीनाताई वरपुडकर, आयुक्त रमेश पवार, उपमहापौर सय्यद समी सय्यद साहेबजान लाला, गणेश देशमुख, भगवान वाघमारे, विजय जामकर, सौ.मंगला मुदगलकर, जलालोद्दीन काजी, चंद्रकांत शिंदे, समितीप्रमुख नगरसेवक बंडू पाचलिंग यांच्यासह महापालिका सदस्यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

दिनांक : *सोमवार, १६ जुलै*
स्थळ : *बी.रघुनाथ सभागृह, परभणी*
वेळ : *सायंकाळी ५ वाजता*

12/09/2017

मुलापाठोपाठ वडिलांचीही आत्महत्या.

मागील तीन वर्षापासून आजाराने त्रस्त असलेल्या राज्य राखीव दलातील कर्मचारी चंद्रकांत मरिबा गायकवाड (42) याने मंगळवारी दि.12 रोजी सकाळी 6.30 ते 7 च्या सुमारास राहत्या घरी गळफास घेतला. त्याच्या घरापासुनच जवळच अंतरावर राहणार्‍या वडीलांनीही मुलाच्या आत्महत्येचे दुःख सहन न झाल्याने अवघ्या अर्ध्यातासातच स्वतः देखील गळफास घेतला. मुला पाठोपाठ वडीलांनीही आपले जीवन संपविले. याबाबत चंद्रकांतचे सासरे रघु माणिक भुजबळ यांनी नानलपेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून आकस्मीत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शिवसेनेच्या महापालिकेवर हल्लाबोलपरभणी महानगर पालिका हद्दीतील हजारो मालमत्ताधारकांना वाढीव घरपट्टीच्या नोटीसा बजावल्याच्य...
11/09/2017

शिवसेनेच्या महापालिकेवर हल्लाबोल

परभणी महानगर पालिका हद्दीतील हजारो मालमत्ताधारकांना वाढीव घरपट्टीच्या नोटीसा बजावल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या संतप्त लोकप्रतिनिधींसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सोमवारी महापालिकेवर मोठा मोर्चा काढला. शिवसेनेचे आ.डॉ. राहुल पाटील, खा. संजय जाधव, जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आनेराव, जिल्हाप्रमुख संजय कच्छवाह तसेच संपर्क प्रमुख आ.सुभाष भोयर, सहसंपर्क प्रमुख डॉ. विवेक नावंदर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले. महापालिकेच्या विरोधात या सर्वानी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केल्या. त्यामुळे बाजारपेठ दणाणून गेली. दरम्यान मोर्चाच्या समारोपाच्या वेळी खासदार व आमदार यांनी वाढीव घरपट्टीच्या नोटीसा तात्काळ रद्द कराव्यात अन्यथा प्रखर आंदोलन केले जाईल असा इशारा दिला आहे.

यूवकांनी प्रगतीच्या नव्या वाटा शोधाव्या - राजेंद्र दर्डा ग्रामीण भागात शिक्षण घेवून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ब्रिजग...
10/09/2017

यूवकांनी प्रगतीच्या नव्या वाटा शोधाव्या - राजेंद्र दर्डा

ग्रामीण भागात शिक्षण घेवून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ब्रिजगोपाल तोष्णीवाल यांनी आपलं शिक्षण पूर्ण केले. हे शिक्षणच समाजात परिवर्तन घडवू शकते ही बाब ओळखुन त्यांनी ग्रामीण भागातील मुलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. त्यांचे हे सामाजिक कार्य इतरांसाठी दिशादर्शक ठरेल असे गौरव उद्गार माजी शिक्षणमंत्री तथा लोकमतचे संपादक राजेंद्र दर्डा यांनी काढले. यूवकांनी प्रगतीच्या नव्या वाटा शोधाव्या असे ते म्हणाले.

येथील श्री सत्यनारायण कालानी स्मृती सेवा टृस्ट परभणी च्या १८ व्या सेवा गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. शहरातील अक्षदा मंगल कार्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात जिंतुर येथील सामाजिक कार्यकर्ते ब्रिजगोपाल तोष्णीवाल यांना या वर्षीचा पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करणयात आले. यावेळी व्यासपीठावर मुख्य अतिथी तथा लातूर येथील रोटरी इंटरनॅशनलचे भूतपूर्व प्रांतपाल हरिप्रसाद सोमाणी, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.राजगोपाल कालानी, डॉ.विवेक नावंदर, ऍड. अशोक सोनी, संदीप भंडारी उपस्थित होते. पुढे बोलताना दर्डा म्हणाले, समाजाचा आरसा असणार्‍या पत्रकारांनी वाईट गोष्टीवर आसूड जरुर ओढावेत मात्र ज्या चांगल्या बाबी घडत आहेत त्याचीही दखल घेवून त्या समाजापर्यंत गेल्या पाहिजेत याची दक्षता घ्यावी. तोष्णीवाल यांनी शिक्षणाची दारे खुली करतानाच समाजातील दीनदुबळयांसाठी आरोग्य शिबीर घेवून त्यांच्यात परमेश्‍वर पाहिला. त्यामुळे वंचितांमध्ये आपलेपणा शोधणार्‍यांसाठीचा हा पुरस्कार आहे असे आपल्याला वाटते असेही ते म्हणाले. आज आपण २१ व्या शतकाकडे वाटचाल करत आहेत अशा वेळी माहिती व तंत्रज्ञानाला महत्व तर आहेच पण त्याचबरोबर समाजाला सुदृढ करण्यासाठी कोणत्या बाबी महत्वाच्या आहेत याचाही विचार शिक्षणतज्ञांनी करून या शिक्षण प्रणालीमध्ये बदल करावा असे आवाहन त्यांनी केले. युवकांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, आपल्या माहितीचा खजिना वाढू द्या मात्र त्या बरोबरच आपल्या चरित्र्याचा विकास होवू द्या. युवकांना आता रेडीमेड पॅकेज उपलब्ध होणार नाही त्यासाठी त्यांना प्रगतीच्या नव्या वाटा शोधाव्या लागतील. त्याचप्रमाणे आलेल्या संकटाना घाबरुन न जाता त्या संकटांशी सामना करण्याचे सामर्थ्य आपल्यात निर्माण करावे लागेल यासाठी वाणीत गोडवा, डोक्यात शांतता आणि वागण्यात नम्रता हे गुण आपल्याला बाळगावे लागतील असेही ते म्हणाले.

प्रमुख अतिथी म्हणून बोलताना डॉ.सोमाणी यांनी परिवाराविषयी नेमकी संकल्पना काय असावी यावर भाष्य केले. विज्ञानाच्या माध्यमातुन आम्ही प्रगती केली मात्र याच विज्ञानाने बॉंम्ब बनवून विनाशाकडे वाटचाल केली. परिवारातील वाढत चाललेला दुरावा यामुळे आपली संस्कृती,परंपरा ही कुठ जात आहे याच चिंतन आपल्याला कराव लागणार आहे. कुटुंबामध्ये अहंमपणाच्या रुपाने अहंकाराने प्रवेश केला आहे. त्यामुळे या अहंकाराला दूर करावयाचे असेल तर परिवारामध्ये शांतता नांदली पाहिजे. सुखी परिवारासाठी तीन गोष्टी महत्वाच्या असल्याचे त्यांनी नमूद केले. यात त्यागवृत्ती, परिवारातील व्यक्तींविषयी विश्‍वास आणि व्हॉटअपच्या जमान्यात बंद पडलेला एकमेकांप्रतीचा संवाद. यासर्व बाबी बंद झाल्या आहेत त्यामुळे सुखी परिवारासाठी पुन्हा एकदा एकत्र कुटुंब पध्दतीचा स्विकार करावा लागेल. हिंदु संस्कृतीमध्ये १६ संस्कार असून हे संस्कार आपल्या मुलांना आवश्यक द्या. आपल्याकडे आईवडीलांसाठी वेळ नाही असे मुल सांगतात मात्र याच आईवडीलांनी आपल्याला जन्म दिला आहे त्यामुळे त्यांना वेळ द्या अन्यथा तुमच्यावरही तशीच वेळ येईल. समय महत्वाचा आहे जीवनात जेव्हा अंधकार निर्माण होईल तेव्हा परमेश्‍वराला शरणा जा आणि योगक्षेमं वहाम्यहम चा विचार करा असेही ते म्हणाले.

सत्काराला उत्तर देताना ब्रिजगोपाल तोष्णीवाल यांनी आपल्याला पुरस्कार खुप मिळाले मात्र हा पुरस्कार आपल्यासाठी आर्शीवाद असल्याचे नमूद करतानाच आता जबाबदारी आणखी वाढली असल्याचे नमूद केले. जीवनात सत्याच्या मार्गावर चालत असून याच मार्गाचा आयुष्यभर स्वीकार करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्येकाला जीवनात कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागते. मात्र जिद्द आणि कठीण परिश्रम करण्याची तयारी ठेवणारा यशस्वी होतो. सामाजिक कार्याच्या माध्यमातुन आपल्याला यापुढेही दीनदुबळयांची सेवा करायची आहे असे मनोदय त्यांनी केला. आपल्या मुलांना पैशापेक्षा योग्य संस्कार देऊन पालकांनी संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांना पुरस्काराच्या रुपाने मिळालेली २१ हजार रुपयाची देणगी त्यांनी टृस्टला परत करून यातुन सामाजिक कार्य करावे असे नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.राजगोपाल कालानी त्यांनी करून टृस्टच्या माध्यमातुन होत असलेल्या कार्याची माहीती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अरुणकुमार ओझा यांनी तर आभार संदीप भंडारी यांनी मानले.

साखरेचा गोडवा किती दिवस टिकणार?खासदार संजय जाधव व आमदार डॉ. राहुल पाटील यांच्यातील गेल्या एक-दिड वर्षापासूनच्या संघर्षात...
09/09/2017

साखरेचा गोडवा किती दिवस टिकणार?

खासदार संजय जाधव व आमदार डॉ. राहुल पाटील यांच्यातील गेल्या एक-दिड वर्षापासूनच्या संघर्षात अखेर पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी मध्यस्ती केली, समेट घडविला खरा परंतू या दोघांतील हा प्रासंगिक करार पुढील काळात कितपत पाझरेल, टिकेल या विषयी शिवसेना वर्तूळातच शंका-कुशंका व्यक्त गेल्या जात आहेत.

शिवसेने अंतर्गत या दोघां लोकप्रतिनिधीतील संघर्षात पक्षश्रेष्ठींनी आजपर्यंत दखल घेतली नाही. पक्षांतर्गत व्यासपीठांसह सार्वजनिक कार्यक्रमांमधून सुध्दा या दोघांतील वाद सातत्याने उफाळून आल्यानंतरही पक्षश्रेष्ठींनी त्या गोष्टीकडे हेतूतः कानाडोळा केला. त्याचा परिणाम दोघातील संघर्ष चिघळत राहिला. अलीकडे तो संघर्ष विकोपाला गेला. या संघर्षास पक्षश्रेष्ठींद्वारे रसद पुरविली जाते की काय अशी शंका राजकीय क्षेत्रात खुलेआमपणे व्यक्त होत होती. तरीसुध्दा पक्षप्रमुखांनी, श्रेष्ठींनी ओळीने सुध्दा विचारपूस केली नाही. बाजार समिती, पंचायत समिती, जिल्हा परिषद पाठोपाठ नगर पालिका व परभणी महापालिका निवडणूकीत शिवसेनेचा मानहानीकारक पराभव झाल्यानंतर सुध्दा पक्षश्रेष्ठींनी या दोघांना जाब विचारला नाही, गटबाजीबाबत समज सुध्दा दिली नाही. त्यामुळेच आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूकीपर्यंत या दोघांतील संघर्ष कळस गाठणार असे सकृत दर्शनी चित्र दिसू लागले होते. कारण या दोघांनीही त्यादृष्टीनेच शह-कटशहाच्या खेळ्या सुरु केल्या. त्या खेळ्यांना सुध्दा पक्षश्रेष्ठीतील काहींनी खतपाणी घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे शिवसेने अंतर्गत हे युध्द सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या दृष्टीने अक्षरशः डोकेदुखीचे ठरले होते. चाणक्ष कार्यकर्त्यांनी या युध्दात पध्दतशीरपणे तेल ओतले. परंतू निष्ठावान अशा कार्यकर्त्यांची मोठी गोची झाली. या संघर्षाचा तडाखा सुध्दा बसला, काहींच्या राजकीय भवितव्याचा प्रश्‍न उभा राहिला. त्यापेक्षा गंभीर बाब म्हणजे गेल्या पंचवीस वर्षापासून या जिल्ह्यावर निर्विवाद असे वर्चस्व राखणार्‍या शिवसेनेच्या वर्चस्वास ग्रहण लागणार की काय? अशी भीती व्यक्त होत होती. या पार्श्‍वभुमीवर उशिरा का होईना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी या दोघांना पाचारण केले. ते सध्दा भरचौकात, सार्वजनिक ठिकाणी हे दोघे एकमेकांवर धावून गेल्यानंतरच. परंतू ठाकरे यांच्या समक्ष दोघांत समेट घडला हे निश्‍चित, त्यासाठी ज्येष्ठ नेते रामदास कदम, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने, साक्षीने दोघांनी एकमेकांना साखर भरवली परंतू या साखरेचा गोडवा किती दिवस राहणार असा प्रश्‍न सर्वसामान्य कार्यकर्त्यांसमोर उभा राहिला आहे.

समेट हा प्रासंगिक करार ठरु नये...

पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या समक्ष मातोश्रीवर खासदार जाधव व आमदार पाटील यांच्यात दिलजमाई झाली. परंतू यांच्यातील तो समेट प्रासंगिक करार ठरु नये असा सुर सर्वसामान्य शिवसैनिकांतून व्यक्त होत आहे. या दिलजमाईच्या वेळी ज्येष्ठ नेते दिवाकर रावते, संपर्क नेते सुभाष भोईर हे अनुपस्थित होते. त्यामुळेच काही चाणाक्ष कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. हेच कार्यकर्ते त्या करारा बाबत शंका व्यक्त करत असून कुजबूजही करत आहेत. सार्वजनिक ठिकाणी किंवा पक्षांतर्गत व्यासपीठांवर या दोघांत आता संषर्घ होणार नाही असे स्पष्ट असले तरी त्यांच्यातील शितयुध्द मात्र कायम राहिल असे कांही कार्यकर्ते छातीठोकपणे सांगत आहेत.

परभणी जिल्ह्यातील सर्व फेसबुक यूजर्सना मनःपूर्वक धन्यवाद. परभणी शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या व विशेष घडामोडींची तत्काळ द...
09/09/2017

परभणी जिल्ह्यातील सर्व फेसबुक यूजर्सना मनःपूर्वक धन्यवाद.

परभणी शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या व विशेष घडामोडींची तत्काळ दखल घेऊन त्या डिजिटल स्पीडने जास्तीत जास्त नेट यूजर्स पर्यंत पोहचाव्या या उद्देशाने गेल्या ऑगस्ट महिन्याच्या १६ तारखेला आम्ही 'गुड मॉर्निंग परभणी' या फेसबुक पेजची निर्मिती केली. अवघ्या १ महिन्याच्या आतच मॅरेथॉन स्पीडने या पेजला परभणी जिल्ह्यातील १००० फेसबुक यूजर्सनी लाईक करून आमच्या डिजिटल वार्तांकन करण्याच्या संकल्पाला सपोर्ट केले. आमचा या नूतन क्षेत्रातील प्रवेशाचा निर्णय आपण गुड मॉर्निंग परभणी या पेजला अल्पावधीतच १००० लाईक्स करून सार्थ ठरवला. डिजिटल वार्तांकन क्षेत्रात आम्हाला आणखी खूप मोठा टप्पा गाठायचा आहे. परभणी शहर व जिल्ह्यातील तमाम नेट यूजर्सच्या सहकार्य व प्रेमाच्या वर्षावाने आम्ही भविष्यातील हा मोठा टप्पा सुद्धा लीलया पार करू असा आम्हाला विश्वास आहे.

पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद.
लोभ आहेच, तो वृद्धिंगत व्हावा.

स्नेहांकित,
संतोष धारासूरकर व टीम
Good Morning Parbhani
(page)

परभणीत राहूल गांधीचा मोदींवर हल्लाबोलअखिल भारतीय काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी शुक्रवारी परभणी येथील ...
08/09/2017

परभणीत राहूल गांधीचा मोदींवर हल्लाबोल

अखिल भारतीय काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी शुक्रवारी परभणी येथील नुतन विद्यालयाच्या मैदानावर आयोजित केलेल्या संघर्ष सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर चौफेर हल्ला केला. विशेषतः शेतकरी, गोरगरीब, दलित, पददलित यांचे भविष्य अंधःकारमय झाले आहे. युवकांसमोर रोजगाराचा गंभीर प्रश्‍न उभा राहिला आहे असे नमुद करीत राहूल गांधी यांनी मोदी सरकार आज केवळ उद्योगपतींच्या हितासाठीचे निर्णय घेत असल्याचा आरोप केला. नोटबंदी, जीएसटी तसेच जीडीपीच्या अनुषंगानेही कडाडून टिका केली. मोदी हे देश तोडण्याचे काम करीत असल्याचा आरोप केला. मोदी व आरएसएस यांच्या विचारधारेविरोधात काँग्रेस कठोरपणे लढेल आपण मागे हटणार नाही असेही गांधी यांनी नमुद केले.

#दैनिकदिलासा

खासदार व आमदार यांच्यातील वाद मिटला ! परभणीचे खासदार संजय जाधव आणि आमदार राहुल पाटील यांच्यातील मतभेद शिवसेना पक्ष प्रमु...
08/09/2017

खासदार व आमदार यांच्यातील वाद मिटला !

परभणीचे खासदार संजय जाधव आणि आमदार राहुल पाटील यांच्यातील मतभेद शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या समक्ष मिटले असून शिवसेना नेते रामदास कदम आणि राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या यशस्वी मध्यस्थीने दोघानी यापुढे असे मतभेद होणार नाहीत असे वचन उद्धव साहेब ठाकरे यांना दिले. शिवसेना भवन येथे रामदास कदम यांनी दोघाना साखर भरवुन हे मतभेद मिटले असे ज़ाहिर केले.

#दैनिकदिलासा

राहूल गांधी यांच्या रोड शोला सूरक्षा यंत्रणांनी नाकारली परवानगी..................................काँग्रेसचे उपाध्यक्ष खा...
07/09/2017

राहूल गांधी यांच्या रोड शोला सूरक्षा यंत्रणांनी नाकारली परवानगी..................................

काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहूल गांधी यांचा उद्या शुक्रवार दिनांक ८ सप्टेंबर रोजी परभणीत रोड शो व्हावा यासाठी स्थानिक काँग्रेसजणांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले नाही.
संघर्ष यात्रे निमित्त परभणीत दूपारी एक वाजता खा. राहूल गांधी हे दाखल होणार आहेत. नांदेडहून ते कारने येणार असून त्रिधारेपासून सभास्थळापर्यत राहूल गांधी यांनी मोटरसायकलद्धारे रोड शो करावा यासाठी स्थानिक काँग्रेस नेतेमंडळीनी प्रयत्न सूरू केले होते. पण त्यास सूरक्षा यंत्रणानी स्पष्टपणे नकार दिला. त्यामूळे क्राँग्रेसजण हिरमूसले आहेत.

#दैनिकदिलासा

मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने बी.रघुनाथ यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन. सुरेशराव वरपुडकर, विवेक नावंदर, अशोक सोनी...
07/09/2017

मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने बी.रघुनाथ यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन.
सुरेशराव वरपुडकर, विवेक नावंदर, अशोक सोनी, बंडु पाचलिंग, कमलताई, सरोज देशपांडे, रमाकांत कुलकर्णी, आसाराम लोमटे, देविदास कुलकर्णी, प्रमोद बल्लाळ ,संतोष आसेगावकर, उदय वाईकर.

#दैनिकदिलासा

राहूल गांधीचा उद्या परभणीत रोड शो ? .................................काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहूल गांधी यांचा उद्या शु...
07/09/2017

राहूल गांधीचा उद्या परभणीत रोड शो ? .................................

काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहूल गांधी यांचा उद्या शुक्रवार दिनांक ८ सप्टेंबर रोजी परभणीत रोड शो आयोजित करण्यात येईल अशी चिन्हे आहेत. संघर्ष यात्रे निमित्त दूपारी एक वाजता खा. राहूल गांधी हे परभणीत दाखल होणार आहेत. नांदेडहून ते कारने येणार असून त्रिधारेपासून सभास्थळापर्यत राहूल गांधींनी मोटरसायकलद्धारे रोड शो करावा यासाठी स्थानिक काँग्रेस नेतेमंडळीनी प्रयत्न सूरू केले आहेत, पण त्यास सूरक्षा यंत्रणानी अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामूळे रोड शो बाबत शंका आहे.

#दैनिकदिलासा

खासदार विरूद्ध आमदार यांच्या संघर्षास श्रेष्ठींची रसद!............................शिवसेनेत वारंवार खटके उडून सुद्धा पक्ष...
07/09/2017

खासदार विरूद्ध आमदार यांच्या संघर्षास श्रेष्ठींची रसद!............................

शिवसेनेत वारंवार खटके उडून सुद्धा पक्षप्रमुख व श्रेष्ठींचे दुर्लक्ष! कार्यकर्ते अस्वस्थ

संपूर्ण मराठवाड्यात शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणार्‍या परभणी जिल्ह्यात शिवसेनेचे खा. संजय जाधव विरूद्ध स्थानिक आ. डॉ. राहुल पाटील यांच्यात गेल्या दिड वर्षापासुन पक्षातंर्गत व सार्वजनिक कार्यक्रमामधून सुद्धा वारंवार खटके उडत असतांना श्रेष्ठींनी तो संघर्ष थोपविण्या ऐवजी या संघर्षात रसद पुरविण्याचे काम सुरू केले असल्याचे दुर्देवी चित्र समोर येत आहे.

गेल्या २५-३० वर्षापासून या जिल्ह्यात शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व आहे. विशेषतः सार्वत्रिक निवडणुकीतून शिवसनेने प्रस्थापितांच्या विरोधात सातत्याने हमखास असे यश पटकाविले आहे. दुर्देव असे की, यशाने सत्तास्थाने पटकाविलेल्या पुढार्‍यांनी विकासाभिमुख दृष्टीकोन ठेवण्याऐवजी सातत्याने पक्षातंर्गत गटबाजीतच धन्यता मानण्याचा व स्वतःचे श्रेष्ठेत्व, नेतृत्व राखण्याचा केविलवाणा प्रयत्न सातत्याने केला आहे. त्याचा परिणाम शिवसेनेतंर्गत गटबाजीचे राजकारण आता या जिल्ह्यास अक्षरशः अंगवळणी पडले आहे.

या जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेस कधीच अपेक्षित असे यश पटकाविता आले नाही त्याची कारणे गंमतशीर आहेत, तेवढीच गंभीर आहेत.

विशेषतः या जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेतेमंडळींनी सातत्याने स्वतःच्या निवडणुका प्रतिष्ठेच्या बनविल्या. त्यासाठी शहरी व ग्रामीण भागातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना प्रस्थापितांच्या विरोधात पेटवून उठवले. त्याद्वारे हिंदुत्ववादी एकगठ्ठा मते स्वतःच्या पदरात कशी पडतील याची सातत्याने खबरदारी घेतली. सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या निष्ठेसह अपार अशा श्रद्धेच्या, भावनेच्या जोरावरच शिवसेनेच्या नेतेमंडळींनी प्रत्येक सार्वत्रिक निवडणुका प्रचंड अशा मताधिक्यांनी जिंकल्या. दुर्दैवाने या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधून संधी द्यावयाची वेळ जेव्हा जेव्हा आली, तेंव्हा या जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेतेमंडळींनी स्वतःचे इगो, रुसवे-फुगवे अन् गटबाजीचे राजकारण पुढे केले. अलिकडे तर या पुढार्‍यांनी कॉग्रेस संस्कृतीला सुद्धा लाजवेल अशा खेळ्या खेळल्या अन् विरोधकांबरोबर हातमिळवणी करीत एकमेकांना शह काटशह द्यावयाचा धक्कादायक व आत्मघातकी प्रकार सुद्धा केला.

परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत त्या गोष्टीची अनेक उदाहरणे प्रकर्षाने समोर आली आहेत. शिवसेने अंतर्गत गटानेच विरोधकांबरोबर गळ्यात गळे घालून स्वःपक्षाच्या उमेदवाराच्या पराभवाचा विडा उचलण्याचे प्रकार घडले आहेत.

शिवसेने अंतर्गत काँग्रेस संस्कृतीचे हे राजकारण सर्वसामान्य अशा शेकडो निष्ठावान कार्यकर्त्यांचे बळी घेवून बसले आहेत. शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयीची अपार अशी श्रद्धा, हिंदुत्वाविषयीची प्रचंड अशी आस्था असणारा शहरी व ग्रामीण भागातील सर्वसामान्य कार्यकर्ता या पक्षांतर्गत गटबाजीच्या राजकारणाने अक्षरशः होरपळून निघला आहे. परंतु त्याचे सोयरसूतक या जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेतेमंडळींना नाही, हे विदारक सत्य आहे.

परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीत शिवसेनेच्या पुढार्‍यांनी प्रस्थापित म्हटल्या जाणार्‍या जेष्ठ नेते सुरेश वरपूडकर यांच्याशी मिठ्या मारल्या व त्यांच्याच सुपूत्रांच्या राजकीय पुनरुज्जीवनास या दोघांनी खुलेआमपणे सहकार्य केले. मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणार्‍या जिल्हा परिषदेत शिवसेना सहजपणे सर्वात मोठा पक्ष म्हणून उभा राहिला असता दुर्दैवाने या जिल्ह्यात शिवसेनेच्या नेतेमंडळींनी नेहमीप्रमाणे हाराकिरी केली अन् पडद्याआड विरोधकांना सहाय्यभूत ठरणार्‍या खेळ्या खेळल्या अन् शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा बळी घेतला.

महानगरपालिका निवडणुकीत सुद्धा त्याच गोष्टीची पुनरावृत्ती होणार हे स्पष्ट होते. अपेक्षेप्रमाणे घडले सुद्धा! कारण स्थानिक पातळीवरील आ.राहूल पाटील विरुद्ध खा.संजय जाधव यांच्यातील तीव्र संघर्ष या पराभवास मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरला. विशेष म्हणजे या निवडणुकीस या संघर्षाची झालर असतांना सुद्धा पक्षश्रेष्ठींनीही धृतराष्ट्राप्रमाणे या सर्व गोष्टी पाहिल्या.

परभणीतील या दारूण अशा पराभवाच्या पार्श्‍वभूमीवर स्थानिक नेतेमंडळीसह पक्षश्रेष्ठींद्वारेसुद्धा पराभवाचे खर्‍या अर्थाने आत्मपरिक्षण होईल असे अपेक्षीत होते. दुर्देवाने पक्षश्रेष्ठींनी आत्मपरिक्षण तर राहिले दुर साधी कारणमिमांसा किंवा विचारपुस सुद्धा केली नाही. परिणामी बालेकिल्ल्यातील संघर्ष आता टोकाला गेला आहे.

#दैनिकदिलासा

Address

Dainik Dilasa
Parbhani
431401

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm

Telephone

+912452222655

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Good Morning Parbhani posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share